टॅफ़ेने भारतातील मॅसे फ़र्ग्युसन ब्रॅन्डचा योग्य तो मालकी हक्क सांगितला; एजीसीओ (AGCO) चा विरोधात कोर्टात याचिका दाखल.



टॅफ़ेने भारतातील मॅसे फ़र्ग्युसन ब्रॅन्डचा योग्य तो मालकी हक्क सांगितला; एजीसीओ (AGCO) चा विरोधात कोर्टात याचिका दाखल.


एजीसीओ(AGCO’s) चा दाव्यांचे खंडन केले 

टॅफ़ेची ६५ वर्ष- मॅसे फ़र्ग्युसनचा ग्राहकांना स्थिर सेवा 

२ दशलक्षा पेक्षा अधिक टॅफ़ेने डिझाईन केलेली एमएफ़ ट्रॅक्टर्स 

 १९६० साली सुरवात झाल्यापासून, टॅफ़ेने मॅसे फ़र्गुसन ब्रॅन्डकरिता सखोल संशोधन आणि विकास विभागासह गुणवत्ता नियंत्रणाचा माध्यमाने भारतातील बाजारपेठेकरिता ५०० पेक्षा अधिक मॅडेल्सची निर्मीती, रचना आणि काळजी घेण्याचे काम केले आहे.  एकूण वार्षिक उत्पादनाचा विचार केला तर १८०,००० ट्रॅक्टर्स आणि  १००,००० पेक्षा अधिक मॅसे फ़र्ग्युसनचा उत्पादनांची निर्मीती टॅफ़े द्वारे भारतात करण्यात येत आसून या मध्ये ३ दशलक्ष समाधीनी ग्राहकांची साथ आम्हाला मिळाली आहे. भारतात टॅफ़े आणि मॅसे फ़र्ग्युसन यांना हातात हात घालून नेहमीच एकत्र बघितले गेले आहे. 

भारतात टॅफ़े क्रमांक दोनचा सर्वात मोठा उत्पादक असून जगातील तीसऱ्या क्रमांकाचा उत्पादक आहे, ज्यांनी स्वत:ची एक ओळख आणि छाप तर निर्माण केलीच आहे पण त्याही पलिकडे जाऊन भारतासह इतर ८० आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतकऱ्य़ंचा विश्वास आणि उत्पादनांप्रती विशेष विशवसनीयता निर्माण केली आहे. टॅफ़ेला असंख्य असे प्रगतीसाठीचे पुरस्कार आणि पार्ट सप्लाय साठी समाधानाची थाप ही ग्राहक, उद्योग क्षेत्र, प्रसार माध्यम आणि शासनाकडून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर गुणवत्ता आणि ग्राहकांचा समाधानाकरिता मिळाली आहे. 

टॅफ़ेची उत्पादने ही भारत-केंद्रित रचनांवर आधारीत असतात, विशेषत: एजीसीओ (AGCO’s) च्या उत्पादानांपासून वेगळी तसेच खास करून भारतासह जगभरातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांकरिता सुयोग्य ठरतील अशी असतात. एजीसीओ (AGCO’s) जागतिक ब्रॅन्डचा संकेतस्थळाने १९६० सालापासून टॅफ़ेने मॅसे फ़र्ग्युसनला टेक ओव्हर केल्यानंतर ऐतिहासिक पद्धतीने सहा दशकात भारत, नेपाळ आणि भूतानचा अनुषंगाने उल्लेख देखील केलेला नाही. 

टॅफ़ेने एजीसीओ(AGCO) कॉर्पोरेशनमध्ये आपले शेअर्स २०१२ सालापासून घेतले आणि आता तो सर्वात मोठा शेअर होल्डर आणि  धोरणात्मक दीर्घ-कालीन गुंतवणूकदार बनला आहे. यामुळे कंपन्यांचा एकत्रित नात्यांना अधिक बळ मिळाले आहे, आणि टॅफ़े आणि एजीसीओ  (AGCO) ने “करारनाम्याचा पत्रावर” स्वाक्षरी केली ज्यामुळे गेल्या दशकामध्ये  एजीसीओ(AGCO) ला स्थिर समर्थनाची हमी मिळाली.

एजीसीओ (AGCO) चा कॉर्पोरेट कार्यकारीणीमधील त्रुटी, भागधारकांसोबत पूर्णत: अपुरी सहभागिता आणि प्रमुख क्षेत्रांमधील आर्थिक आणि कार्यकारी कामगिरी आणि एजीसीओ (AGCO ) चा वारंवार लक्ष वेधणाऱ्या समस्यांकडे लक्ष देण्या ऐवजी टॅफ़ेचा धोरणात्मक प्रभाव वाढल्याने एजीसीओ (AGCO ) ने   टॅफ़ेची क्षमता कमी करण्याचा प्रयत्न केला. सहा दशकांपेक्षा अधिक काळ निर्विवाद या क्षेत्रात राहिलेल्या ब्रॅन्डचा वापरासंदर्भात वादग्रस्त आणि चुकीचा सल्ल्याने पाऊले उचलली गेली. 

टॅफ़ेने मालकी हक्कावरती आपला दावा केला असून मॅसे फ़र्ग्युसन ब्रॅन्डचा मालकी संदर्भात मद्रास उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे. चेन्नईचा व्यावसायिक न्यायालने टॅफ़ेचा बाजूने निकाल दिला असून मॅसे फ़र्ग्युसन ब्रॅन्डचा विरोधात स्थगिती दिली आहे; या संदर्भात कोणत्याही पक्षाने २९ एप्रिल २०२४ पासून कोणत्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर ते न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्याचे समजले जाईल. टॅफ़ेने एजीसीओ (AGCO) चा विरोधात चेन्नई येथील याचिकेअंतर्गत दिलेला आदेश मान्य केला नाही म्हणून याचिका दाखल केली आहे.

टॅफ़े ट्रॅक्टर्स हा टॅफ़े- ट्रॅक्टर्स ॲन्ड फ़ार्म इक्विपमेंट लिमिटेडचा सिग्नेचर ब्रॅन्ड असून; ही भारतीय ट्रॅक्टरमध्ये व्यवसाय करणारी १९६० मध्ये चेन्नई येथे स्थापन झालेली कंपनी आहे, ज्याचा वार्षिक महसूल हा साधारणपणे १.६ अब्ज एवढा अमेरिकी चलनानुसार आहे. जगातील सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादन आणि भारतात दुसऱ्या क्रमांकाची उत्पादन क्षमता असलेला हा ब्रॅन्ड आहे, टॅफ़ेद्वारे १८०,००० ट्रॅक्टर वर्षाला विकली जातात. 

टॅफ़ेने आपल्या ग्राहकांचा विश्वास हा विविध उत्पादनांचा श्रेणीने जिंकला असून, त्यांची गुणवत्ता आणि कमी किंमतीमधील कार्यक्षमता ही त्यांची जमेची बाजू आहे. टॅफ़ेचे सुमारे २,००० डिलर्स परिणामकारक पद्धतीने- मॅसे फ़र्ग्युसन, टॅफ़े, आयशर ट्रॅक्टर्स आणि आयएमटी या चार ब्रॅन्डकरिता सहकार्य प्रदान करतात. टॅफ़ेद्वारे ८० देशात ट्रॅक्टर्सची निर्यात केली जाते ज्यामुळे आशीय, अफ़्रिका, युरोप, अमेरिका आणि रशीयाचा शेतकऱ्यांचे सबळीकरण होते. 

ट्रॅक्टर्सचा पलिकडे जाऊन टॅफ़े आणि त्यांचा सबसिडरींनी आपल्या व्यवसायामध्ये वैविध्यता आणली आहे जसे शेतीय साधने, डिझेल इंजिन आणि जेन्सेट, ॲग्रो-इंडस्ट्रीयल इंजिन, इंजिनियरिंग प्लास्टिक्स, गेअर्स आणि ट्रान्समिशनचे घटक, हॅड्रॉलिक पंप आणि सिलेंडर्स, वाहन फ़्रेन्चायझी आणि प्लान्टेशन्स. 

टॅफ़ेची टोटल क्वॉलिटी मॅनेजमेंट (टीक्यूएम) प्रती बांधिलकी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, टॅफ़ेचा उत्पादन प्लान्ट्सनी “टीपीएम एक्सलन्स”( ‘TPM Excellence’) पुरस्कार जपान इन्स्टिट्युट ऑफ़ प्लान्ट मेन्टेनन्स (JIPM) कडून मिळविले आहेत. आयटीओटीवाय २०२४, (ITOTY 2024), टॅफ़ेमध्ये- मॅसे फ़र्ग्युसन एमएफ़८०५५ ला व्यावसायिक स्तरावरती वापराकरिता सर्वोत्तम  ट्रॅक्टर आणि एमएफ़६०२८ मॅक्सप्रोला सर्वोत्तम बागायती ट्रॅक्टर म्हणून गौरविण्यात आले होते. २०२३ साली , टॅफ़ेने “लॉन्च ऑफ़ द इयर” पारितोषिक आपल्या आयशर प्रायमा जी३ श्रेणीचा ट्रॅक्टर्सकरिता मिळविले होते यासह इतर तीन पारितोषिके ज्यात “बेस्ट सीएसआर इनिशियेटिव” जेफ़ार्म सर्व्हिसेस करिता, चौथ्या  इंडियन ट्रॅक्टर ऑफ़ द ईयर (ITOTY) अवार्ड, २०२३ चा देखील समावेश होता. कमिशनर ऑफ़ कस्टम्सकडून देखील त्यांना टॉप एक्सपोर्टर अवार्ड देण्यात आला होता. 

टॅफ़े जे-रिहॅबला तमिळनाडू शासनाकडून २०२२ ऑगस्टमध्ये “वेल्फ़ेअर ऑफ़ डिफ़्रन्टली-एबल्ड पर्सन्स”  म्हणून  “बेस्ट प्रायवेट एम्प्लॉयर अवार्ड” ने गौरविण्यात आले. टॅफ़ेचा मदुराई , दोडाबल्लापूर युनिट आणि जे-रिहॅब केंद्राल क्वॉलिटी कन्सेप्ट्स २०१९ चे विविध गोल्ड अवार्ड देखील मिळाले आहे, हा सम्मान त्यांच्या गुणवत्तेप्रती असलेल्या बांधिलकीकरिता देण्यात आला होता. सुरक्षा नियमकांचे कडक पद्धतीने पालन करण्याकरिता सेम्बियम प्लान्टला सेफ़्टी अवार्ड्स २०१९ साठी चार पुरस्कार हे  औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, तमिळनाडू सरकारचा संचालकांकडून देण्यात आले. “उन्नथ सुरक्षा पुरस्कार” सेफ़्टी अवार्ड २०१९ हा टॅफ़े दोडाबल्लापूर प्लान्टला राष्ट्रीय सुरक्षा मंडळाद्वारे प्रदान करण्यात आला. 

२०१८ साली, टॅफ़े हा पहिला असा ट्रॅक्टर उत्पादनकर्ता होता ज्यांना फ़्रॉस्ट ॲन्ड सुलिवन ग्लोबल मॅन्युफ़ॅक्चरिंग लिडर्शीप अवार्ड आणि “एन्टरप्राईज इंटिग्रेशन ॲन्ड टेक्नॉलॉजी लीडरशिप” अवार्ड तसेच “सप्लाय चेन लीडरशिप” अवार्डने गौरविण्यात आले. आपल्या उत्तम अशा इंजिनियरिंग निर्यातीकरिता टॅफ़ेला “स्टार पर्फ़ॉर्मर- लार्ज एन्टरप्राईज ( शेतीय ट्रॅक्टर्स) म्हणून इंजिनियरिंग एक्स्पोर्ट्स प्रमोशन काऊन्सिल इंडिया- दक्षिण विभागाअंतर्गत सातत्याने २३व्यांन्दा गौरविण्यात आले. 

टॅफ़ेचा ट्रॅक्टर प्लान्ट्सला उत्तम गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीकरिता आयएसओ ९००१ ने प्रमाणित केले आहे तसेच पर्यावरण पूरक कामाकरिता आयएसओ १४००१ ने प्रमाणित केले आहे. 


                       

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE