लक्ष्मी डेंटल लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 13 जानेवारी 2025 पासून सुरू
लक्ष्मी डेंटल लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार
13 जानेवारी 2025 पासून सुरू
·
प्रत्येकी
2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 407 रुपये ते 428
रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
·
बोली/ऑफर
सोमवार 13 जानेवारी 2025 रोजी खुली होईल आणि बुधवार 15 जानेवारी 2025 रोजी बंद
होईल. प्रमुख गुंतवणूकदारांची बोली खुली आणि बंद होण्याचा दिनांक शुक्रवार 10
जानेवारी 2025 असणार आहे.
·
बोली
किमान 33 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 33 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
लक्ष्मी डेंटल लिमिटेड (“LDL” or “The Company”) सोमवार 13 जानेवारी 2025 रोजी इक्विटी शेअरची प्राथमिक समभाग विक्री करण्यासाठी बोली/ऑफर सुरू करत आहे. प्रति इक्विटी शेअरसाठी (“प्राईस बॅन्ड”) 407 रुपये ते 428 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 33 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 33 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“बिड लॉट”).
इक्विटी शेअर्सच्या एकूण ऑफर साईजमध्ये विक्री समभागधारकांद्वारे (प्रति शेअर 2 चे दर्शनी मूल्य) 1,380 दशलक्ष रु. [138 कोटी रु.] पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 13,085,467 [1.31 लाख इक्विटी शेअर्स] पर्यंतची विक्रीसाठीची ऑफर (“ऑफर फॉर सेल”) समाविष्ट आहे. (“एकूण ऑफर साईज”)
कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा वापर खालीलप्रमाणे करणार आहे: (i) कंपनीने घेतलेल्या ठराविक प्रलंबित कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/प्री-पेमेंट करण्यासाठी 229.84 दशलक्ष रु. [22.98 कोटी रु.] खर्च केला जाईल; (ii) ठराविक उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करून, ठराविक प्रलंबित कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/प्री-पेमेंट करण्यासाठी 46 दशलक्ष रु. [4.60 कोटी रु] खर्च केला जाईल; (iii) कंपनीसाठी नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी भांडवली खर्च आवश्यकतांसाठी 435.07 दशलक्ष रु. [43.51 कोटी रु.] खर्च केला जाईल; (iv) उपकंपनी Bizdent Devices Private Limited मध्ये नवीन यंत्रसामग्री खरेदीसाठी भांडवली खर्च आवश्यकतांसाठी 250.04 दशलक्ष रु. [25.00 कोटी रु. ] गुंतवणूक केली जाईल आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरली जाईल.
अमरिश महेंद्रभाई देसाई यांच्याकडून 150,040 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पराग जमनादास
भीमजियानी यांच्याकडून 150,040 पर्यंतचे
इक्विटी शेअर्स आणि कुणाल कमलेश
मर्चंट यांच्याकडून 150,040 पर्यंतचे
इक्विटी शेअर्स (सर्व मिळून “इतर विक्री समभागधारक”)
समाविष्ट आहेत:
प्रमुख गुंतवणूकदारांची बोली खुली आणि बंद होण्याचा दिनांक शुक्रवार 10 जानेवारी 2025 असणार आहे. बोली/ऑफर सोमवार 13 जानेवारी 2025 रोजी खुली होईल आणि बुधवार 15 जानेवारी 2025 रोजी बंद होईल. हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या 07 जानेवारी 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर करण्यात येत असून गुजरातमधील अहमदाबाद येथे कंपनी नोंदणी कार्यालय (“ROC”) येथे दाखल करण्यात आला आहे. या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेस BSE लिमिटेड ("BSE") आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनीला इक्विटी शेअर्सच्या लिस्टिंगसाठी बीएसई आणि एनएसईकडून 30 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पत्रांद्वारे ‘तत्त्वतः’ मंजुरी मिळाली आहे. ऑफरच्या उद्देशासाठी नियुक्त स्टॉक एक्सचेंज हे BSE असेल. नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
Comments
Post a Comment