मॅग्मा एचडीआयकडून वनप्रोटेक्ट योजनेचा शुभारंभ- सक्रिय जीवनशैलीसाठी एक समकालीन वैयक्तिक अपघात विमा प्रकार

 मॅग्मा एचडीआयकडून वनप्रोटेक्ट योजनेचा शुभारंभ- सक्रिय जीवनशैलीसाठी एक समकालीन वैयक्तिक अपघात विमा प्रकार


भारतातील एक अग्रगण्य जनरल इन्शुरन्स कंपनी असलेल्या मॅग्मा एचडीआयने वनप्रोटेक्ट या समकालीन वैयक्तिक अपघात विमा योजनेचा शुभारंभ करत असल्याची घोषणा आज येथे  केली आहे.  आजच्या जीवनशैलीच्या गरजेनुसार तयार केलेल्या या योजनेत 20 हून अधिक सुविधा समाविष्ट आहे. वनप्रोटेक्ट योजना जीवनात थरार हवा असणाऱ्या आणि त्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठी योग्य साथीदार आहे.

साहसी प्रवास हा प्रकार भारतीयांमध्ये लोकप्रिय होत असून ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग आणि स्कूबा डायव्हिंग यासारखे थरार सुट्टीच्या अनुभवांसाठी प्रमुख पर्याय बनले आहेत. वनप्रोटेक्ट योजना साहसी लोकांना त्यांच्या आवडींचा आत्मविश्वासाने पाठपुरावा करण्यास सक्षम करते. तसेच उच्च-जोखीम पात‌ळी असलेल्या साहसी प्रकारांच्या विस्तृत श्रेणीसाठी संरक्षण प्रदान करते.

ट्रेन किंवा विमानासारख्या प्रचलित वाहतूक वाहकांचा वापर करताना अपघाती मृत्यू आल्यास 200 टक्के विमाकवच हे वनप्रोटेक्टचे आणखी एक आग‌ळेवेगळे वैशिष्ट्य आहे. वनप्रोटेक्ट केवळ साहसी उत्साहींसाठीच बनविण्यात आलेले नाही तर, आरामदायी किंवा कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही योजना आहे.

या नवीन युगाच्या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, वनप्रोटेक्ट विमाधारकांना अनेक मौल्यवान अतिरिक्त सुरक्षाकवच प्रदान करते आणि त्यात पुढील सुविधा आहेत:

उत्पन्नाचे नुकसान: जर एखादी व्यक्ती पॉलिसीच्या कालावधीत अपघातात जखमी झाली आणि परिणामी काम करण्यास तात्पुरती अक्षम असेल, तर त्यामुळे त्याच्या उत्पन्नाला फटका बसतो. ही सुविधा विमाधारकास आर्थिक कवच प्रदान करते.

कर्ज सुरक्षितता: अपघाती मृत्यू किंवा कायमचे संपूर्ण अपंगत्व आल्यास, हे विमाकवच थकित कर्जासाठी विशिष्ट रक्कम देते.

हाडांना दुखापत: अपघातादरम्यान फ्रॅक्चर झाल्यास, हे विमाकवच आर्थिक सहाय्य प्रदान करते.

भाजणे: एखादी व्यक्ती अपघातात भाजली गेल्यास, हे विमाकवच आर्थिक सहाय्य प्रदान करते.

मॅग्मा एचडीआयचे मुख्य तांत्रिक अधिकारी श्री. अमित भंडारी वनप्रोटेक्टच्या महत्त्वावर भर देताना म्हणाले: " बाथरुममध्ये साधे पडणे असो, प्रवासादरम्यान फ्रॅक्चर असो, ट्रेन रुळावरून घसरणे असो किंवा फटाक्यांची दुर्घटना असो, अपघात केव्हा होईल, हे कधीच सांगता येत नाहीत. वनप्रोटेक्ट अशा दुर्घटनांच्या परिस्थितीत मनःशांती देते. अष्टपैलुत्वाच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेली वनप्रोटेक्ट योजना जीवनशैलीनुसार तयार केलेल्या 20 पेक्षा अधिक सुविधांमधून हव्या असलेल्या सुविधा निवडण्याची संधी विमाधारकास देते. तुम्ही वारंवार प्रवास करणारे, साहस शोधणारे, कर्ज व्यवस्थापित करणारे किंवा तुमच्या कुटुंबातील प्राथमिक कमावणारे असाल तर, वनप्रोटेक्टने आता तुम्हाला सुरक्षाकवच प्रदान केलेले आहे. आम्ही सणासुदीच्या पर्वाचे स्वागत करत असताना आणि अनेक भारतीय त्यांच्या वार्षिक सुट्ट्यांनिमित्त प्रवासासाठी निघालेले असताना, आमचे नवीनतम उत्पादन सादर करण्याची ही योग्य वेळ आहे: वनप्रोटेक्ट जे योग्य वेळी योग्य संरक्षण प्रदान करते. मॅग्मा एचडीआयमध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करणारे नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक विमा पर्याय सादर करण्यास वचनबद्ध आहोत."

ग्राहक 1, 2 किंवा अगदी 3 वर्ष मुदतीचा विमा कालावधी निवडू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या साहसी जीवनशैलीशी लवचिकता जुळते. कायमचे आंशिक आणि संपूर्ण अपंगत्व, तसेच वैद्यकीय, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयाच्या खर्चासाठीचे विमाकवच देखील वनप्रोटेक्ट प्रदान करते आणि त्यामुळे प्रत्येकासाठी सर्वसमावेशक सुरक्षा जाळे तयार होते.



Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE