देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत ‘जिटो’चे मोलाचे योगदान : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत 

‘जिटो’चे मोलाचे योगदान : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन


जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जिटो) च्या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्यासमवेत सहभागी मान्यवर डावीकडून उजवीकडे श्री. सुखराज नाहर, वरिष्ठ चेअरमन, श्री. कांतीलाल ओस्वाल, जिटो अध्यक्ष आणि श्री. मनोज मेहता - वरिष्ठ महासचिव. 

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जिटो) च्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन जिओ  सेंटर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन बोलत होते. या कार्यक्रमास जिटोचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन च्या उल्लेखनीय कामगिरीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. संघटनेने व्यवसाय वाढीसाठी उभारलेले नेटवर्क, कोरोना महामारीच्या काळात दिलेली आरोग्यसेवा, शिक्षण क्षेत्रात केलेली मदत, युवकांना रोजगार मिळावा यासाठी उपलब्ध करून दिलेली संधी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात गरजूंना केलेली निःस्वार्थ मदत हे अमूल्य योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल म्हणाले की, जिटो ने दाखवून दिले आहे की जेव्हा व्यवसाय आणि व्यक्ती योग्य हेतूने आणि उद्देशाने एकत्र येतात, तेव्हा ते एकाच वेळी व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रगती साधून समाजाच्या भल्यासाठी योगदान देऊ शकतात. जिटो ने त्याच उत्साहाने आणि वचनबद्धतेने त्यांचे मिशन सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. संस्थेने सुरु केलेले ‘शिका, कमवा आणि परत द्या’ हे कार्य आणि समर्पण असंख्य व्यक्ती व समुदायांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाप्रसंगी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या यश आणि प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. संघटनेत काम करून समाजाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाजाचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE