प्रजासत्ताक दिनी नृत्यातून भारतीय एकात्मतेचे दर्शन *एन. डी स्टुडिओत विद्यार्थ्यांचा कलाविष्कार
प्रजासत्ताक दिनी नृत्यातून भारतीय एकात्मतेचे दर्शन
*एन. डी स्टुडिओत विद्यार्थ्यांचा कलाविष्कार
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करत दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी शेतकरी नृत्य,पथनाट्य,लेझिम, इतिहास का मे, युनिटी इन डायव्हर्सिटी अशा विविध प्रकारचे नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी सहाय्यक लेखा अधिकारी महेश भांगरे, , श्रीकांत देसाई, हेमंत भाटकरआदी मंडळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment