सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीची आयपीओ ऑफर 5 नोव्हेंबर 2024 पासून, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 28/- ते रु. 30/-
सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीची आयपीओ ऑफर 5 नोव् हेंबर 2024 पासून , प्राईस बँड प्रतिसमभाग रु . 28/- ते रु . 30/- अमेरिकेच्या आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध ग्राहक कंपन्यांना तंत्रज्ञान आधारित बिझनेस सोल्यूशन्स व सेवा पुरवणारी प्रख्यात कंपनी सॅजिलिटी इंडिया लिमिटेडने आगामी आयपीओ अर्थात खुल्या समभाग विक्रीसाठी प्रतिसमभाग रु . 28/- ते रु . 30/- असा प्राईस बँड जाहीर केला आहे . कंपनीच्या प्रत्येक समभागाचे फेस व् हॅल्यू मूल्य रु . 10/- आहे . कंपनीची समभाग विक्री येत्या मंगळवार दिनांक 5 नोव् हेंबर 2024 रोजी सुरु होईल व गुरुवार दि . 7 नोव् हेंबर 2024 रोजी बंद होईल . इच्छुक गुंतवणूकदार किमान 500 समभाग व त्यापुढे 500 च्या पटीत समभागांसाठी बीड करु शकतील . संपूर्ण आयपीओ ऑफर फॉर सेल असून त्या अंतर्गत एकूण 702.20 दशलक्ष समभाग प्रमोटर सेलींग शेअरहोल्डर सॅजिलिटी बी . व् ही . कडून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत . कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यातून बीड करणाऱ्या पात्र कर्मचाऱ...