लुई फिलिप मुंबईतील या लग्नाच्या हंगामासाठी "रॉयल वेडिंग ट्रेझर्स" सादर करतात
लुई फिलिप मुंबईतील या लग्नाच्या हंगामासाठी "रॉयल वेडिंग ट्रेझर्स" सादर करतात
लुईस फिलिप या आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्या भारतातील आघाडीच्या प्रीमियम मेन्सवेअर ब्रँडने नवीन रॉयल वेडिंग ट्रेझर्स कलेक्शनच्या लाँचची घोषणा केली आहे. हे कलेक्शन समकालीन स्टाइलचा अवलंब करण्यासोबत परंपरेला सन्मानित करण्याची इच्छा असलेल्या आधुनिक काळातील नवरदेवासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या कलेक्शनमधून ब्रँडचा अपवादात्मक कारागिरी व सुधारित आकर्षकतेप्रती वारसा दिसून येतो, जेथे हे कलेक्शन नवरदेव त्याच्या जीवनातील खास दिवशी आत्मविश्वास व आकर्षकतेसह सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची खात्री देते.
लुईस फिलिपचे विशेष 'रॉयल वेडिंग ट्रेझर्स' कलेक्शन पारंपारिक विवाह सोहळ्यांची भव्यता व संपन्न संस्कृतीचे प्रतीक आहे, ज्यामध्ये आधुनिक डिझाइन घटकांचा समावेश आहे. प्रत्येक पीस कलाकृती आहे, जे मखमली सारख्या प्रीमियम फॅब्रिक्सपासून कुशलतेने डिझाइन करण्यात आले असून आकर्षक अलंकारांसह सजवण्यात आले आहे. बंधगला गुंतागुंतीचे भरतकाम व सिक्वीन्ससह सुशोभित करण्यात आले असून शाही मोटिफ्समधून प्रेरित आहे, तसेच त्यामधून उच्च दर्जाची कारागिरी दिसून येते, जी नवरदेवाच्या पेहरावाला शाही दर्जा देते.
वारसा व समकालीन आकर्षकतेच्या परिपूर्ण संतुलनाचा शोध घेणाऱ्यांसाठी या कलेक्शनमध्ये टू-पीस व थ्री-पीस सूट्स, तसेच सेरेमोनिअल शर्टस् आहेत. या आऊटफिट्समधून ब्रँडच्या सर्वोत्तम कौशल्यासह आधुनिक सिल्हूट्स व सर्वोत्तम पोतचे मिश्रण दिसून येते, ज्यामुळे नवरदेव आकर्षकतेसह सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची खात्री मिळते. कलेक्शनमधील आकर्षक रॉयल ब्ल्यू व रिच ग्रीन्सपासून क्लासिक आयव्हरी व गोल्डपर्यंत कलर पॅलेटमधून वेडिंग फॅशनचे आकर्षक व पारंपारिक पैलू दिसून येतात, ज्यामुळे शाही व कालातील लुक मिळतो.
या कलेक्शनबाबत मत व्यक्त करत लुईस फिलिपच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीमती फरिदा कलियादान म्हणाल्या, ''लुईस फिलिपमध्ये आमचा विश्वास आहे की विवाह सोहळ्यांमध्ये वैयक्तिक अभिव्यक्ती सादर केल्या जातात, तसेच परंपरा जपली जाते. हे कलेक्शन त्या भावनेला सन्मानित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे, तसेच नवरदेवाला आकर्षकता, भव्यता व समकालीन फॅशनचे अद्वितीय फ्यूजन देते.''
या स्पेशल लाँचला साजरे करण्यासाठी लुईस फिलिप ग्राहकांकरिता विशेष स्पर्धेचे आयोजन करत आहे. कोणत्याही लुईस फिलिप एक्सक्लुसिव्ह स्टोअरमध्ये किंवा वेबसाइट/अॅपवर ४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान २०,००० रूपये किंवा त्यापेक्षा अधिक खरेदीसह ग्राहकांना आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी मिळू शकते, जसे:
• जीवनातील मोठ्या दिवसापूर्वी आठवणींचा संग्रह करण्यासाठी परिपूर्ण लक्झरीअस प्री-वेडिंग शूट.
• इंद्रियाकडून २-ग्रॅम सोन्याचे नाणे, जे विवाह सोहळा साजरीकरणामध्ये भव्यतेची भर करते.
सहभागाबाबत अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: www.louisphilippe.abfrl.in/sale/wedding-contest
Comments
Post a Comment