डॉ. अगरवाल्स हेल्थ केअर लिमिटेडची आयपीओ ऑफर 29 जानेवारीपासून खुली होणार, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 382/- ते रु. 402/- जाहीर
डॉ. अगरवाल्स हेल्थ केअर लिमिटेडची आयपीओ ऑफर 29 जानेवारीपासून खुली होणार, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 382/- ते रु. 402/- जाहीर
नेत्रचिकित्सा वैद्यकीय सेवा क्षेत्रात देशात अग्रणी ब्रँड असलेल्या डॉ. अगरवाल्स हेल्थ केअर लिमिटेड कंपनीने आपल्या आगामी आयपीओ साठी प्राईस बँड जाहीर केला आहे. कंपनीने प्रतिसमभाग रु. 382/- ते रु. 402/- असा प्राईसबँड घोषित केला आहे. क्रिसिल एमआय अँड ए अहवालानुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये प्रचालन महसुलाच्या मापदंडानुसार नेत्र चिकित्सा वैद्यकीय सेवा क्षेत्रात डॉ. अगरवाल हेल्थ केअर लिमिटेड कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
डॉ. अगरवाल्स हेल्थ केअर क्लिनिक लिमिटेडची आयपीओ खुली ऑफर बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी गुंतवणुकीसाठी खुली होउन दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी बंद होणार आहे. इच्छुक गुंतवणूकदार किमान 35 समभागांचा एक लॉट व त्यापुढे 35 समभागांच्या पटीत गुंतणूक करु शकणार आहेत. आयपीओ इश्यूमध्ये 1,579,399 समभाग कर्मचाऱ्यासाठी तर शेअरहोल्डरसाठी 1,129,574 समभाग राखून ठेवण्यात आले आहेत.
आयपीओ ऑफरमध्ये रु. 300 कोटींचे नवे समभाग व कंपनीचे प्रमोटर,, गुंतवणूकदार व अन्य समभागधारक यांच्याकडून ऑफर फॉर सेल अंतर्गत 67,842,284 समभागांचा समावेश आहे. आयपीओ ऑफरद्वारे नव्या भांडवलापैकी रु. 195 कोटी रक्कम कंपनी आपल्यावरील कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. तर उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच काही रकमेतुन अन्य कंपन्या ताब्यात घेण्याचा देखील कंपनीचा मानस आहे.
डॉ. अगरवाल्स हेल्थकेअर नेत्र चिकित्सा क्षेत्रात मोतीबिंदु व अन्य शस्त्रक्रिया सांठी सल्ला, निदान, नॉन सर्जिकल उपचार, यासाठी सर्व प्रकारच्या सेवा पुरवणारी कंपनी आहे. तसेच कॉन्टॅक्ट लेन्स सामुग्री, व नेत्रचिकित्सा संबंधीचे औषधी उत्पपादनांची विक्री देखील या कंपनीकडून केली जाते. क्रिसिल एमआय अँड ए अहवाल 30 सप्टेंबर2024 अनुसार कंपनीचे देशभरात 209 सेवाकेंद्रांचे जाळे आहे. तसेच याच अहवालानुसार देशभरातील एकूण नेत्रचिकित्सा सेवेते या कंपनीचा वाटा तब्बल 25 टक्के आहे.
सप्टेंबर 30, 2024 अनुसार कंपनीची देशाच्या 14 राज्यातील 117 मेट्रो व बिगर मेट्रो शहरात मिळून एकूण 193 सुविधा केंद्रे सुरु आहेत. तसेच अन्य 16 केंद्रे आफ्रिका खंडात सुरु आहेत. कंपनी आपले कार्य हब अँड स्पोक आणि असेट लाईट आपरेटींग मॉडेलनुसार चालवते. क्रिसिल एमआय अँड ए अहवालानुसार कंपनीने देशातील दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरात देखील आपल्या सेवांचा विस्तार केला असून तेथे 70 केंद्रे सुरु आहेत तर देशातील अन्य भागात 123 केंद्रे सुरु आहेत.
डॉ. अमर अगरवाल हे डॉ. अगरवाल्स हेल्थकेअर कंपनीचे अध्यक्ष असून त्यांच्याकडे नेत्रचिकित्सा क्षेत्राचा तब्बल 35 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ऑप्थॅमोलॉजी क्षेत्रात शस्त्रक्रियेत नाविन्यता आणली असून त्या संबंधित संशोधनाचे प्रबंध जागतिक ख्यातीच्या जर्नल मधून प्रकाशित देखील झाले आहेत. कंपनीने केलेल्या संशोधनामध्ये इंट्रॉक्युलर लेन्स प्रोसिजन, कॉर्निया ट्रान्सप्लँटेशन, पीनहोल प्युपीलोप्लॅस्टी, सिंगल पास फोर-थ्रो प्युपिलो प्लॅस्टी आणि एलएएसआयके या शस्त्रक्रियांचा समावे आहे.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इनव्हेस्टर ॲडव्हायझर्स लिमिटेड या कंपन्या आयपीओच्या बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. तसेच केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी आयपीओ इश्यूची रजिस्ट्रार कंपनी आहे.
डॉ. अगरवाल्स् हेल्थेअर कंपनीचा आयपीओ बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे सादर केला जात आहे. त्याअंतर्गत इश्यूपैकी 50 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग अर्हताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवले जाणार नाहीत. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी 15 टक्क्यांपेक्षा कमी तर किरकोळ गुंतवणुकदारांसाठी 35 टक्क्यांपेक्षा कमी समभाग राखून ठेवले जाणार नाहीत.
Comments
Post a Comment