डिसेंबर २०२४ मध्ये भारतातील प्रमुख ट्रक मार्गांवरील ट्रक भाडी स्थिर राहिली: श्रीराम मोबिलिटी बुलेटिन
डिसेंबर २०२४ मध्ये भारतातील प्रमुख ट्रक मार्गांवरील ट्रक भाडी स्थिर राहिली: श्रीराम मोबिलिटी बुलेटिन
• जानेवारी 2025 मध्ये महाकुंभ मेळ्याच्या तयारीमुळे प्रयागराज प्रदेशात ट्रक मालवाहतूक व्यवसायात 30% ते 40% वाढ झाली.
• रब्बी पिकांच्या हंगामामुळे कृषी ट्रॅक्टरांच्या विक्रीत 26% टक्क्यांनी वाढ
• अर्थ मुविंग इक्विपमेंट वाहनांच्या विक्रीत 13% टक्क्यांनी झालेली वाढ पायाभूत सुविधांच्या विकास कामांतील वाढ दर्शविते
• डिसेंबर 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये FASTag व्यवहारांमध्ये 10% वाढ झाली आणि व्यवहार मूल्यात 13% वाढ झाली, जे सुट्टीच्या काळात रस्त्यावरील प्रवास वाढ दर्शवते
• एप्रिल-डिसेंबर 2024 या कालावधीत दुचाकी वाहनांच्या विक्रीत 11% वाढ
• एनसीआर प्रदेशात BS3 आणि BS4 डिझेल वाहनांच्या प्रवेशावर असलेल्या बंदीमुळे त्या भागात ट्रक मालवाहतूकदारांसमोर आव्हानात्मक स्थिती
हिवाळ्यातील कडक थंडी त्याचबरोबर विविध वस्तूंच्या वापरात आलेल्या मंदीमुळे मालवाहतूकीवर परिणाम होऊन डिसेंबर 2024 मध्ये भारतातील बहुतांश ट्रक मार्गांवर ट्रक मालवाहतूक भाड्याचे दर स्थिर राहिले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये कोलकाता-गुवाहाटी-कोलकाता आणि मुंबई-चेन्नई-मुंबई यासारख्या काही प्रमुख ट्रक मार्गांवर ट्रकभाडेदरात मासिक (महिना दर महिना) अनुक्रमे 1.5% आणि 1.3% वाढ झाली, तर दिल्ली-मुंबई-दिल्ली या प्रमुख मार्गावर दर 0.7% कमी झाले आहे.
प्रयागराज भागात येत्या 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या दरम्यान होत असलेल्या आगामी महाकुंभ मेळ्याच्या तयारीमुळे डिसेंबरमध्ये तेथील ट्रक मालवाहतूक व्यवसायात 30% ते 40% वाढ झाली. तथापि, कुंभमेळ्याच्या काळात 45 दिवसांमध्ये तेथे ट्रकच्या प्रवेशावर निर्बंध राहणार आहेत. त्यामुळे प्रयागराजकडे आणि तेथून अन्य भागाकडे मालवाहतूकीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि त्यामुळे ट्रक भाड्यावर किंचिॉत परिणाम होऊ शकतो. तसेच एनसीआर प्रदेशात BS3 आणि BS4 डिझेल वाहनांच्या प्रवेशावर असलेल्या बंदीमुळे त्या भागात ट्रक मालवाहतूकदारांसमोर आव्हानात्मक स्थिती निर्माण झालेली आहे.
श्री. वाय. एस. चक्रवती, व्यस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीराम फायनान्स लिमिटेड अहवालाबाबत टिप्पणी करताना म्हणाले, “भारतातील ट्रक वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रासाठी डिसेंबर २०२४ हा तसा थंड आणि स्थिर महिना राहिलेला आहे. प्रमुख ट्रक वाहतूक मार्गावर ट्रकभाडेदर स्थिर राहिलेले असले तरी ट्रक ताफ्याच्या वापराचे प्रमाण कमीच असल्याचे दिसून आलेले आहे. प्रयागराज भागात आगामी काळात होत असलेल्या कुंभमेळ्यामुळे तेथे मालवाहतुकीसाठी ट्रकच्या मागणीत वाढ होताना दिसत आहेत. परंतु मेळ्याच्या काळात २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत तेथे जड वाहनांच्या वाहतूकीवरील निर्बंधांमुळे ट्क वाहतूकीच्या व्यवसायाला लगाम बसू शकतो. परंतु देशभर सुरु झालेला रब्बी हंगाम तसेच पायाभूत सुविधांच्या विकास कामांत झालेल्या वाढीमुळे कृषी ट्रॅक्टर आणि अर्थ मुविंग इक्विपमेंट वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन मिळालेले आहे.
डिसेंबर 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये FASTag व्यवहारांमध्ये 10% वाढ झाली आणि व्यवहार मूल्यात 13% वाढ झाली. यातून सुट्टीच्या हंगामात रस्त्यावरील प्रवास वाहतुकीत वाढ झाल्याचे निदर्शनास येते. डिसेंबर 2024 मध्ये वार्षिक तुलनेत (वर्ष-दर-वर्ष) पेट्रोल आणि डिझेलसाठी इंधन वापरात अनुक्रमे 11% आणि 6% वाढ दिसून आलेली आहे. एप्रिल-डिसेंबर 2024 या कालावधीत दुचाकी वाहनांच्या विक्रीत 11% एकत्रित वाढ झाली असताना, त्याच कालावधीत मोटार कार विक्रीत 0.1% घट दिसून आली आहे.
डिसेंबर 2024 मध्ये भारतातील प्रमुख बंदरांद्वारे हाताळल्या जाणाऱ्या बल्क कार्गोमध्ये गत महिन्याच्या तुलनेत 7% तर गत वर्षाच्या तुलनेत 3% वाढ झाली आह. तर कंटेनरीकृत मालवाहू मालमत्तेत गत महिन्याच्या तुलनेत 12% आणि गत वर्षाच्या तुलनेत 16% वाढ नोंदवली गेली आहे.
Comments
Post a Comment