रेमंड १०० ऑटोफेस्ट : उत्कृष्टतेच्या शतकाच्या गौरवार्थ ऑटोमोटिव्ह वारशाचा तीन-दिवसीय उत्सव
रेमंड १०० ऑटोफेस्ट : उत्कृष्टतेच्या शतकाच्या गौरवार्थ
ऑटोमोटिव्ह वारशाचा तीन-दिवसीय उत्सव
रेमंड समूह आपले शताब्दी वर्ष यंदा सादरे करीत आहे. त्या निमित्ताने ‘रेमंड १०० ऑटोफेस्ट’ हा एक विलक्षण कार्यक्रम या
समुहाने आयोजित केला आहे. येत्या दि. १० ते १२ जानेवारी दरम्यान ठाण्यातील जेके
ग्राम येथे ‘सुपर कार क्लब गॅरेज’
(एससीसीजी) यांच्यातर्फे आयोजित होणाऱ्या होणाऱ्या या ऑटोफेस्टमध्ये नव्या-जुन्या
गाड्यांचा एक दुर्मिळ खजिना मांडण्यात येणार आहे. मोटरसायकली, मोटारी यांच्या
शौकीनांना या ऑटोफेस्टमध्ये रोमांचक सफर घडून येणार आहे. शक्तीशाली इंजिने,
विंटेजचा दिमाख आणि आधुनिक डिझाइन यांचा हा उत्सव असणार आहे.
सुपरकार्स आणि सुपरबाइक्सपासून
विंटेज क्लासिक्स आणि मॉडर्न मार्व्हल्सपर्यंत ५००हून अधिक वाहने या ऑटो
कार्निव्हलमध्ये एकाच छताखाली एकत्र असतील. या कार्यक्रमात मोटरस्पोर्टमधील दिग्गज
गौरव गिल यांच्यासह जागतिक रेसिंग आयकॉन मिका हक्किनेन आणि नारायण कार्तिकेयन
यांचीही उपस्थिती असेल. सुपर कार क्लब गॅरेज (एससीसीजी) यांच्याद्वारे पुनर्संचयित केलेली रवी शास्त्री यांची
प्रतिष्ठित ‘ऑडी १००’ हे या
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. १९८२ मध्ये बनविण्यात आलेले हे तिसऱ्या पिढीचे
मॉडेल रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी शास्त्री यांना परत दिले.
शास्त्री यांनी या गाडीला ‘राष्ट्रीय संपत्ती’ असे म्हटले आहे. रेमंडच्या मूल्यांशी संरेखित वारशाचे आणि कारागिरीचे ते प्रतीक
आहे.
या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती
देताना गौतम हरी सिंघानिया म्हणाले, “रेमंड १०० ऑटोफेस्ट हा कार्यक्रम म्हणजे केवळ गाड्यांचे प्रदर्शन नव्हे,
तर त्याहीपेक्षा अधिक काही आहे. हा उत्कटतेचा, कल्पकतेचा आणि
समाजाशी असलेल्या आमच्या दृढ संबंधांचा उत्सव आहे. आमच्या १०० वर्षांच्या
प्रवासाचे यथार्थ चित्रण असणारा हा कार्यक्रम उत्कृष्टता आणि प्रगती यांविषयीच्या
आमच्या कटिबद्धतेला प्रतिबिंबित करतो.”
सन १९२५मध्ये स्थापन झालेल्या रेमंड
समूहाने कापड उत्पादक म्हणून सुरुवात केली आणि अल्पावधीतच गुणवत्ता आणि नाविन्य या
वैशिष्ट्यांमुळे या समूहाची भरभराट झाली. मोटरिंग जगाच्या उत्क्रांतीप्रमाणेच हा
प्रवास सामर्थ्याचा, अनुकूलनाचा आणि
पुनर्शोधाचा आहे. रेमंड १०० ऑटोफेस्ट हा कार्यक्रम याच भावनेला मूर्त रूप देतो. रेमंड
कंपनी आणि ठाणे शहर हे दोघे एकत्र कसे वाढले, परंपरेत रुजले
आणि तरीही भविष्याकडे पाहण्याची दोघांची दृष्टी समान कशी आहे, याचे सुंदर कथन हा
कार्यक्रम करतो.
मुंबई महानगर प्रदेशातील कार
आणि बाईक प्रेमींसाठी खास आयोजित होणारा, एकमेवाद्वितीय असा विलक्षण अनुभव देणारा
हा अनोखा कार्यक्रम येथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीला काहीतरी गुपित सांगेल. व्हिंटेज
गाड्यांच्या चाहत्यांसाठी येथे क्लासिक कार्स आणि विंटेज बाइक्स आहेत, तर साहसाची
आवड असणाऱ्यांसाठी, थ्रिल शोधणाऱ्यांसाठी या ऑटोफेस्टमध्ये
हार्ले-डेव्हिडसनसारख्या सुपरबाइक्स आणि सुपरकार्स आहेत. लाइव्ह म्युझिक, इक्लेक्टिक
फ्ली मार्केट, इंटरअॅक्टिव्ह किड्स झोन
आणि गॉरमेट फूड कोर्ट्स असे येथील वातावरण चैतन्यमय असेल. कुटुंबांना आणि
अनौपचारिक अभ्यागतांनाही येथे एक चांगला अनुभव मिळेल.
अतिशय भव्य स्वरूप आणि विविधता अशी
वैशिष्ट्ये असणाऱ्या ‘रेमंड १०० ऑटोफेस्ट’चा उल्लेख ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये व्हावा, अशी अपेक्षा आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ अभियांत्रिकीची
कारागिरी आणि आधुनिक नवकल्पना यांचा एकत्रित वारसा दर्शविण्यात येऊन भारतातील वाहन
निर्मिती क्षेत्राचा विकास होत गेला, याचे चित्र मांडण्यात येईल. याबाबतीत उत्साही
असणाऱ्या लोकांना कालातीत कलात्मकता आणि कारागिरी या बाबी साजऱ्या करण्यासाठी या
ठिकाणी आमंत्रित करण्यात येत आहे. ‘रेमंड १०० ऑटोफेस्ट’मध्ये व्हिंटेज क्लासिक्स, सुपरकार्स आणि भारताच्या या
विश्वासार्ह ब्रँडचा वारसा त्याच्या इतिहासातून व नाविन्यतेतून अनुभवण्याची संधी मिळणार
आहे.
Comments
Post a Comment