नीवा बुपा हेल्थ इंश्युरन्स कंपनी लिमिटेडची खुली आयपीओ ऑफर 7 नोव्हेंबर 2024 पासून, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 70/- ते रु. 74/- पर्यंत निश्चित
नीवा बुपा हेल्थ इंश्युरन्स कंपनी लिमिटेडची खुली आयपीओ ऑफर 7 नोव्हेंबर 2024 पासून, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 70/- ते रु. 74/- पर्यंत निश्चित
मुंबई, नोव्हेंबर 04, 2024: भारतीय किरकोळ आरोग्य विमा व्यवसाय क्षेत्रात अत्यंत वेगाने विस्तारत असणारी व केवळ आरोग्य विमा (स्टँडअलोन) व्यवसाय करणारी नीवा बुपा हेल्थ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड येत्या गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर 2024 रोजी आयपीओच्या माध्यमातून खुली समभाग विक्री सुरु करीत आहे. कंपनीने त्यासाठी प्रत्येकी रु. 10/- फेसव्हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागासाठी रु. 70/- ते रु. 74/- असा प्राईस बँड निश्चित केला आहे. 2024 आर्थिक वर्षात कंपनीच्या ग्रॉस डायरेक्ट प्रिमिअम इंकम अर्थात जीडीपीआयच्या आधारे ही कंपनी देशात सर्वात वेगाने व्यवसाय विस्तारणारी कंपनी ठरली आहे.
नीवा बुपा कंपनीची आपली आयपीओ विक्री ऑफर गुरुवार दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी सुरु होणार असून सोमवार दि. 11 नोव्हेंअर 2024 रोजी बंद होणार आहे. इच्छुक गुंतवणूकदार किमान 200 समभागांच्या लॉट साठी व त्यापुढे 200 समभागांच्या पटीत अर्ज बीड अर्ज करु शकतील.
आयपीओ मध्ये रु. 800 कोटी फ्रेश इश्यूचा व बुपा सिंगापूर होल्डिंग्स पीटीई लिमिटेड फेटल टोन एलएलपी कंपनीकडून रु. 1400 कोटी ऑफर ऑफ सेलचा समावेश आहे.
कंपनी आयपीओ मधून मिळणाऱ्या रकमेपैकी रु. 1500 कोटी पर्यंतची रक्कम भांडवली पाया मजबूत करण्यासाठी तसेच आपली पतदारिता (सॉल्व्हन्सी) पातळी वाढवण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतुंसाठी उपयोगात आणणार आहे.
आपली आरोग्य विमा उत्पादने आणि सेवा यांच्या माध्यमातून ग्राहकांना परीपूर्ण आरोग्य विमा सेवा वातावरण निर्माण करणे व त्यायोगे ग्राहकांना निरोगी जीवन व्यतीत करण्याची संधी उपलब्ध करुन देणे हे कंपनीचे धेय आहे, जेणेकरुन प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्तम आरोग्य विमा सेवा मिळण्याचा आत्मविश्वास निर्माण होउ शकेल. हेच नीवा बुपा हेल्थ इंश्युरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवसाय उद्दीष्ट आहे. त्यासाठी कंपनीने व्यवसाय व ग्राहकाच्या प्रत्येक पातळीवर तंत्रज्ञान आधारित एकात्मिकता अमलात आणण्यासाठी डिजिटल फर्स्ट भूमिका स्विकारली आहे. ग्राहकांना उत्पादनांची ओळख करुन देतांना, अंडररायटींग करतांना, क्लेम सादर करतांना तसेच पॉलीसीचे नूतनीकरण करतांना या डिजिटल फर्स्ट भूमिकेचा लाभ मिळणार आहे. जून 30, 2024 च्या आकडेवारीपर्यंत नीवा बुपा कंपनीने 14.99 दशलक्ष जणांना आरोग्य विमा संरक्षण दिले आहे.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये नीवा बुपा कंपनीने एकूण 54.94 दशलक्ष रुपये ग्रॉस डायरेक्ट प्रिमिअम (जीडीपीआय) उत्पन्न मिळवले होते. त्याआधारे देशात स्टँड अलोन हेल्थ इंश्युरन्स म्हणजे केवळ आरोग्य, अपघात व प्रवास विमा देणाऱ्या कंपन्यांमध्ये तिसरी मोठी विमा कंपनी व दुसऱ्या क्रमांकाची वेगाने विस्तारणारी कंपनी ठरली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान वार्षिक 41.37% दराने वाढ साध्य केली असून ही वाढ एकूण विमा उद्योगाच्या सरासरी वाढीच्या दुप्पट आहे.
नीवा बुपा कंपनीने खोटे विमा दावे ओळखण्यासाठी मशिन लर्निंग आधारित ॲल्गोरिथम आणि लॉजिस्टिक्स रिग्रेसन मॉडेल्सचा वापर सुरु केला आहे. यामुळे कंपनीला खोटे दावे शोधण्यास मोठी मदत झाली आहे. परिणामी शोधकार्य घटले असून त्यामुळे ग्राहकांना होणारा त्रास किमान पातळीवर आला आहे.
आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान नीवा बुपा कंपनीच्या एकूण ग्रॉस रीटन प्रिमिअम (जीडब्ल्यूपी) सालागणिक 41.27 % वाढले आहे तर किरकोळ आरोग्य जीडब्ल्यूपी सालागणिक 33.42 % वाढले आहे. तसेच याच कालावधित कंपनीची एकूण आरोग्य जीडीपीआय वाढ 41.37 % झाली आहे. ही वाढ स्टँड अलोन हेल्थ इन्शुरन्स उद्योगात सर्वाधिक असून उद्योगाच्या सरासरी 21.42 % वाढीच्या तुलनेत दुप्पट असल्याची माहिती रेडसीअरने दिली आहे.
30 जून 2024 रोजी समाप्त तिमाहित कंपनीचा एकूण जीडब्ल्यूपी 30.84 टक्यांनी वाढला आहे तर किरकोळ आरोग्य विमा जीडब्ल्यूपी 31.99 टक्क्यांनी वाढला आहे.
रेडसीअरच्या माहितीनुसार स्टँडअलोन हेल्थ इन्शुरन्स विमा उद्योग बाजारात नीवा बुपाचा हिस्सा साल 2024 मध्ये 16.24 टक्के होता. तसेच 31 ऑगस्ट 2024 आधीच्या पाच महिन्यात कंपनीचा किरकोळ आरोग्य विमा जीडीपीआय 17.29 % होता.
Comments
Post a Comment