चारकोपमध्ये स्वयंपुनर्विकास कार्याला वेग; १४ वा प्रकल्प “त्रिरत्न” चे भूमिपूजन
चारकोपमध्ये स्वयंपुनर्विकास कार्याला वेग;
१४ वा प्रकल्प “त्रिरत्न” चे भूमिपूजन
जुन्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकास कार्याला चारकोप, कांदिवली पश्चिम येथे मोठ्या प्रमाणवर वेग येत असून १४ व्या प्रकल्पाचे शानदार भूमिपूजन चारकोप त्रिरत्न संस्था आणि स्वामी पीएमसी यांनी गणतंत्र दिवसाचे औचित्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेले प्रोत्साहन आणि आवाहनानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष सचिन खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले, यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनीही शुभेच्छा दिल्या.
संस्थेतील सदस्य यांनी एकत्र येऊन स्वतः आणि स्वामी पीएमसी यांच्या संयुक्त मदतीने ६ महिन्याच्या कालावधीत स्वयंपुनर्विकास प्रकल्प योजना आखली, सदर प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी म्हाडाच्या कार्यालय मधील सर्व शासकीय मान्यता अतिशय तत्परतेने देण्यात आल्या. संस्थेने आणि स्वामी पीएमसी यांनी म्हाडाचे तत्कालीन उपाध्यक्ष श्री. जयस्वाल, मुंबई बोर्डचे मुख्य अधिकारी श्री. बोरीकर आणि इतर सर्व अधिकारी वर्ग यांचे आभार मानले. मागील काही वर्षांमध्ये सरकार आणि शासकीय कार्यालये यांच्या संयुक्त सहकार्याने स्वयंपुनर्विकास प्रकल्पास चालना देण्यात येत असून यापुढे राज्यातील विविध विकास कामे स्वयंपुनर्विकास पद्धतीत पार पडतील अशी माहिती स्वामी पीएमसी यांच कार्यकारी दत्तात्रय भणगे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment