साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित

 साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर



साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांनी केली.   

नामांकने प्राप्त झालेले कलाकार तसेच पुरस्कार प्राप्त तांत्रिक व  बालकलाकार यांचे मंत्री आशिष शेलार , सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. 

सन 2022 या वर्षातील  साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या,पाँडिचेरी,सनी,धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाईंड मॅन, समायरा,गाभ,ह्या गोष्टीला नावच नाही,ग्लोबल आडगाव,हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. 

तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर(उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी, (फोर ब्लाइंड मॅन) ओंकार बर्वे (फोर ब्लाइंड मॅन) , प्रियंकर घोष (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रन सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.  

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्ध गोडबोले ,विवेक लागू,बाबासाहेब सौदागर,विजय भोपे,श्रीरंग आरस,राजा फडतरे,शरद सावंत,मेधा घाडगे,चैत्राली डोंगरे,विनोद गणात्रा,प्रकाश जाधव,शर्वरी पिल्लेई,जफर सुलतान,देवदत्त राऊत,विद्यासागर अध्यापक यांनी केले होते. 

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे

१. सर्वोत्कृष्ट कथा : १.अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव) २. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मॅन) ३. सुमित तांबे (समायरा )

२. उत्कृष्ट पटकथा : १. इरावती कर्णिक (सनी) २.पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मॅन) तेजस मोडक - सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी) 

३. उत्कृष्ट संवाद: १. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २.मकरंद माने सोयरिक ३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

४. उत्कृष्ट गीते: १. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव, गाणे : यल्गार होऊ दे) २.अभिषेक रवणकर (अनन्या,गाणे-ढगा आड या) ३.प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा गाणे-अलगद मन हे)

५. उत्कृष्ट संगीत : १.हितेश मोडक (हर हर महादेव) २.निहार शेंबेकर (समायरा) ३.विजय गवंडे (सोंग्या)

६. उत्कृष्ट पार्श्वसंगीत : १.अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २.हनी सातमकर (आतुर) ३.सौमिल सिध्दार्थ (सनी) 

७.उत्कृष्ट पार्श्वगायक: १.मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गीत :भेटला विठ्ठल माझा) २.पद्मनाभ गायकवाड (गुल्हर गीत - का रे जीव जळला) ३.अजय गोगावले

(चंद्रमुखी गीत : घे तुझ्यात सावलीत)

८. उत्कृष्ट पार्श्वगायिका: १.जुईली जोगळेकर (समायारा गीत - सुंदर ते ध्यान)२.आर्या आंबेकर (चंद्रमुखी गीत बाई ग कस करमत नाही) ३.अमिता घुगरी (सोयरिक गीत - तुला काय सांगु कैना)

९. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक : १.राहूल ठोंबरे-सजीव होवाळदार (टाईमपास 3 गीत : कोल्ड्रीक वाटते गार) २.उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गीत- आई जगदंबे) श्री. सुजीत कुमार (सनी गीत - मी नाचणार भाई)

१०.उत्कृष्ट अभिनेता:१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे )२.वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)३.ललीत प्रभाकर (सनी)

११.उत्कष्ट अभिनेत्री : १.सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी)२.अमृता खानविलकर(चंद्रमुखी)

३.सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)

१२.उत्कृष्ट विनोदी अभिनेता १.मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)२.संजय नार्वेकर (टाईमपास 3) ३.भारत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)

१३. सहाय्यक अभिनेता :१. योगेश सोमण (अनन्या) २ किशोर कदम (टेरीटरी)

३.सुबोध भावे (हर हर महादेव)

१४.सहाय्यक अभिनेत्री: १.स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २.क्षिती जोग (सनी),मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

१५.उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :१.अकुंर राठी (समायरा)

२.रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)

३.जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)

१६.उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री १.ऋता दुर्गुळे (अनन्या) २.सायली बांदकर (गाभ) ३.मानसी भवालकर:( सोयरिक)

याबरोबरच प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता आतुर(मे.झेनिथ फिल्म्स), गुल्हर(मे.आयडियल व्हेन्चर),ह्या गोष्टीला नावच नाही(मे.पायस मेडिलीक्स) या चित्रपटांना नामांकन मिळाले आहे तर प्रथम पदार्पण दिग्दर्शन करिता 4 ब्लाइंड मॅन,गाभ,अनन्या  चित्रपटांना नामांकन प्राप्त झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE