कॅपिटल इंफ्रा ट्रस्टची आयपीओ ऑफर 7 जानेवारी 2025 पासून, प्राईस बँड प्रतियुनिट रु. 99/- ते रु. 100/-

 

कॅपिटल इंफ्रा ट्रस्टची आयपीओ ऑफर 7 जानेवारी 2025 पासून, प्राईस बँड प्रतियुनिट रु. 99/- ते रु. 100/-



कॅपिटल इंफ्रा ट्रस्ट (आयनव्हीआयटी) या गवार कंस्ट्रक्शन लिमिटेड द्वारा प्रायोजित इंफ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट ट्रस्ट कंपनीने आयपीओच्या माध्यमातून रु. 1578 कोटी रुपये भांडवल उभे करण्यासाठी 27 डिसेंबर 2024 रोजी ऑफर डॉक्युमेंट अथवा दस्तावेज दाखल केला आहे. कंपनीने या इश्यूसाठी प्राईसबँड प्रतियुनिट रु. 99/- ते रु. 100/- जाहीर केला आहे.

कंपनीचे युनिट बीएसई एनएसई या प्रमुख शेअरबाजारांमध्ये सूचिबद्ध करण्यात येणार आहेत. युनिट इश्यू बुकबिल्डिंग पद्धतीने सादर करण्यात येत आहे. ज्यात संस्थात्मक गुतवणूकदारांसाठी 75 टक्क्यांपेक्षा अधिक युनिट उपलब्ध करण्यात येणार नाहीत. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 25 टक्क्यांपेक्षा कमी युनिट उपलब्ध करण्यात येणार नाहीत. दोन्ही गुंतवणूकदारांना गुणोत्तर प्रमाणानुसार युनिट उपलब्ध करण्यात येतील.

आयएनव्हीआयटी युनिटना क्रिसिल पतमानांकन संस्थेद्वारा 31 डिसेंबर 2024 रोजी क्रिसिल एएए/स्टेबल असे पतमानांकन प्रदान करण्यात आले आहे.

आयएनव्हीआयटी प्रामुख्याने 9 पूर्ण झालेले एकूण 682.245 कीमी चे महसूल देणारे इनिशियल पोर्टफोलिओ ॲसेट्स ताब्यात घेउन गुंतवणूक करणार आहे. तसेच त्यांचे व्यवस्थापन, प्रचालन तसेच देखभाल देखील करणार आहे. हे प्रकल्प एनएचएआय च्या मालकीचे असून याच संस्थेद्वारा सध्या ते एसपीव्हीच्या माध्यमातून चालवले जात आहेत. प्रस्तुत रस्ते हरयाणा, राजस्थान, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आहेत. या सर्व इनिशिअल पोर्टफोलिओ ॲसेटसना सप्टेंबर , 30, 2024 च्या माहितीनुसार सरासरी 11.7 वर्षांचे आयुष्य आहे. तसेच या व्यतिरिक्त आयव्हीआयटी ट्रस्टला इनव्हेस्टमेंट मॅनेजरच्या माध्यमातून अन्य प्रकल्प ताब्यात घेण्याचे हक्क देखील प्रदान करण्यात आले आहेत. या करिता ट्रस्टला फर्स्ट ऑफर ॲग्रीमेंट (आरओएफओ) प्रथम प्राधान्याचा हक्क देखील बहाल करण्यात आला आहे.

आयएनव्हीआयटी ट्रस्ट या युनिट विक्रीतून मिळणारे भांडवल एसपीव्ही प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी तसेच काही कर्जांची मुदतपूर्व परत फेड करण्यासाठी वापरणार आहे. तसेच स्पॉन्सर कडून घेतलेली कर्जे फेडण्यासाठी देखील या भांडवलाचा वापर करण्यात येणार आहे.

युनिट विक्री इश्यूसाठी लीड मॅनेजर म्हणून एसबीआय कॅपिटल मार्केटस लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड या कंपन्या काम पाहाणार आहेत. तर केफीन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी इश्यसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहाणार आहे. ॲक्सिस ट्रस्टीज सव्हीसेस लिमिटेड कंपनीला आयएनव्हीआयटीचही ट्रस्टी कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गवार इनव्हेस्टमेंट मॅनेजर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला इनव्हेस्टमेंट मॅनेजर पदावर नियुक्त करण्यात आले आहे. तसेच गवार कंस्ट्रक्शन लिमिटेडला स्मॉन्सर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE