सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीची आयपीओ ऑफर 5 नोव्‍हेंबर 2024 पासून, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 28/- ते रु. 30/-

 

सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीची आयपीओ ऑफर 5 नोव्हेंबर 2024 पासून, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 28/- ते रु. 30/-



अमेरिकेच्या आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध ग्राहक कंपन्यांना तंत्रज्ञान आधारित बिझनेस सोल्यूशन्स सेवा पुरवणारी प्रख्यात कंपनी सॅजिलिटी इंडिया लिमिटेडने आगामी आयपीओ अर्थात खुल्या समभाग विक्रीसाठी प्रतिसमभाग रु. 28/- ते रु. 30/- असा प्राईस बँड जाहीर केला आहे. कंपनीच्या प्रत्येक समभागाचे फेस व्हॅल्यू मूल्य रु. 10/- आहे.

कंपनीची समभाग विक्री येत्या मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी सुरु होईल गुरुवार दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल. इच्छुक गुंतवणूकदार किमान 500 समभाग त्यापुढे 500 च्या पटीत समभागांसाठी बीड करु शकतील.

संपूर्ण आयपीओ ऑफर फॉर सेल असून त्या अंतर्गत एकूण 702.20 दशलक्ष समभाग प्रमोटर सेलींग शेअरहोल्डर सॅजिलिटी बी. व्ही. कडून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यातून बीड करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रतिसमभाग रु. 2/- सवलत देवून समभाग देण्यात येतील.

सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी ही केवळ आरोग्यसेवा क्षेत्रांसाठीच सेवा पुरवणारी कंपनी असून कंपनीच्या ग्राहकांमध्ये अमेरिकेतील आरोग्य विमा कंपनी पेअर्सचा समावेश आहे. पेअर्स कंपनी आरोग्य सेवा खर्च भरपाई करुन देणारी कंपनी आहे. तसेच अमेरिकेतील प्राथमिक हॉस्पिटल्स, फिजिशिअन्स, डायग्नॉस्टिक्स मेडीकल डिव्हायसेस कंपन्यांचा देखील सॅजिलिटी इंडिया कंपनीच्या ग्राहकांमध्ये समावेश आहे.

पेअर्स कंपनीच्या प्रचाललनातील विविधि टप्प्यांवर सॅजिलिटीची सेवा उपयुक्त् ठरते. त्यात विमा दावे व्यवस्थापन, कंपनी प्रशासन, नवग्राहक जोडणी, बेनिफिट प्लान आखणी, प्रिमिअम बिलींग, क्रेडेन्शिअलिंग, डेटा मॅनेजमेंट, क्लिनिकल फंक्शन्स जसे युटिलायझेशन मॅनेजमेंट, केअर मॅनेजमेंट आणि पॉप्युलेशन हेल्थ मॅनेजमेंट या विविध टप्प्यांचा समावेश आहे.

तसेच सॅजिलिटीच्या प्रोव्हायडर्सना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट फंक्शन्स उदाहरणार्थ फायनान्शिअल क्लिअरन्स, मेडीकल कोडींग, बिलींग, अकाउंट रिसिव्हेबल्स फॉलोअप सेवा यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, पेअर्स कंपनीला दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये फार्मसी बेनिफिट मॅनेजर्स (पीबीएमएस) सेवेचा समावेश आहे. या सेवे अंतर्गत विमाधारणक ग्राहकांना प्रिस्क्राईब्ड औषधे दिली जातात. कंपनी आपल्या मंचाचा अन्य साधनांचा वापर करुन ही सेवा देते. त्यासाठी कंपनीची जागतिक पातळीवर पाच टॅलेंट पूल केंद्र आहेत. ही केंद्र भारत, फिलिपाईन्स, अमेरिका, जमैका, कोलंबिया या देशांमध्ये आहेत.

सॅजिलिटी कंपनीने 2024 आर्थिक वर्षात पेअर कंपनीला 105 दशलक्ष विमा दाव्यांची प्रक्रिया करण्यास मदत केली तसेच 75 दशलक्ष सदस्य प्रोव्हायडरना संवाद साधण्यास मदत केली आहे. शेअरबाजारात सूचीबद्ध असलेली  आणि अमेरिकेतील आरोग्य सेवा कंपन्यांना अशा प्रकारची सेवा देणारी एकही कंपनी भारतात सध्या तरी नाही.

30 जून 2024 रोजी पर्यंतच्या माहितीनुसार, सॅजिलिटी कंपनीमध्ये एकूण 35,858 कर्मचारी असून त्यापैकी 60.53% महिला आहेत. 30 जून 2023 रोजी कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 33,575 होती.

2024 आर्थिक वर्षात सॅजिलीटी इंडियाचा रिस्टेटेड प्रचालन महसूल 12.69 % वाढून 4,753.56 कोटी रुपये झाला आहे जो आधीच्या वर्षी रु. 4,218.41 कोटी होता. कंपनीच्या विद्यमान ग्राहकांडून वाढीव मागणी आल्यामुळेच कंपनीच्या महसूलात ही वाढ झाली आहे. तसेच 2024 साली काही नव्या एसओडब्ल्यूंची देखील भर पडली आहे. त्याचप्रमाणे कंपनीचा करोत्तर नफा (पीएटी) 2024 साली तब्बल 58.99 % टक्के वाढून 228.27 कोटी रुपये झाला आहे जो 2023 साली रु. 143.57 कोटी होता.

30 जून 2024 रोजी समाप्त तिमाहीत कंपनीला प्रचालन महसूल रु. 1,223.33 कोटी मिळाला असून त्यायोगे रु. 22.29 कोटी करोत्तर नफा झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE