बँक ऑफ बडोदातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ २०२४ उपक्रमाचा भाग म्हणून देशभरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन

 बँक ऑफ बडोदातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ २०२४ उपक्रमाचा भाग म्हणून देशभरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन

- बँकेच्या २२ झोनल ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा सहभाग 

- महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये कचरा साफ करणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल व त्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन यांचा समावेश 


भारत सरकारने स्वच्छता ही सेवा २०२४ कॅम्पेनचे आयोजन केले असून, ते ‘स्वभाव- स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेवर आधारित आहे. २ ऑक्टोबर २०२४ रोजी असलेल्या स्वच्छ भारत दिवस २०२४ दिनानिमित्त १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. 

या कॅम्पेनद्वारे स्वच्छता चालना देण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून, अवघड आणि अस्वच्छ जागांचे रुपांतर करण्यावर - क्लीनलीनेस टार्गेट युनिट्स (सीटीयूज) भर देत स्वच्छ व हरित पर्यावरणाप्रति योगदान देण्याची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली आहे. या देशव्यापी कॅम्पेनचा भाग म्हणून बँक ऑफ बरोडाने वृक्षारोपण सीरिज, वॉक अ थॉन, सफाई मित्रांसाठी आरोग्य आणि स्वास्थ्य शिबिर यांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतून सफाई मित्रांद्वारे बँकेच्या देशभरातील शाखा व कार्यालयांसाठी दिल्या जाणाऱ्या योगदानाची दखल घेतली जाणार आहे. 

‘संपूर्ण स्वच्छता श्रमदानातून’ या ध्येयाप्रति बांधिलकी जपण्यासाठी बँकेने देशभरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. या कॅम्पेनच्या दरम्यान बँकेतर्फे ‘सफाईमित्र सुरक्षा शिबिर’ हे एकखिडकी आरोग्य व स्वास्थ्य शिबिर देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययजोना पुरविणार आहे. बँकेने सफाई कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन केले आहे. 

बँक ऑफ बरोडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देबदत्त चंद, कार्यकारी संचालक श्री. लाल सिंग आणि श्रीमती बीना वहीद, प्रमुख व्हिजिलन्स अधिकारी, श्री. सुरेंद्र कुमार दीक्षित, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि सदस्यांनी मुंबईत स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता कॅम्पेनचा शुभारंभ केला. 

‘संपूर्ण स्वच्छता’ अभियानासाठी सफाई कर्मचारी देत असलेल्या योगदानाची दखल घेण्यासाठी बँकेने मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन विभाग, बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन (बीएमसी) येथील टीमचा सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE