टाटा न्यू तर्फे ‘फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस’ नवीन योजना सादर करून ‘टाटा न्यू’ ने बचतीला दिली गती
टाटा न्यू तर्फे ‘फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस’
नवीन योजना सादर करून ‘टाटा न्यू’ ने बचतीला दिली गती
मुंबई, ८ जानेवारी २०२५: टाटा डिजिटल कंपनीने आपल्या टाटा न्यू या प्लॅटफॉर्मवर फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस ही सुविधा सादर केली असून या माध्यमातून किरकोळ गुंतवणुकीच्या क्षेत्रात आपला विस्तार केला आहे. या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना ९.१ टक्क्यांपर्यंतच्या व्याजदराने आघाडीच्या वित्तीय संस्थांमध्ये मुदत ठेवींत गुंतवणूक करता येईल. त्याकरीता त्यांना बॅंकेच्या बचत खात्याची गरज लागणार नाही. गुंतवणूक करणे आता पूर्वीपेक्षा सोपे आणि अधिक सुलभ झाले आहे. ‘टाटा न्यू’चे ग्राहक आता कमीतकमी १००० रुपयांची गुंतवणूक अखंड डिजिटल प्रक्रियेद्वारे अवघ्या १० मिनिटांत करू शकतात. ग्राहकांची सुरुवातीच्या भांडवलाची रक्कम कितीही असली, तरी या सुविधेमुळे प्रत्येक ग्राहकासाठी आर्थिक सक्षमीकरणाचे दरवाजे उघडले जातील. थेट बॅंकांमध्ये होणाऱ्या या गुंतवणुकीवर ‘डिपॉझिट इन्शुरन्स अॅंड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ (डीआयसीजीसी) या संस्थेद्वारे ५ लाख रुपयांचा विमा मिळतो.
गौरव हजरती, वित्तीय सेवा विभाग-मुख्य व्यवसाय अधिकारी, टाटा डिजिटल म्हणाले,“मुदत ठेव हा सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठीचा एक विश्वासार्ह पर्याय आहे. आमच्या ‘फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस’मध्ये आम्ही ग्राहकांना निश्चित परतावा व उच्च व्याजदर देणाऱ्या विश्वसनीय वित्तसंस्थांच्या सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. बाजारातील स्पर्धात्मक व्याजदर मिळवून देण्यासाठी हा साधा, सुरक्षित प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेला आहे. त्याचा लाभ नवोदित आणि अनुभवी अशा दोन्ही गुंतवणूकदारांना होईल आणि त्यांना आपली संपत्ती सहजतेने वाढविण्याचा आत्मविश्वासही यातून मिळेल."
पराग शर्मा, सीएफओ-व्यवस्थापकीय संचालक, श्रीराम फायनान्स म्हणाले,"टाटा न्यू प्लॅटफॉर्मवर आमच्या मुदत ठेवी सादर करण्याकरीता आम्ही ‘टाटा डिजिटल’सोबत भागीदारी केली आहे. आम्ही महिला ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ व चांगला परतावा देत असतो. आमच्या या भागीदारीमुळे ग्राहकांना मुदत ठेवी ठेवण्याचा अखंडीत व सुरळीत अनुभव मिळेल."
‘टाटा न्यू’च्या ‘फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस’मध्ये आणखी अधिक बँका सहभागी होणार असल्याने ग्राहकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. त्यांना नियमित व पद्धतशीर गुंतवणूक करता यावी, यासाठी टाटा न्यू आवर्ती ठेवी (रिकरिंग डिपॉझिट) योजनादेखील सुरू करणार आहे.
Comments
Post a Comment