जल्लोष, उत्साह, जोश आणि चैतन्यमय वातावरणात पार्ले महोत्सव २०२४ सुरु

जल्लोष, उत्साह, जोश आणि चैतन्यमय वातावरणात पार्ले महोत्सव २०२४ सुरु







मुंबईसह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने सहभागी असलेल्या पार्ले महोत्सव २०२४  ला अत्यंत उत्साहपूर्ण, जल्लोष, जोश आणि चैतन्यमय वातावरणात शानदार सुरुवात झाली. आमदार अॅड. पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी सुमारे १ हजार खेळाडूंनी विलेपार्ले येथील दुभाषी मैदानावर सादर केलेले आकर्षक संचलन हे सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

पंढरीच्या वारीप्रमाणेच पार्ले महोत्सव दरवर्षी होत असून या वारीला प्रत्येक खेळाडू, कलाकार आणि स्पर्धकांनी सहभागी झाले पाहिजे, हा महोत्सव मुंबईसह महाराष्ट्रात एक क्रीडा संस्कृती रूजवत आहे, इथला प्रत्येक सहभागी स्पर्धक भविष्यात एक उत्तम कामगिरी करणारी व्यक्ती, खेळाडू म्हणून ओळखला जाईल आणि एक स्पर्धक म्हणून दिलेला सहभाग आज द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त होईपर्यंत क्षमता निर्माण करून गेला, असे भावपूर्ण उद्गार द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गणेश देवरुखकर यांनी पार्ले महोत्सव २०२४ चे उद्घाटन करताना सांगितले.

सर्वसाधारणपणे आपण प्रसिद्ध खेळाडूंचे सामने किंवा स्पर्धा बघायला जातो. पण पार्ले महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे नामांकित खेळाडू आवर्जून क्रीडा क्षेत्रातील भावी पिढी आणि त्यांचे सामने बघण्यासाठी येत असतात. नवोदित खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात, या महोत्सवाचा व्याप आता दिवसेंदिवस वाढत असून ही क्रीडा आणि सांस्कृतिक चळवळ झाली असल्याचे महोत्सवाच्या सह आयोजिका ज्योती अळवणी यांनी सांगितले.

ज्येष्ठ प्रशिक्षक महेश आटाळे यांनी पालकांचे आवर्जून कौतुक केले. त्यांनी पुढाकार घेतल्यामुळेच नवोदित खेळाडू, लहान मुले या महोत्सवात सहभागी होत आहेत, त्यातून पुढे राज्याला आणि देशाला नवे खेळाडू आणि कलाकार मिळतील, जे आपल्या देशाचा लौकिक वाढवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी छत्रपती पुरस्कार विजेती जागतिक किर्तीची मल्लखांबपटू आणि पार्ले महोत्सवातील यापूर्वीची स्पर्धक जान्हवी जाधव हिने उपस्थितांना क्रीडा क्षेत्राला आणि खेळाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची शपथ दिली. मल्लखांब क्षेत्रातील राष्ट्रीय खेळाडू अवधूत पिंगळे तसेच कला-क्रिडा-सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. उद्घाटन सोहळ्याचे शानदार सूत्रसंचालन अमित पित्रे यांनी केले. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, स्लो सायकलिंग, गोळाफेक, पिकल बॉल, धावणे यांच्यासहर गायन, सदृढ बालक स्पर्धांचे आयोजन केले गेले. यात प्राथमिक फेरीसाठी सुमारे ३५०० स्पर्धकांनी भाग घेतला आहे.



Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE