कॉस्मिया फायनान्शिअल होल्डिंग्सचा ‘म्युच्युअल फंड’ व्यवसायात प्रवेश निश्चित

 

कॉस्मिया फायनान्शिअल होल्डिंग्सचा ‘म्युच्युअल फंड’ व्यवसायात प्रवेश निश्चित

म्युच्युअल फंड व्यवसाय प्रायोजित करण्यासाठी सेबीची मंजुरी

 सॅम घोष प्रवर्तित कॉस्मिया फायनान्शिअल होल्डिंग्सला (सीएफएच) म्युच्युअल फंड व्यवसाय प्रायोजित करण्यासाठी सेबीकडून मंजुरी मिळाली असून, ‘कॉस्मिया’चा म्युच्युअल फंड व्यवसायातील प्रवेश निश्चित झाला आहे. याद्वारे देशात वेगाने विस्तारणाऱ्या वित्तीय बाजारपेठांमध्ये आपले अस्तित्व वाढविण्याच्या ‘कॉस्मिया’च्या प्रवासात एक मैलाचा ठरणार आहे.

 ‘कॉस्मिया’ने मे २०२४ मध्ये म्युच्युअल फंड व्यवसाय प्रायोजित करण्यासाठी सेबीकडे अर्ज दाखल केला होता. आता सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (म्युच्युअल फंड) रेग्युलेशन, १९९६ अंतर्गत नोंदणीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे.

 भारतीय गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी क्वांट आणि स्मार्ट बीटा धोरणांवर लक्ष केंद्रित करून ‘कॉस्मिया’ समूह त्यांच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीमध्ये २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ‘कॉस्मिया’ने १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱ्या जागतिक ईटीएफ आणि ईटीपी प्रायोजक विझडमट्रीसोबत यासंबंधी करारही केला आहे.

 ‘कॉस्मिया’ सध्या ब्रोकिंग अँड डिस्ट्रीब्यूशन, वेल्थ मॅनेजमेंट आणि अॅडव्हायझरीसह भांडवली बाजार व्यवसायांमध्ये एक हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासह सल्लागार म्हणून भूमिका बजावत आहे. ‘कॉस्मिया’ समूहाने नुकताच ‘कॅट थ्री अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड’ (एआयएफ) परवाना आणि ‘गिफ्ट सिटी’मध्ये ‘फंड मॅनेजमेंट एंटिट’ परवाना मिळवत आपला विस्तार केला.

 गेल्या तीन वर्षांत १५ हजार कोटी रुपयांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) साध्य करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांसह, ‘कॉस्मिया’ने सुपरअॅपच्या माध्यमातून वितरणाचे जाळे निर्माण केले असून, धोरणात्मक भागीदारीद्वारे तंत्रज्ञान-आधारित विकासातील कौशल्याचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

 कॉस्मिया फायनान्शियल होल्डिंग्सचे संस्थापक आणि अध्यक्ष सॅम घोष म्हणाले, “म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करण्यासाठी सेबीची मान्यता मिळाली. याता आनंद होत आहे. वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा समूहात रूपांतरित होण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा व मैलाचा दगड आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानातील आमची गुंतवणूक आणि विझडमट्रीसारख्या बाजारपेठेतील दिग्गजांशी भागीदारीद्वारे, आम्ही भारतीय गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक सोल्यूशन्सची  फेररचना करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. क्वांट आणि स्मार्ट बीटा धोरणांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासह नाविन्यपूर्ण आणि ‘डेटा’वर आधारित दृष्टिकोनातून कार्यवाही केली जाईल. तंत्रज्ञान-प्रथम, ग्राहक-केंद्रित वित्तीय इकोसिस्टम तयार करण्याच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाची ही केवळ सुरुवात आहे.”

 कॉस्मिया इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (सीआयपीएल) ही कॉस्मिया समूहांतर्गत सर्व वित्तीय सेवा व्यवसायांसाठी होल्डिंग कंपनी आहे. कंपनी तीन प्रमुख विभागात काम करते.

  भांडवली बाजार: सीआयपीएल कंपनी ‘ब्रोकिंग’, वितरण, संपत्ती व्यवस्थापन आणि सल्लागार, यासह सर्वसमावेशक सेवा प्रदान करते. कंपनीचे सुपरअॅप अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून, सक्षम ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ आहे. त्याबाबत गुंतवणूकदार निश्चितच समाधानी आहेत.

  मालमत्ता व्यवस्थापन: पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस) मध्ये १७० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवस्थापन करणाऱ्या कॉस्मियाने नुकताच गिफ्ट सिटीमध्ये कॅट-३ एआयएफ परवाना आणि फंड मॅनेजमेंट एंटिटी परवना मिळवला आहे. मालमत्ता व्यवस्थापनासाठी ‘डिजिटल-फर्स्ट’ दृष्टिकोनासह पुढील सहा ते नऊ महिन्यांत देशांतर्गत आणि परदेशात (ऑफशोर) व्यवसाय सुरू करण्यावर कंपनीचा भर आहे.

  विमा: कतार इन्शुरन्स कंपनी (क्यूआयसी) आणि इतर गुंतवणूकदारांच्या भागीदारीत, कॉस्मियाने जनरल इन्शुरन्स परवान्यासाठी अर्ज केला आहे. विमा क्षेत्रात स्थान बळकट करण्यासाठी वितरण नेटवर्क आणि व्यवस्थापन कौशल्याचा फायदा घेण्याचे समूहाचे उद्दिष्ट आहे.

 वैविध्यपूर्ण ऑफर, अनुभवी नेतृत्वाची टीम आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून कॉस्मिया फायनान्शियल होल्डिंग्स भारताच्या वित्तीय बाजारांच्या अफाट वाढीच्या क्षमतेचा फायदा घेण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या सज्ज आहे.

 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE