एसबीआय म्यूच्यूअल फंडातर्फे एसबीआय निफ्टी 500 इंडेक्स फंड
एसबीआय म्यूच्यूअल फंडातर्फे
एसबीआय निफ्टी 500 इंडेक्स फंड
• नवीन फंड ऑफर मंगळवार 17 सप्टेंबर 2024 ला खुला झालाअसून मंगळवार 24 सप्टेंबर 2024 ला बंद होणार आहे.
• निफ्टी 500 निर्देशांक या एकाच निर्देशांकात गुंतवणूक करण्याची अनोखी संधी देतो आणि या निर्देशांकात बाजार भांडवलानुसार आघाडीच्या 500 लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांचा समावेश आहे.
• निफ्टी 500 निर्देशांकात एनएसईवर (मार्च 2024 पर्यंत) सूचीबध्द असलेल्या कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलमूल्याच्या 92.1 टक्के भाग समाविष्ट असल्याने तो भारतीय शेअर बाजाराचा व्यापक दृष्टीकोन सादर करतो.
भारतातील सर्वात मोठे फंड घराणे असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाने एसबीआय निफ्टी 500 इंडेक्स फंड हा नवीन फंड बाजारात आणला आहे. या फंडासाठी निफ्टी 500 हा आधारभूत निर्देशांक राहणार आहे. या निर्देशांकाआधारे हा फंड आपली वाटचाल करणार आहे. ही मुदतमुक्त श्रेणीतील योजना असून पॅसिव्ह प्रकारे म्हणजेच अप्रत्यक्षरित्या बाजारात गुंतवणूक करणार आहे. या योजनेच्या नवीन फंड ऑफरचा (एनएफओ) कालावधी 17 ते 24 सप्टेंबर 2024 असा आहे.
वाटचालीदरम्यान त्रुटींच्या अधीन राहताना अंतर्निहित निर्देशांकात असलेल्या समभागांच्या माध्यमातून तयार झालेल्या एकूण परताव्याशी मिळताजुळता परतावा प्रदान करणे, हे या योजनेचे गुंतवणुक उद्दिष्ट आहे. तथापि, योजनेचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईलच, याची कोणतीही हमी किंवा आश्वासन दिले जात नाही.
नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. समशेर सिंग म्हणाले: “देशातील सर्वात मोठे फंड घराणे म्हणून आम्ही आमच्या सक्रियपणे व्यवस्थापित फंडांव्यतिरिक्त, पॅसिव्ह प्रकारच्या गुंतवणूक विश्वात आमचे विशेष स्थान तयार करत आहोत. एसबीआय निफ्टी 500 इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना संपुर्ण भारतीय अर्थव्यवस्थेतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. यात सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण भांडवली मूल्याच्या 92 टक्क्यांपेक्षा अधिक मूल्य असलेल्या या कंपन्या आहेत. केवळ प्रस्थापित लार्ज कॅप कंपन्यांमध्येच नव्हे तर मिड आणि स्मॉल कॅपमध्येही, पॅसिव्ह पध्दतीने आणि तुलनेने अल्प खर्चात गुंतवणूक करु इच्छिणारे गुंतवणूकदार या फंडात गुंतवणूकीचा विचार करू शकतात.''
एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचे डेप्युटी एमडी आणि जॉइंट सीईओ श्री. डी. पी. सिंग म्हणाले, "ज्यांना स्थापित (लार्ज कॅप्स), वाढणाऱ्या (मिड-कॅप्स) आणि तरुण (स्मॉल कॅप) व्यवसायामध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी एसबीआय निफ्टी 500 इंडेक्स फंड ही एक उत्तम संधी आहे. विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आणि एकाच इंडेक्स फंडाच्या माध्यमातून मल्टीकॅपवर आधारलेला हा पर्याय देशातील सूचीबद्ध कंपन्यांच्या विश्वाचे प्रतिनिधीत्व तुमच्यासाठी करतो."
सदर योजना प्रामुख्याने निफ्टी 500 या निर्देशांकाचा समावेश असलेल्या समभागांमध्ये किमान 95 टक्के आणि जास्तीत जास्त 100 टक्के निधी तसेच सरकारी रोख्यांमध्ये (जसे की जी-सेक, SDLs, ट्रेझरी बिले आणि इतर कोणत्याही साधनांमध्ये आरबीआयने वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या नियमांनुसार) आणि त्रिपक्षीय रेपो आणि लिक्विड म्युच्युअल फंडाच्या युनिट्ससह पाच टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करणार आहे. या फंडात सुरुवातीला किमान 5,000 रुपये गुंतवणूक आवश्यक असून त्यानंतर एक रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. गुंतवणूकदारांना दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक आणि वार्षिक एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे अशा पध्दतीने देखील या फंडात गुंतवणूक करता येइल.
एसबीआय निफ्टी 500 इंडेक्स फंडाचे फंड मॅनेजर श्री. विरल छाडवा (Viral Chhadva) हे आहेत. ते एसबीआय फंड घराण्यात डिसेंबर 2020 पासून कार्यरत आहेत आणि सध्या एसबीआय निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड आणि एसबीआय निफ्टी 50 इक्वल वेट इटीएफचे व्यवस्थापन सांभाळतात.
-----
Comments
Post a Comment