श्रीराम फायनान्सची राहुल द्रविड सोबत #TogetherWeSoar या प्रेरणादायी मोहीमेचा शुभारंभ
श्रीराम फायनान्सची राहुल द्रविड सोबत
#TogetherWeSoar या प्रेरणादायी मोहीमेचा शुभारंभ
● श्रीराम फायनान्सची ही मोहिम
त्यांच्या ‘जेव्हा आपण एकत्र येतो, तेव्हा आपण उंच भरारी घेतो' ह्या मूळ विश्वासाने प्रेरित
आहे. आम्ही आमच्या ग्राहकांशी मजबूत नातेसंबंध निर्माण करून, त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव
करून देत,
त्यांची
स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करतो.
● भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा
माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी श्रीराम फायनान्सचे ब्रँड ॲम्बेसेडर
म्हणून ब्रँड मोहिमेला समर्थन दिले आहे
● प्रख्यात अभिनेते आणि
पद्मभूषण तसेच पद्मश्री पुरस्कार विजेते नसीरुद्दीन शाह यांनी ‘हर इंडियन के साथ:
जुडेंगे उडेंगे’ या हिंदीतील जाहिरात चित्रपटासाठी आपला आवाज दिला आहे.
●
अकादमी
पुरस्कार विजेते के. एस. चंद्रबोस आणि प्रसिद्ध तमिळ गीतकार मधन कर्की यांचे
अनुक्रमे ॲड फिल्मच्या तेलुगू आणि तमिळ आवृत्त्यांसाठी गीतलेखन.
श्रीराम ग्रुपची प्रमुख कंपनी असलेली तसेच भारतातील
आघाडीच्या वित्तीय सेवा प्रदात्यांपैकी एक असलेल्या श्रीराम फायनान्स
लिमिटेडने ‘#TogetherWeSoar’ ही प्रेरणादायी नवीन ब्रँड मोहीम सुरू केली आहे. श्रीराम फायनान्सची ही मोहीम,
एकतेची शक्ती अधोरेखित करत, महत्त्वाकांक्षी भारतासोबत
भागीदारी करण्याच्या वचनबद्धता प्रतिबिंबित करते.
आज, अनेक भारतीय
‘मग, काय?’ तत्त्वज्ञान स्वीकारत आहेत,
जे त्यांच्या यशाच्या प्रवासातील कोणत्याही आव्हानांवर मात करण्याची
आकांक्षा प्रतिबिंबित करत आहेत. राहुल द्रविडच्या स्वतःच्या आयुष्याचे काही अंश घेऊन,
या मोहिमेचा उद्देश हा उत्साह साजरा करणे आणि भागीदारीला पुढे जाण्याचे
साधन म्हणून दाखवणे आहे.
संदेश स्पष्ट आहे: “एकत्र येऊन आपण भरारी घेऊ शकतो'. आम्ही
आमच्या ग्राहकांशी मजबूत नातेसंबंध निर्माण करून, त्यांना त्यांच्या
शक्तीची जाणीव करून देत, त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात
मदत करतो.
मोहिमेला दिग्गज व्यक्तीमत्वाचे पाठबळ
क्रिकेट विश्वात दिग्गज मानले जाणारे राहुल द्रविड हे श्रीराम
फायनान्सशी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जुडले असून, टीमवर्क आणि लवचिक मूल्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम फायनान्सचा या
वैशिष्टांना राहुल द्रविड मूर्त रूप देतात. वाढीला प्रेरणा देणाऱ्या भागीदारींना
पाठबळ देण्यासाठी ब्रँडच्या वचनबद्धतेला राहुल द्रविड यांची उपस्थिती आणखी बळकटी
देते.
मोहिमेच्या प्रभावात भर घालत, प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी “हर इंडियन के साथ:
जुडेंगे. उडेंगे” या जाहिरात चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला आपला आवाज दिला. ५०
हून अधिक वर्षे चित्रपटांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन केल्यामुळे, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार विजेते यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या
उत्कृष्ट योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. श्रीराम फायनान्सच्या संदेशाला त्यांचा
शक्तिशाली आवाज अर्थपूर्ण भागीदारीद्वारे व्यक्तींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात
मदत करण्याच्या समर्पणावर भर देतो.
या मोहिमेसाठी अकादमी पुरस्कार विजेते के. एस. चंद्रबोस यांनी
तेलुगु आवृत्तीसाठी आणि तमिळ आवृत्तीसाठी प्रशंसित गीतकार मधन कर्की हे गीतकार असून, त्यामुळे ही मोहीम अनेक क्षेत्रांतील प्रेक्षकांशी मनापासून जुडली आहे.
राष्ट्रव्यापी
मोहिम
सर्वसमावेशक 360-डिग्री मीडिया दृष्टिकोनासह, ‘#TogetherWeSoar’ ही मोहीम प्रिंट,
डिजिटल, टेलिव्हिजन, सोशल
मीडिया आणि आउटडोअर प्लॅटफॉर्म तसेच भारतभरातील निवडक चित्रपटगृहांद्वारे प्रेक्षकांपर्यंत
पोहोचेल. त्याच बरोबर, श्रीराम फायनान्सने प्रो कबड्डी लीगसोबत
भागीदारी केली आहे आणि PKL दरम्यान प्रेक्षक ही जाहिरात पाहतील.
पुढील दोन महिन्यांत, श्रीराम फायनान्सच्या ग्राहकांशी त्यांच्या
आर्थिक प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर भागीदारी करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी
विविध शहरी आणि ग्रामीण प्रेक्षकांना लक्ष्य करून ही मोहीम देशभरात प्रदर्शित केली
जाईल.
भागीदारीचा
अनोखा संदेश
श्रीराम फायनान्सच्या एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर – मार्केटिंग, एलिझाबेथ वेंकटरामन या जाहिरात मोहिमेबद्दल
टिप्पणी करताना म्हणाल्या, ‘Together,
We Soar’ ही
मोहिम प्रत्येक भारतीयाच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याच्या आमच्या आश्वासनाचे
प्रतीक आहे. ही मोहीम मुदत ठेवी, वाहन
खरेदीसाठी वित्तपुरवठा, लघुउद्योगाला सहाय्य करणे तसेच सुवर्ण
अथवा वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून त्वरित निधीचा उपलब्ध करून सामान्य माणसाच्या महत्वाकांक्षेला
प्रेरणा देते. सात
भाषांमध्ये तयार केलेला आमचा हा सर्जनशील दृष्टीकोन, आम्हाला देशभरातील विविध प्रेक्षकांशी सखोलपणे जोडतो.”
क्रिकेटपटू राहुल द्रविड हे या मोहिमेच्या व्हिडिओमध्ये
जीवनाच्या सर्व स्तरातील व्यक्तींना श्रीराम फायनान्ससोबत भागीदारी करण्यासाठी
त्याचबरोबर त्यांचे जीवन आणखी संपन्न करण्यासाठी आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा
पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करतात. या जाहीरात मोहिमेतील प्रतिमा एका सशक्त
रूपकामध्ये प्रेक्षकांसमोर येते आणि ते म्हणजे स्वप्नांनी गच्च भरलेले आणि सारा भारत
एकत्र आणणाऱ्या विश्वाचे प्रतीक म्हणजे स्टेडियम होय. श्रीराम फायनान्स देशाचे
आर्थिक क्षितीज आणखी विस्तारण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी वचनबद्ध आहे.
स्नेहाच्या बळकट बंधांची निर्मिती
अंततः ‘Together, We Soar’ ही केवळ मोहीम नाही; तर ती श्रीराम फायनान्सच्या आर्थिक सक्षमीकरणातील महत्त्वपूर्ण भागीदाराच्या
भूमिकेचा एक भरभक्कम पुरावा आहे. ग्राहकांना त्यांच्या वृध्दीसाठी आणि भरभराठीसाठी
आवश्यक असलेल्या वित्तपुरवठ्याच्या सहज उपलब्धतेसाठी मदत करण्याकरिता हा ब्रँड समर्पित
आहे. तसेच भारताचा विकसित अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करण्याच्या श्रीराम फायनान्सच्या वचनबद्धतेला बळकटी सुध्दा देते.
Comments
Post a Comment