काळा घोडा महोत्सवात चित्रनगरी साकारणार सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा
काळा घोडा महोत्सवात चित्रनगरी साकारणार सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा
मुंबई २४: मुंबई नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या सुप्रसिद्ध काला घोडा महोत्सवात यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा साकारण्यात येणार आहे. सिने निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक टाकाऊ साहित्यातून हा घोडा साकारण्यात येणार आहे.
काळा घोडा महोत्सवात येणाऱ्या चोखंदळ आणि हौशी प्रेक्षकांसाठी नेहमीच विविध कलाकृती सादर केल्या जातात. यावर्षी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली प्रत्येक कलाकाराच्या कलेचा गौरव करणाऱ्या लंबी रेस का घोडा या संकल्पनेवर आधारित सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा तयार केला जात आहे. कलाकारांनी कलाकारांसाठी तयार केलेला हा घोडा म्हणजे प्रत्येक कलाकाराला दिलेली ही मानवंदना असणार आहे. या शिल्पाच्या निर्मितीसाठी लागणारे सर्व साहित्य हे तांत्रिक टाकाऊ वस्तुतून आणि पर्यावरण पूरक साहित्याच्या वापरातूनच करण्यात येणार असून डॉ. सुमित पाटील यांनी या शिल्पाचे कला दिग्दर्शन केले आहे.
शाश्वत सिनेनिर्मिती या संकल्पनेवर या कलाकृतींच्या माध्यमातून भर देण्यात आला असल्याचे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्यलेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment