दक्षिण मुंबईमध्‍ये पायाभूत सुविधांच्‍या सुधारणांमुळे प्रीमियम कार्यालयांसाठीच्या मागणीला गती मिळणार; नरिमन पॉइण्‍ट प्रमुख व्‍यावसायिक हब दर्जा पुन्‍हा प्राप्‍त करणार: नाइट फ्रँक इंडिया

 दक्षिण मुंबईमध्‍ये पायाभूत सुविधांच्‍या सुधारणांमुळे प्रीमियम कार्यालयांसाठीच्या मागणीला गती मिळणार; नरिमन पॉइण्‍ट प्रमुख व्‍यावसायिक हब दर्जा पुन्‍हा प्राप्‍त करणार: नाइट फ्रँक इंडिया


दक्षिण मुंबईत पुढील ६ ते ८ वर्षांमध्‍ये ४ ते ६ दशलक्ष चौरस फूट मिक्‍स्‍ड-युज कार्यालयीन जागेची भर होण्‍याची अपेक्षा आहे

नरिमन पॉइण्‍टमधील कार्यालयीन भाडे २०१८ पासून २०२४ च्‍या पहिल्‍या सहामाहीपर्यंत ५२ टक्‍क्‍यांनी वाढून प्रतिचौरस फूट ५६९ रूपयांवर पोहोचले


नरिमन पॉइण्‍टमधील सर्वाधिक भाडे सध्‍या प्रतिचौरस फूट ५६९ रूपयांवरून २०३० पर्यंत प्रतिचौरस फूट १,०९१ रूपयांपर्यंत वाढेल, ज्‍यामधून क्षेत्रातील प्रीमियम कार्यालयीन जागेसाठी प्रबळ मागणी दिसून येते.  


नाइट फ्रँक इंडियाचा नवीन अहवाल ‘साऊथ मुंबई - ए रेनेसान्‍स' निदर्शनास आणतो की, पायाभूत सुविधांमध्‍ये सुरू असलेल्‍या सुधारणांमुळे दक्षिण मुंबईचा कायापालट होण्‍याची अपेक्षा आहे. या पायाभूत सुविधांमधील सुधारणांमुळे व्‍यवसाय व गुंतवणूकदारांसाठी क्षेत्राच्‍या अपीलमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे, शहरातील सर्वात प्रख्‍यात व्‍यावसायिक क्षेत्र नरिमन पॉइण्‍टमध्‍ये मोठी वाढ दिसण्‍याची अपेक्षा आहे. या अहवालाचा अंदाज आहे की, नरिमन पॉइण्‍टमधील सर्वाधिक भाडे सध्‍या प्रतिचौरस फूट ५६९ रूपयांवरून २०३० पर्यंत प्रतिचौरस फूट १,०९१ रूपयांपर्यंत वाढेल, ज्‍यामधून क्षेत्रातील प्रीमियम कार्यालयीन जागेसाठी प्रबळ मागणी दिसून येते.  

२००० च्‍या दशकाच्‍या सुरूवातीला नरिमन पॉइण्‍ट मुंबईतील प्रमुख व्‍यवसाय हब होते, जेथे कार्यालयीन भाडे २००३ मध्‍ये प्रतिचौरस फूट २०० रूपयांवरून २००७ मध्‍ये प्रतिचौरस फूट ५५० रूपयांपर्यंत स्थिरगतीने वाढले. पण, जागतिक आर्थिक संकट आणि बांद्रा कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स (बीकेसी)च्‍या वाढत्‍या आकर्षणामुळे २०१२ मध्‍ये कार्यालयीन भाडे प्रतिचौरस फूट ४०२ रूपयांपर्यंत कमी झाले. २०१८ पर्यंत नरिमन पॉइण्‍टमधील भाडेदर अधिक कमी होऊन प्रतिचौरस फूट ३७५ रूपयांपर्यंत पोहोचले, जे बीकेसीमधील कार्यालयीन भाडे प्रतिचौरस फूट ८३३ रूपये आणि एनसीआरमधील कार्यालयीन भाडे प्रतिचौरस फूट ४६० रूपयांपेक्षा खूप कमी होते. 

पण, नरिमन पॉइण्‍टमधील सर्वाधिक भाडेदर २०२४ च्‍या पहिल्‍या सहामाहीपर्यंत प्रतिचौरस फूट ५६९ रूपयांपर्यंत वाढले, ज्‍याने आघाडीचे केंद्रीय व्‍यवसाय जिल्हे बेंगळुरू (प्रतिचौरस फूट ३५३ रूपये) आणि एनसीआर (प्रतिचौरस फूट ४२९ रूपये) येथील सर्वाधिक भाडेदरांना मागे टाकले. २०१८ ते २०२४ च्‍या पहिल्‍या सहामाहीदरमयान नरिमन पॉइण्‍टमधील सर्वाधिक भाडेदरांमध्‍ये ५२ टक्‍क्‍यांची वाढ झाली, ज्‍याने बीकेसीच्‍या भाडेदर वाढीला मोठ्या प्रमाणात मागे टाकले, जेथे भाडेदरामध्‍ये २० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. याउलट, बेंगळुरू आणि राष्‍ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर)मधील सर्वाधिक भाडेदरांमध्‍ये अनुक्रमे ४ टक्‍के व ७ टक्‍क्‍यांची घट दिसण्‍यात आली आहे. ही वाढ मागील नीचांकामधून रिकव्‍हरी असून नरिमन पॉइण्‍टला बेंगळुरू व एनसीआर अशा महत्त्वपूर्ण व्‍यावसायिक बाजारपेठांच्‍या पुढे नेते. समकालीन व्‍यवसाय जिल्‍ह्यांमध्‍ये प्रीमियम कार्यालयीन जागांसाठी मागणीमध्‍ये वाढ आणि नरिमन पॉइण्‍टची कनेक्‍टीव्‍हीटी व अपीलमध्‍ये सुधारणा करत असलेले आगामी पायाभूत सुविधा प्रकल्‍पांमुळे या रिकव्‍हरीला चालना मिळाली आहे. 

नाइट फ्रँक इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक शिशिर बैजाल म्‍हणाले, “दक्षिण मुंबईमध्‍ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे, ज्‍याला संपूर्ण शहरामध्‍ये धोरणात्‍मक पायाभूत सुविधांच्‍या परिवर्तनाने चालना दिली आहे. प्रीमियम कार्यालयीन जागांसाठी वाढत्‍या रूचीमुळे मालमत्ता किमतींमध्‍ये वाढ होत आहे. सुधारित पायाभूत सुविधा आणि प्रबळ निवासी बाजारपेठेचे एकीकरण नरिमन पॉइण्‍टला प्रमुख व्‍यावसायिक हब म्‍हणून मजबूत करते, तसेच गुंतणूकदार व व्‍यवसायांसाठी सर्वोत्तम संधी निर्माण करत आहे. पायाभूत सुविधा-केंद्रित आर्थिक विकास सुरू असताना आम्‍हाला अपेक्षा आहे की हे क्षेत्र अधिकाधिक कंपन्‍यांचे लक्ष वेधून घेईल, ज्‍यामुळे येथील सुधारणा आणि दीर्घकालीन व्‍यावसायिक स्थिरतेप्रती योगदान देतील.''

दक्षिण मुंबईतील नवीन कार्यालयीन पुरवठा मोठ्या विकासासाठी सज्‍ज आहे, जेथे पुढील ६ ते ८ वर्षांमध्‍ये ४ दशलक्ष ते ६ दशलक्ष चौरस फूट नवीन मिक्‍स्‍ड-युजर जागेची भर होण्‍याची अपेक्षा आहे, जे गेल्‍या दशकामध्‍ये दिसण्‍यात आलेल्‍या पुरवठ्याच्‍या तीन पट असेल. या आगामी विस्‍तारीकरणाला रिकाम्‍या जागांसह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल), रेल लँड डेव्‍हलपमेंट ऑथोरिटी (आरएलडीए) यांच्‍या मालकीचे पार्सल्‍स, जुन्‍या गिरण्‍या आणि आता आधुनिक कार्यालयीन जागांमध्‍ये बदलण्‍यास पात्र वापरात नसलेल्‍या औद्योगिक साइट्सच्‍या पुनर्विकासामुळे चालना मिळेल. दक्षिण मुंबईमधील कार्यालयीन बाजारपेठेतील अपेक्षित विकास, तसेच प्रमुख पायाभूत सुविधा सुधारणांमुळे या क्षेत्राला प्रमुख कार्यालयीन गंतव्‍य म्‍हणून दर्जा पुन्‍हा मिळू शकेल. 






Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE