भारत - इंडोनेशिया भागीदारी: AMFI आणि AMII यांनी गुंतवणूक व्यवस्थापन व्यवसायातील ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली
भारत - इंडोनेशिया भागीदारी: AMFI आणि AMII यांनी गुंतवणूक व्यवस्थापन व्यवसायातील ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली
भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध तसेच सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी, उद्योग मानके वाढवण्यासाठी आणि उद्योग पद्धती सामायिक करण्यासाठी सामंजस्य करार
द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) आणि असोसिएसी मॅनेजर इन्व्हेस्टासी इंडोनेशिया (AMII), इंडोनेशियन इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स असोसिएशनने द्विपक्षीय आर्थिक वाढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इंडोनेशियाच्या म्युच्युअल फंड उद्योगातील 12 शीर्ष सीईओंचे शिष्टमंडळ सध्या इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसोबत भारत भेटीवर आले आहे. तेव्हाच, सहकार्याद्वारे सर्वोत्तम आर्थिक पद्धती राबवण्यासाठी 25 जानेवारी, 2025, रोजी नवी दिल्ली येथे या सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करण्यात आली. ही भागीदारी दोन्ही देशांमधील म्युच्युअल फंड क्षेत्रांना बळकट करण्यासाठी, उद्योग मानके समृद्ध करण्यासाठी, गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी, अधिक गतिमान, पारदर्शक आणि जागतिक स्तरावर एकात्मिक म्युच्युअल फंड इकोसिस्टमसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी करण्यात आली आहे.
भारत आणि इंडोनेशियातील म्युच्युअल फंड उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार सर्वोत्तम पद्धती, अंतर्दृष्टी आणि धोरणांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करेल. या भागीदारीमध्ये नियामक सुधारणांची आवश्यकता, प्रशासन मानके, गुंतवणूकदारांच्या संरक्षणाची आवश्यक पावले, डेटा विश्लेषण, संशोधन, उत्पादन नवकल्पना आणि दोन्ही देशांना एकमेकांच्या कौशल्याचा तसेच अनुभवांचा फायदा होईल याची खात्री करण्यासाठी जोखीम व्यवस्थापनाची आवश्यकता यासह या क्षेत्राच्या व्यापक स्पेक्ट्रमची समज आणि गरज समाविष्ट केली जाईल.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, AMFI ने इंडोनेशियातून आलेल्या AMII च्या शिष्टमंडळासाठी एका परिषदेचे आयोजन केले होते. यात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे प्रमुख पैलू, म्युच्युअल फंड क्षेत्रातील संधी आणि भांडवली बाजार चालविण्यामध्ये तंत्रज्ञानाची निर्णायक भूमिका यावर प्रकाश टाकला होता. या परिषदेत GIFT सिटीमधील उदयोन्मुख संधींचाही शोध घेण्यात आला आणि आर्थिक नवकल्पनेसह प्रशासनामध्ये भारताच्या नेतृत्वावर भर देण्यात आला.
या गोलमेज परिषदेतील प्रमुख वक्ते :
• श्री. अमिताभ कांत, शेर्पा, G20 आणि निती आयोगाचे माजी सीईओ
• श्री. अनुज कुमार, व्यवस्थापकीय संचालक, CAMS
• श्री. हनीफ मांटिक, इंडोनेशियातील AMII चे अध्यक्ष आणि Star AM चे सीईओ
• श्री. मोहम्मद ओकी रमाधना, इंडोनेशियन स्टॉक एक्सचेंज (IDX) चे आयुक्त
• श्री. मार्संगप पी तांबा, APRDI आणि PWMII चे अध्यक्ष आणि PT प्रिन्सिपल एएम, इंडोनेशियाचे आयुक्त
या महत्त्वाच्या प्रसंगी, AMFI चे अध्यक्ष श्री. नवनीत मुनोत म्हणाले, “भारताचे इंडोनेशियासोबतचे सहकार्य हे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारत 2047 च्या ध्येयाशी जोडलेले आहे. तसेच इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यपूर्तीच्या शताब्दी वर्षात म्हणजेच 2045 पर्यंत विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या इंडोनेशियाच्या लक्ष्याशी देखील जोडलेले आहे. आर्थिक सहयोग आणि परस्पर वाढीस चालना देणाऱ्या, ग्लोबल साउथच्या नेतृत्वाप्रती भारताच्या वचनबद्धतेचा ही भागीदारी पुनरुच्चार करते. भारताच्या म्युच्युअल फंड क्षेत्राच्या यशाचे उदाहरण म्हणून मजबूत भांडवली बाजार आणि भरभराट करणारा मालमत्ता व्यवस्थापन उद्योग हे टप्पे गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या सहकार्यामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक म्युच्युअल फंड उद्योगाचा पाया रचला जाईल.”
हाच धागा घेऊन पुढे श्री. व्यंकट चालसानी, मुख्य कार्यकारी, AMFI म्हणाले, "भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांतील म्युच्युअल फंड उद्योगाच्या वाढीतील हे सहकार्य हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एकत्र काम करून, आम्ही मार्केटच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या आर्थिक उद्योग, शासन मानके, गुंतवणूकदारांच्या विश्वासाला बळ देणे आणि नावीन्यपूर्ण अनोखे उपक्रम अशा घटकांबाबत समजून घेण्याची एक अनोखी संधी निर्माण करत आहोत. या सामंजस्य करारामुळे उद्योग संस्थांच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ होईल."
AMII शिष्टमंडळ, यात इंडोनेशिया स्टॉक एक्सचेंजचे आयुक्त, AMII चे अध्यक्ष आणि इंडोनेशियाच्या मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. दोन्ही देशातील हे प्रमुख नेते म्युच्युअल फंडांच्या भविष्याला आकार देण्यासाठी चर्चेत गुंतले आहेत. उद्योग प्रशासन, नवकल्पना आणि ऑपरेशनल उत्कृष्टतेवर यावरच मुद्देसूद चर्चा करून हा सामंजस्य करार प्रगतीशील, सीमापार सहकार्यासाठी ब्लू प्रिंट तयार करेल.
AMII चे अध्यक्ष श्री. हनीफ मांटिक म्हणाले, "जागतिक पातळीवरील म्युच्युअल फंड मार्केटच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा क्षण आहे. एकमेकांच्या नियामक फ्रेमवर्क आणि गव्हर्नन्स स्ट्रक्चर्समधून शिकून, आम्ही आमच्या गुंतवणुकदारांना अधिक सुरक्षितता आणि नवीन ऑफर्स ऑफर करू शकू. AMFI सह सहकार्य हे उदयोन्मुख बाजारपेठांमधील आर्थिक क्षेत्रांमधील बंध मजबूत करण्यासाठी एक मॉडेल म्हणून काम करेल."
या सहकार्यांतर्गत उपक्रमांमध्ये भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांमधील गुंतवणूकदारांना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेल्या कार्यशाळा, संशोधन आणि कार्यक्षम निर्मिती गोष्टींचा समावेश असेल, ज्यायोगे जबाबदार गुंतवणूक पद्धतींना प्रोत्साहन मिळेल.
AMFI आणि AMII यांच्यातील सामंजस्य करार परस्पर हिताच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्यरत गट देखील स्थापन करेल. दोन्ही राष्ट्रांसाठी हे सहकार्य कालानुरूप, योग्य आणि प्रभावी राहील, हे सुनिश्चित करून हे गट पुढाकार घेतील आणि भागीदारीच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी नियमित पुनरावलोकन करतील. ही भागीदारी पुढील विस्तारासाठी एक योग्य मार्ग म्हणून काम करेल, ज्यामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक बाजारपेठांमधील संबंध अधिक दृढ होतील.
Comments
Post a Comment