युग्रो कॅपिटलकडून 10,000 कोटी रुपयांच्या एयूएमचा महत्वपुर्ण टप्पा पार, 10K सेलिब्रेशन रन उपक्रमाचा शुभारंभ आणि यूग्रो स्फूर्तीगीताचे अनावरण

 युग्रो कॅपिटलकडून 10,000 कोटी रुपयांच्या एयूएमचा महत्वपुर्ण टप्पा पार, 10K सेलिब्रेशन रन उपक्रमाचा शुभारंभ आणि यूग्रो स्फूर्तीगीताचे अनावरण

एआय आधारित प्रेरणादायी गाण्यातून कंपनीच्या वाटचालीचा जल्लोष, यशाच्या या टप्प्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्याचे तसेच नवीन उद्दीष्ट गाठण्याची कर्मचाऱ्यांना या गाण्यातून मिळतेय प्रेरणा 

मुंबई, 04 ऑक्टोबर 2024: एमएसएमई क्षेत्रासाठी कर्ज वितरणावर आपले लक्ष केंद्रित करणारी आघाडीची डेटाटेक एनबीएफसी वित्तसंस्था असलेल्या युग्रो कॅपिटल लिमिटेडने व्यवस्थापनांतर्गत असलेली मालमत्ता अर्थात एयूएमसाठी 10,000 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला असल्याची घोषणा अतिशय अभिमानाने  केली आहे. एमएसएमईला सक्षम करण्याची युग्रोची वचनबद्धता या कामगिरीतून अधोरेखित होते, परंतु त्याचबरोबर 3,500 कर्मचाऱ्यांचे सामूहिक प्रयत्नही ठळकपणे दिसून येतात. 2022 मध्ये कोविड-19 महामारीनंतर केवळ 1,700 कोटी रुपयांच्या एयूएमवरून युग्रोने विक्रमी वेळेत ही भरारी घेतली आहे. एक मोठा टप्पा गाठताना भारतातील सर्वात मोठी लघु व्यवसाय वित्तपुरवठा वित्तसंस्था बनण्याच्या दिशेने युग्रो कॅपिटलने आपला प्रवास सुरू ठेवलेला आहे. या यशासाठी भागीदार, भागधारक आणि कर्मचाऱ्यांचे पाठबळ कंपनीला लाभलेले आहे.

कार्यक्षम कर्ज पुरवठ्याव्दारे एमएसएमईचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या यूग्रो कॅपिटलने संपूर्ण भारतातील 1 लाखांहून अधिक मध्यम, लघु आणि सुक्ष्म अर्थात एसएमएमईला आर्थिक सहाय्य प्रदान केलेले आहे. या यशाच्या स्मरणार्थ, यूग्रो कॅपिटलने यूग्रो 10 के सेलिब्रेशन रन हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे, ही एक व्हर्च्युअल मॅरेथॉन मोहीम आहे.  आपल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि कल्याण वाढवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आपल्या वाटचालीत पुढील टप्प्यासाठी तयारी करत असताना वैयक्तिक आरोग्य आणि व्यावसायिक यश यांच्यात समतोल राखण्याचे महत्त्व कंपनी जाणून आहे. कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या यूग्रो स्फूर्गीताचे अनावरण कंपनीने केले आहे. एआयच्या सामर्थ्याचा वापर करून संपूर्णपणे कंपनीतच तयार करण्यात आलेले हे स्फूर्तीगीत कंपनीचा आत्मा, संस्कृती आणि भविष्यासाठीची तिची सामायिक दृष्टी प्रतिबिंबित करते. हे स्फूर्तीगीत युग्रोच्या कर्मचाऱ्यांना धावण्याची स्फूर्ती देते. तसेच त्यांना उच्च ध्येय गाठण्यास प्रवृत्त करते. त्याचबरोबर एकत्रितपणे ते कोणत्याही आव्हानावर मात करू शकतात, ही शिकवणही हे गीत बिंबवते.  

यूग्रो स्फूर्तीगीत हे सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचे एक अद्वितीय मिश्रण आहे आणि ते कंपनीच्या भविष्यकालीन विचारांच्या दृष्टिकोनाचे एक प्रतीक आहे. हे प्रेरणादायी गीत निव्वळ गाणेच नसून त्यापेक्षाही अधिक योगदान देणारा एक आविष्कार आहे; हे गीत म्हणजे आतापर्यंत कंपनीने केलेल्या वाटचालीचा आनंदोत्सव आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी कृती करण्यासाठी एक प्रेरक आवाहनही आहे. या स्फूर्तीगीतासाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कल्पना आणि शब्द यांचे योगदान दिलेले आहे, त्यातून त्यांची सामूहिक प्रतिभा प्रदर्शित होताना ते सामायिक हेतूने एकत्र आल्याचे दिसून येते. या स्फूर्तीगीताने कंपनीत गतीशीलता भिनवली आहे आणि देशभरातील नागरिकांना प्रेरित करण्यासाठी हे गीत लवकरच सार्वजनिकरित्या प्रदर्शित केले जाणार आहे.

येत्या 27 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या या भव्य 10 किलोमीटर व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये यूग्रोचे देशभरातील कर्मचारी हेल्थ ॲपवर एकत्र येऊन आनंद साजरा करताना दिसणार आहेत. मॅरेथॉनमध्ये यूग्रोने 3 किमी, 4 किमी, आणि 5 किमी व्हर्च्युअल टप्प्यांची मालिका आयोजित केली आहे. हे टप्पे निरोगी स्पर्धा, सूचना आणि प्रोत्साहनाद्वारे सांघिक भावनेला प्रोत्साहन देते. या उपक्रमाद्वारे, यूग्रोने 10,000 किलोमीटरहून अधिक क्षेत्र एकत्रितपणे गाठण्याचे उद्दिष्ट आखलेले आहे. हे उद्दीष्ट निरंतर वाढ आणि कल्याणासाठीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. ही मॅरेथॉ़नरुपी मोहीम दिवाळीपर्यंत सुरू राहील, सहभागी होणाऱ्या व्यक्तींना धावण्यासाठी तसेच आरोग्यासाठी आवश्यक उपकरणे आणि वस्तूरुपी बक्षीस दिले जाणार आहे.

कंपनीने साध्य केलेल्या या महत्त्वपूर्ण कामगिरीवर भाष्य करताना, यूग्रो कॅपिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री शचिंद्र नाथ (Shachindra Nath) म्हणाले, “आम्ही 2018 मध्ये भारतातील पहिले सूचीबद्ध स्टार्टअप म्हणून यूग्रो कॅपिटलची संकल्पना मांडली. गेल्या 6 वर्षांमध्ये, आम्ही आयएल अॅण्ड एफएसच्या क्रेडिट संकटाशी संबंधित तीन वर्षे तर कोवीड 19 मुळे तीन वर्ष गमावली. तथापि, आमच्या कर्मचाऱ्याच्या टीमने भारतातील छोट्या व्यवसायांसाठी कर्जाची समस्या सोडवण्यासाठी यूग्रोच्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवला. अवघ्या तीन वर्षात 10,000 कोटी रुपयांचा एयूएम टप्पा ओलांडणे, ही यूग्रो कॅपिटलसाठी खरोखरच एक जबरदस्त कामगिरी आहे. हे यश आमच्या कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न आहेत. त्याचबरोबर आमचे भागीदार, एमएसएमई आणि 60 पेक्षा अधिक कर्जदार, सह-कर्जातील भागीदार आणि जागतिक विकास वित्तीय संस्था यांच्या अतुलनीय पाठबळाचे प्रतिबिंबसुध्दा या यशात उमटलेले आहे. आम्हाला लाभलेले संयमी गुंतवणूकदार, सार्वजनिक भागधारक आणि आमच्या संचालक मंडळ या सर्वांचा पाठिंबा लाभलेला आहे. भारतातील सर्वात मोठी लघु व्यवसाय वित्तपुरवठा संस्था बनण्याच्या मार्गावर वाटचाल करत असताना, आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणावरही लक्ष केंद्रित करायचे आहे. यूग्रो 10 के सेलिब्रेशन रन हा आरोग्यदायी कार्य आणि जीवन यांच्यात संतुलनाचे महत्त्व अधिक दृढ करण्याचा आमचा एक खास मार्ग आहे. आम्ही पुढील उद्दीष्ट निर्धारित करत असताना  आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करत आहोत.”

यूग्रो कॅपिटल 10 के सेलिब्रेशन रन आणि यूग्रो स्फूर्तीगीत कंपनीची प्रगती, ऐक्य आणि आरोग्यासाठीच्या समर्पणाचे प्रतिनिधित्व करते. भारताच्या एमएसएमई क्षेत्रासाठी योगदान देत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा, मूल्य आणि प्रेरणा देणारे एक भरभराटीयुक्त कार्यस्थळ निर्माण करण्यावर यूग्रोचे लक्ष या विविध उपक्रमांमुळे केंद्रित होते. त्यातून देशाची सर्वात मोठी लघु व्यवसाय वित्तपुरवठा वित्तसंस्था बनण्याच्या दिशेने युग्रोची निरंतर वाटचाल सुरू आहे. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE