बँक ऑफ बडोदाने मुंबईतील विलेपार्ले येथे फिजिटल शाखेचे केले उद्घाटन

 

     बँक ऑफ बडोदाने मुंबईतील विलेपार्ले येथे फिजिटल शाखेचे केले उद्घाटन

 


मुंबई, 11 सप्टेंबर 2024 : बँक ऑफ बडोदा ही भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक बँक असुन, बँकेने विलेपार्ले, मुंबई येथे फिजिटल शाखेचे उद्घाटन केले. फिजिटल शाखा ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयं-सेवा आणि सहाय्यक सेवा मॉडेल्स एकत्रित करून ग्राहकांच्या अनुभवाची पुनर्परिभाषित करेल. देशात सुरू झालेली बँकेची ही तिसरी फिजिटल शाखा आहे.

 

बँक ऑफ बडोदाते व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री देबदत्त चंद यांनी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री संजय व्ही. मुदलियार यांच्या उपस्थितीत या फिजिटल शाखेचे उद्घाटन केले. बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक श्री मनीष कौरा, श्री सुनील कुमार शर्मा, महाव्यवस्थापक आणि झोनल हेड, मुंबई झोन, वरिष्ठ बँक अधिकारी आणि झोन आणि विभागातील कर्मचारी सदस्य आणि मूल्यवान ग्राहक देखील उद्घाटनावेळी उपस्थित होते.

 

बँक ऑफ बडोदाची फिजिटल शाखा व्हिडिओ संपर्क केंद्राने सुसज्ज आहे जिथे ग्राहक गैर-आर्थिक सेवांवर सहाय्य मिळवण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे बँकेच्या संपर्क केंद्राशी कनेक्ट होऊ शकतो. यात एक सेल्फ सर्व्हिस कियोस्क आहे जिथे टॅबलेट स्थापित केले जातात आणि ग्राहक पॅन नंबर अपडेट, ईमेलद्वारे खाते विवरण, टीडीएस प्रमाणपत्र इत्यादीसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. फिजिटल शाखेत एक विशेष सेवा क्षेत्र तसेच युनिव्हर्सल सर्व्हिस काउंटर देखील आहेत जेथे अखंड ग्राहक सेवा मिळते.

 

देशभरात प्रायोगिक तत्त्वावर अशाच प्रकारच्या फिजिटल शाखा सुरू करण्याचे बँकेचे लक्ष्य आहे. फिजिटल शाखा ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

 

 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE