एक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेडची खुली आयपीओ ऑफर 06 नोव्हेंबर 2024 पासून, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 275/- ते रु. 289/- दरम्यान निश्चित
एक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेडची खुली आयपीओ ऑफर 06 नोव्हेंबर 2024 पासून, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 275/- ते रु. 289/- दरम्यान निश्चित
मुंबई, नोव्हेंबर 4, 2024: एक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेड या पुनर्नवीकरण उर्जा क्षेत्रातील अग्रणी कंपनीकडून आगामी खुल्या आयपीओ ऑफरसाठी प्रतिसमभाग रु. 2/- फेसव्हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागासाठी रु. 275/- ते रु. 289/- प्राईस बँडची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीच्या उर्जा प्रकल्पांमध्ये सौर, पवन, व हायब्रीड तसेच फर्म व डिस्पॅचेबल पुनर्नवीकरण (एफडीआरई) प्रकल्पांचा समावेश आहे.
एक्मे सोलर होल्डिंग्सची खुली आयपीओ ऑफर अर्थात समभाग विक्री बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होईल व शुक्रवार दिनांक 08 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 51 समभागांच्या एका लॉटसाठी व त्यापुढे 51 समभागांच्या पटीत गुंतवणुकीसाठी बीड करु शकतील.
आयपीओ मध्ये 2395 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू व एक्मे क्लीनटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कडून ऑफर ऑफ सेल असलेल्या रु. 505/- कोटींचा समावेश आहे.
एक्मे सोलर कंपनी आयपीओमधून उभ्या राहणाऱ्या रकमेपैकी 1795 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम आपल्या उपकंपन्यांमध्ये गुंतवणार आहे. त्यातून या उपकंपन्यांचे काही कर्ज फेडण्यात येणार आहे. तसेच काही रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी देखील वापरण्यात येणार आहे.
एक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेड कंपनीची स्थापना एक्मे समुहाच्या पुनर्नवीकरण उर्जा व्यवसाय विभागातर्फे 2015 साली करण्यात आली होती. भारतीय पुनर्नवीकरण उर्जा उद्योगातील उभरत्या संधींचा लाभ घेण्याच्या उद्देशानेच ही स्थापना करण्यात आली होती. भारतातील स्वतंत्रपणे उर्जा निर्माण करणाऱ्या इंडीपेंडंट पॉवर प्रोड्यूसर्स (आयपीपी) कंपन्यांच्या गटातील मोठ्या कंपन्यांमध्ये एक्मे सोलरचा समावेश होतो. तसेच 30 जून 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार प्रचालन क्षमता निकषावर, एक्मे सोलर कंपनीचा देशातील पहिल्या दहा पुनर्नवीकरण उर्जा निर्मिती कंपन्यांमध्ये समावेश आहे. कंपनीने सौर उर्जा निर्मितीपासून आपला व्यवसाय वाढवला असून विविध क्षेत्रात विस्तारला देखील आहे. यामुळे ही कंपनी आता देशाच्या पुनर्नवीकरण उर्जा निर्मिती क्षेत्रातील एकात्मिक पुनर्नवीकरण उर्जा कंपनी झाली आहे.
कंपनी आपल्या अंतर्गत इंजिनिअरींग, प्रॉक्युरमेंट व कंस्ट्रक्शन (इपीसी) व ऑपरेशन व मेंटेनन्स टीमच्या माध्यमातून युटीलीटी स्केल रिन्युएबल एनर्जी प्रकल्पांचे प्रचालन, उभारणी, आणि मालकी तत्वावर विकास देखील करीत असते. तसेच कंपनी या प्रकल्पांमधून निर्माण झालेली वीज केंद्र व राज्य शासनांचा पाठिंबा असलेल्या विविध ग्राहकांना विकून महसूल देखील उभा करते.
कंपनीकडे प्रकल्पांचे प्रचालन व कार्यान्वयन करण्यासाठी अंतर्गत बिझनेस प्लॅटफॉर्म आहे. प्रकल्पांच्या संपूर्ण कारकीर्दीत अगदी बोली लावण्यापासून व्यापारी प्रचालन सुरु करण्यापर्यंतच्या तसेच देखभाल करण्यापर्यंतच्या संपूर्ण आवर्तनामध्ये हा प्लॅटफॉर्म कार्य करीत असतो.
जून 30, 2024 पर्यंतच्या माहितीनुसार कंपनीच्या 28 प्रकल्पांपैकी 18 प्रकल्प आंध्रप्रदेश, राजस्थान, आणि तेलंगणा या राज्यात असून कंपनीच्या एकूण प्रकल्प प्रचालन क्षमतेपैकी हे प्रमाण 85.07 टक्के आहे.
कंपनीकडे सौर उर्जा प्रकल्पांची एकूण ऑपरेशनल प्रोजेक्ट कॅपॅसिटी अर्थात प्रकल्प प्रचालन क्षमता 1340 मेगावॅट (1826 एमडब्ल्यूपी) आहे. तसेच कंपनी तर्फे सध्या 3250 मेगावॅटउर्जा निर्मिती क्षमतेच्या प्रकल्पांचे काम सुरु असून त्यात 1500 मेगावॅट (2192 एमडब्ल्यूपी) सौर उर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच 150 मेगावॅट पवन उर्जा प्रकल्प, 1030 मेगावॅट हायब्रीड प्रकल्प, 570 मेगावॅट एफडीआरई प्रकल्प देखील सुरु आहेत. कंपनीकडे बांधकामासाठी देण्यात आलेल्या प्रकल्पांची एकूण क्षमता 1730 मेगावॅट असून त्यात 600 मेगावॅट (870 एमडब्ल्यूपी) सौर उर्जा प्रकल्प, 450 मेगावॅट हायब्रीड प्रकल्प, व 680 मेगावॅट एफडीआरई प्रकल्पांचा समावेश आहे. कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मध्ये ही सर्व माहिती देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment