दादासाहेब फाळके चित्रनगरीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन!
दादासाहेब फाळके चित्रनगरीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन!
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते आज सकाळी भांडार विभागाच्या समोरील परिसरात ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी महामंडळातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रजासत्ताक दिन हा एक गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकतेची भावना दृढ करण्यासाठी चित्रनगरीतही अभिमानाने भारतीय ध्वजाची शान उंचावली गेली.
दरम्यान चित्रनगरीत असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment