जिओच्या अत्याधुनिक आयओटी मोबिलिटी तंत्रज्ञानाचा वापर करून इनोव्हेशन व डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी अतुल ग्रीनटेकची जिओ प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी

 जिओच्या अत्याधुनिक आयओटी मोबिलिटी तंत्रज्ञानाचा वापर करून इनोव्हेशन व डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी अतुल ग्रीनटेकची जिओ प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी

 अतुल ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेडने जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडसोबत (जिओ) एक धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात नवकल्पना आणि डिजिटल परिवर्तन घडवून आणणे, हा या भागीदारीचा उद्देश आहे. या सहकार्यामुळे अतुल ग्रीनटेक दक्षिण अमेरिका, युरोपियन युनियन, पूर्व आफ्रिका आणि डोमेस्टिक भारतीय बाजारांना उत्कृष्ट इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि ई-मोबिलिटी उपाययोजना देऊ शकेल.

या सहयोगामध्ये जिओच्या प्रगत IoT तमोबिलिटी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो. अत्याधुनिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटी यांची सांगड घालून युझर्सना रिअल-टाइम टेलीमॅटिक्स डेटा आणि उच्च विश्वासार्हता प्रदान केली जाते.

अतुल ग्रीनटेकतर्फे जिओच्या अत्याधुनिक चार्जिंग सोल्युशन्स, ऑटोमोटिव्ह क्लस्टर्स, टेलीमॅटिक्स हार्डवेअर आणि प्लॅटफॉर्म, तसेच आंतरराष्ट्रीय M2M कनेक्टिव्हिटी सोल्युशन्सचा वापर जागतिक बी2बी आणि बी2सी क्षेत्रातील ग्राहकांसाठी करणार आहे. यामुळे त्यांना स्थानिक पातळीवरील स्रोतांचा वापर वाढवता येईल, मजबूत पुरवठा साखळी निर्माण करता येईल, आणि इष्टतम डेटा वापर करता येईल. परिणामी, चार्जिंगसाठी लागणारा वेळ कमी करता येईल. त्यामुळे फ्लीट ऑपरेटर आणि अंतिम वापरकर्त्यांना अधिकाधिक फायदे मिळतील.

या भागीदारीत अतुल ग्रीनटेकच्या सर्व थ्री-व्हीलर प्लॅटफॉर्म्सवर लक्ष केंद्रित केले जाईल. यात प्रवासी वाहनांसाठी अतुल मोबिली (ATUL MOBILI) आणि मालवाहतूक वाहनांसाठी अतुल एनर्जीचा (ATUL ENERGIE) समावेश आहे. जिओ टेलीमॅटिक्स आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा समावेश करून, ईव्ही मालकांना अनेक सुविधा उपलब्ध होतील. यामध्ये ट्रॅकिंग, वाहनाची आरोग्य स्थिती तपासणे, सुरक्षा, तसेच नेव्हिगेशन-मार्गदर्शन यांचा समावेश आहे. या सुविधांमुळे वापर सुलभता अनुभवता येईल.

अतुल ऑटोचे संचालक डॉ. विजय केडिया म्हणाले, "अतुल ग्रीनटेक इलेक्ट्रिक वाहन उत्पादन वेगाने वाढविण्यासाठी आपला भागीदार काळजीपूर्वकपणे निवडण्यासाठी नवे मार्ग खुले करण्याचा विचार करत आहे. या द्वारे मोटार उद्योगात शाश्वत परिवर्तनासाठी एक नवी दिशा मिळेल. या धोरणात्मक भागीदारीद्वारे, अतुल ग्रीनटेक जिओच्या डिजिटल पर्यावरण व्यवस्थेचा वापर करून पर्यावरणीय आणि विद्युतीकरण तंत्रज्ञान मजबूत करणार आहे."

अतुल ग्रीनटेकचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिव्या चंद्रा म्हणाले, "जागतिक स्तरावर हरित मोबिलिटी सेवा आणि उपाययोजना विस्तारण्यासाठी जिओसोबत सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. जिओचे तंत्रज्ञान आणि कौशल्याचा लाभ घेऊन आम्ही ग्राहकांना आणखी उत्कृष्ट अनुभव देऊ याचा आम्हाला विश्वास आहे."

जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे अध्यक्ष श्री. आशिष लोढा म्हणाले, "आम्हाला अतुल ग्रीनटेकसोबत भागीदारी करून भारतात आणि जागतिक स्तरावर ई-मोबिलिटी परिवर्तनाला चालना देताना आनंद होत आहे. मोबिलिटी तंत्रज्ञान आणि संयुक्त कौशल्याच्या प्रभावी संयोगामुळे, आम्ही थ्री-व्हीलर क्षेत्रात नव्या सुधारणा घडवत राहू याचा आम्हाला विश्वास आहे."

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE