एअरटेल डिजिटल टी.व्ही चा नवा प्लॅन ग्राहकांना ॲमेझॉन प्राइमचा फायदा देत आहे

 एअरटेल डिजिटल टी.व्ही चा नवा प्लॅन ग्राहकांना ॲमेझॉन प्राइमचा फायदा देत आहे  


रु. 508 पासून सुरू अमर्यादित मराठी लिनियर टी.व्ही आणि ॲमेझॉन प्राइम लाइटचे प्लॅन्स उपलब्ध करून दिले जात आहेत.

• आपल्या 'अल्टिमेट आणि ॲमेझॉन प्राइम लाइट' प्लॅनच्या रूपात, ॲमेझॉन प्राइम लाइटच्या फायद्यांसह एअरटेल डिजिटल टी.व्ही सबस्क्राइबर्सना 350+ लाइव्ह टी.व्ही चॅनल्स उपलब्ध करून देत आहे

 एअरटेल डिजिटल टी.व्ही ने आपल्या नवीन अल्टिमेट आणि ॲमेझॉन प्राइम लाइट प्लॅन यांच्या अंतर्गत लाइव्ह टी.व्ही आणि प्राइम लाइट फायदे उपलब्ध करून देण्यासाठी ॲमेझॉन प्राइम सोबत हातमिळवणी केली आहे. या प्लॅनच्या सबस्क्राइबर्सना एच.डी क्वालिटीच्या 2 डिव्हाइसवर प्राइम व्हिडिओमधून अप्रतिम मनोरंजनाचा आनंद उचलता येणार आहे आणि हे लिनियर टी.व्ही चॅनल्सचा आनंद घेण्याव्यतिरिक्त असणार आहे. प्राइम लाइट सबस्क्रिप्शन मध्ये इतर प्राइम फायदे सुद्धा सामील आहेत, जसे की 10 लाखांहून अधिक उत्पादनांवर मोफत अमर्यादित त्याच दिवशी डिलिव्हरी देणे आणि ॲमेझॉनवर 40 लाख+ उत्पादनांवर दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी देणे, विक्री कार्यक्रम आणि लाइटनिंग डील्स लवकर उपलब्ध होणे आणि ॲमेझॉन पे आय.सी.आय.सी.आय बँक क्रेडिट कार्डद्वारे Amazon.in वर खरेदी केल्यावर 5% कॅशबॅक.


एअरटेल डिजिटल टी.व्ही चे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिद्धार्थ शर्मा, म्हणाले की, "मोबाइल मनोरंजनात मागणी वाढत जात आहे आणि त्याने आम्हाला आमच्या टी.व्ही ऑफरचा विस्तार करण्यास प्रवृत्त केले आहे, आणि त्यामुळे ग्राहकांना कधीही, कोठेही ते उपलब्ध होत आहे. ॲमेझॉन प्राइम सोबत आमच्या भागीदारीमुळे आमची सामग्री श्रेणी (लाइनअप) वाढत चालली आहे आणि हे आमच्या विविध प्रकारच्या घरगुती मनोरंजन सेवांना पूरक ठरत आहे. आम्ही ग्राहकांना एक अप्रतिम अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत, ज्याची किंमत मराठी सामग्रीसाठी रु. 508 पासून सुरू होते. आमचे वापरकर्ते या आकर्षक डीलचे मूल्य जास्तीत जास्त वाढवतील, असे आम्ही ठामपणे मानतो. 

शिलांगी मुखर्जी, संचालक आणि प्रमुख, एस.व्ही.ओ.डी बिझनेस, प्राइम व्हिडिओ, इंडिया म्हणाल्या की, "प्राइम व्हिडिओ येथे, आम्ही सतत असे मार्ग शोधत असतो ज्याद्वारे आमचे वितरण मजबूत होईल आणि आमचे खूप आवडलेले चित्रपट व मालिका अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. एअरटेल डिजिटल टी.व्ही सोबत सहकार्य केल्याने प्राइम व्हिडिओची संपूर्ण सामग्री निवडणे अधिक सुलभ होत आहे, आणि त्याच वेळेस प्राइम लाइटचे इतर शॉपिंग आणि शिपिंग फायदे प्रदान करत आहे, जसे की लाखो उत्पादनांमध्ये अमर्याद मोफत 'त्याच दिवशी /दुसऱ्या दिवशी' डिलिव्हरी देणे, खास डील्स लवकर उपलब्ध होणे, आणि बरेच काही. भारतातील ग्राहकांसाठी प्रीमियम करमणूक अधिक सुलभ करणे हे या सहकार्याचे उद्दीष्ट आहे.

या ऑफर दिल्याने एअरटेलने 350+ टी.व्ही चॅनल्स अमर्याद उपलब्ध करून देण्यासह घरगुती मनोरंजनात सुधार करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे आणि त्यात प्राइम व्हिडिओवर उपलब्ध ओव्हर-द-टॉप (ओटीटी) सामग्री सामील असून ग्राहकांच्या वाढत्या करमणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वंकष तोडगा काढलेला आहे.

प्राइम व्हिडिओचे चित्रपट आणि मालिका यांची संपूर्ण निवड निरंतर पद्धतीने उपलब्ध होण्यासह ग्राहकांना अखंड स्ट्रीमिंग अनुभवाचा आनंद उचलता येईल ज्यात सामील आहेत अत्यंत लोकप्रिय ओरिजिनल मालिका जसे की मिर्झापूर, पंचायत, द फॅमिली मॅन, धूथा, इन्स्पेक्टर ऋषी, ब्लॉकबस्टर चित्रपट टायगर 3, कंतारा, माजा मा, बवाल, तेरी बातों में ऐसा उल्झा जिया आणि बरेच काही, काही आंतरराष्ट्रीय मालिका आणि चित्रपटांची नावे सांगायची तर फॉलआउट, सिटाडेल, द लॉर्ड ऑफ द रिंग्स : द रिंग्स ऑफ पॉवर, द बॉईज यात सामील आहेत. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE