क्वॉड्रंट फ्यूचर टेक लिमिटेडची आयपीओ ऑफर 7 जानेवारी 2025 पासून
क्वॉड्रंट फ्यूचर टेक लिमिटेडची आयपीओ ऑफर 7 जानेवारी 2025 पासून
क्वॉड्रंट फ्यूचर टेक लिमिटेड कंपनीने येत्या 07 जानेवारी 2025 पासून आयपीओच्या माध्यमातून खुली समभाग विक्री सुरु करण्याची घोषणा केली आहे. आयपीओ ऑफर गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी गुंतवणुकीसाठी बंद होईल. कंपनीच्या आयपीओद्वारे विक्रीस काढण्यात आलेल्या प्रत्येक समभागाचे फेस व्हॅल्यू रु. 10/- आहे. तसेच आयपीओ विक्रिसाठी प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 275/- ते रु. 290/- निश्चित केल्याचीही घोषणा कंपनीने केली आहे. गुंतवणूकदार किमान 50 समभागांच्या एका लॉटसाठी व त्यापुढे 50 समभागांच्या पटीत गुंतवणुकीसाठी बीड करु शकणार आहेत.
प्रत्येक समभागाचे फ्लोअर प्राईस समभागाच्या फेस व्हॅल्यूच्या 27.5 पट आहे तर कॅप प्राईस 29 पट आहे.
क्वॉड्रंट फ्यूचर टेक कंपनीचा आयपीओ पूर्णत: फ्रेश इश्यू आहे. म्हणजे कंपनीने नवे शेअर विक्रीस काढले आहेत. त्यातून रु. 2,900 दशलक्ष रुपये भांडवल उभारण्यात येणार आहेत.
नव्या शेअरच्या विक्रीतून उभारण्यात आलेल्या भांडवलापैकी रु. 1497.22 दशलक्ष रुपये कंपनीच्या स्पेशालीटी केबल डिव्हिजन विभागाच्या दीर्घकालीन खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच रु. 243.75 दशलक्ष कपंनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम विकसित करण्यासाठी भांडवली खर्च करणार आहे. त्याचप्रमाणे कंपनी रु. 236.19 दशलक्ष खेळत्या भांडवलासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. उर्वरित भांडवल सामान्य कार्पोरेट हेतुंसाठी राखून ठेवण्यात येणार आहे.
क्वॉड्रंट ही एक संशोधनावर आधारित कंपनी असून भारतीय रेल्वेसाठी आधुनिक ट्रेन कंट्रोल व सिग्नलींग सिस्टीम्स विकसित करण्याच्या कामात व्यस्त आहे. कंपनीच्या या सिस्टीम्स रेल्वे प्रवाशांना अत्युच्य सुरक्षा व विश्वासार्हता प्रदान करतात. तसेच कंपनीकडे खास प्रकारच्या केबल निर्मिती करण्याचा कारखाना असून त्यात इलेक्ट्रॉन बीम इरॅडीशन सेंटरचाही समावेश आहे.
कंपनीकडून निर्मिती करण्यात आलेल्या स्पेशालीटी केबल्स रेल्वेच्या रोलींग स्टॉक व नेव्हल डिफेन्स उद्योगात वापरल्या जातात. कंपनीच्या या स्पेशालीटी केबल कारखान्यात सोलर व इव्ही केबल्स निर्मितीची देखील पूर्ण पायाभूत व्यवस्था आहे. स्पेशालीटी केबल निर्मिती, चाचणी व संशोधन करण्यासाठी कंपनीकडे एक कारखाना आहे. तसेच ट्रेन कंट्रोल व सिग्नलींग विभागासाठी हार्डवेअर निर्माण करण्याची व्यवस्था कंपनीकडे आहे. हे दोन्ही कारखाने पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील बानूर तेहसील मधील बासमा गावात आहेत.
कंपनीकडे या बाबतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व सतत नाविन्यकरण करण्याचा ध्यास, कार्यक्षमता, उत्तम उत्पादन गुणवत्ता, क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीची टीम, तसेच देशातील स्त्रोतांसह काम करणारी डिझाईन व विकास टीम उपलब्ध आहे.
कंपनीच्या स्पेशालीटी केबल डिव्हिजनची एकूण उत्पादन क्षमता 30 सप्टेंबर 2024च्या आकडेवारीनुसार 1,887.60 मेट्रीक टन आहे.
कंपनीने आपले रेल्वे सिग्नलींग अँड एम्बेडेड सिस्टिम डिझाईन केंद्र ट्रेन कंट्रोल प्रॉडक्ट्स अँड सोल्यूशन्स साठी वाहून घेतले आहे. या व्यतिरिक्त कंपनी आता कवच अंतर्गत ट्रेन कॉलीजन अव्हॉयडन्स सिस्टिम्स अँड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग सिस्टिमसाठी काम करीत आहे. कवच ही भारतीय रेल्वेसाठी ऑटोमॅटीक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टिम आहे. याच्या माध्यमातून रेल्वेची सुरक्षा वाढवण्यावर कंपनीने भर दिला आहे.
भारतीय रेल्वेच्या कवच कार्यान्वयाअंतर्गत कंपनीला 12 डिसेंबर 2024 रोजी मोठी परचेस ऑर्डर मिळाली आहे. चित्रांजन लोकोमोटीव्ह वर्क्स विभागाला कवच उपकरणे पुरवण्याची ही ऑर्डर आहे. ज्यात तब्बल 1200 लोकोमोटीव्हना रु. 9,786.06
दशलक्ष मूल्याची सुरक्षा उपकरणे कंपनीकडून पुरवली जाणार आहेत. यात उपकरणांची उभारी, कार्यान्वयन, चाचणी आदी कामांचा समावेश आहे. तसेच 01 मे 2024 रोजी कंपनीने रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियालिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार कंपनी भारतीय रेल्वे व विदेशात कवच विषयी संधीसाठी सरकारसोबत सहकार्य करणार आहे.
सुंडे कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आयपीओची बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. तसेच लींक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आयपीओची रजिस्ट्रार कंपनी आहे.
Comments
Post a Comment