वारी एनर्जीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 21 ऑक्टोबर 2024 पासून सुरू


 वारी एनर्जीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 21 ऑक्टोबर 2024 पासून सुरू

 

·         वारी एनर्जीज लिमिटेड (“कंपनी) च्या प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 1,427 रुपये ते 1,503 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित

·         प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख शुक्रवार 18 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

·         बोली/ऑफर सोमवार 21 ऑक्टोबर 2024 रोजी खुली होईल आणि बुधवार 23 ऑक्टोबर 2024 रोजी बंद होईल.

·         बोली किमान 9 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 9 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

·         14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसची

वारी एनर्जीज लिमिटेड (“कंपनी) इक्विटी शेअर्सची (“ऑफर) प्राथमिक समभाग विक्री सोमवार 21 ऑक्टोबर 2024 पासून सुरू करत आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख एक कार्यालयीन दिवस आधीची शुक्रवार 18 ऑक्टोबर 2024 असणार आहे. बोली/ऑफर बुधवार 23 ऑक्टोबर 2024 रोजी बंद होईलऑफरचा किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअरसाठी 1,427 रुपये ते 1,503 रुपये पर्यंत निश्चित करण्यात आला आहेबोली किमान 9 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 9 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

या ऑफरमध्ये 36,000 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू) आणि 4,800,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची (“ऑफर केलेले शेअर्स) ऑफर फॉर सेल आहे. त्यामध्ये 4,350,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स वारी सस्टेनेबल फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (प्रवर्तक विक्री समभागधारक”); आणि 450,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स चंदुरकर इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (इतर विक्री समभागधारकआणि प्रवर्तक विक्री समभागधारकांसह एकत्र, “विक्री समभागधारकआणि विक्री समभागधारकद्वारे इक्विटी शेअर्सची विक्रीसाठीची ऑफर, “ऑफर फॉर सेल”) समाविष्ट आहे. या ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांद्वारे (“कर्मचारी राखीव हिस्सा) सबस्क्रीब्शनसाठी काही संख्येने इक्विटी शेअर्सचा राखीव हिस्सा समाविष्ट आहे. कर्मचारी राखीव हिस्स्याशिवाय असलेली ऑफर यापुढेनेट ऑफरम्हणून ओळखली जाते.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) 1957 च्या (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या 19(2)() सुधारित नियमावलीनुसार  ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (QIBs) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investor Portion) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी ("प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत") राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”). ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE