बंधन बँकेने महाराष्ट्रात सुरू केल्या 2 नवीन शाखा आणि 3 राज्यांमध्ये एकूण 9 शाखा
बंधन बँकेने महाराष्ट्रात सुरू केल्या 2 नवीन शाखा आणि 3 राज्यांमध्ये एकूण 9 शाखा
● बंधन बँकेने महाराष्ट्रातील गोंदिया आणि गोरेगाव पूर्व, मुंबई येथे नवीन शाखा सुरू केल्या.
● बँकेने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नवीन शाखांचे उद्घाटन केले.
● बंधन बँकेच्या एकूण बँकिंग आउटलेट्सची संख्या 6,300 च्या पुढे गेली आहे.
बंधन बँकेने आज तीन राज्यांमध्ये 9 नवीन शाखा सुरू केल्याची घोषणा केली. महाराष्ट्रात 2, उत्तर प्रदेशात 6 आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 1 नवीन शाखा कार्यान्वित करण्यात आली. बंधन बँकेचे एमडी आणि सीईओ श्री. पार्थ प्रतिम सेनगुप्ता यांनी कार्यकारी संचालक श्री. राजिंदर कुमार बब्बर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कोलकाता येथील नवीन शाखांचे उद्घाटन केले.
महाराष्ट्रातील नवीन शाखा गोंदिया शाखा (गुरुनानक वॉर्ड, जुना बस स्थानक रोड, गोंदिया) आणि गोरेगाव पूर्व शाखा (विश्वेश्वरनगर, गोरेगाव पूर्व, मुंबई) येथे स्थित आहेत.
देशभरात आपली उपस्थिती मजबूत करणे आणि नावीन्यपूर्ण बँकिंग सुविधा ग्राहकांच्या अधिक जवळ आणणे हे बंधन बँकेच्या शाखा विस्ताराचे उद्दिष्ट आहे. या नव्या शाखांच्या उद्घाटनानंतर बँक आता 6,300 हून अधिक बँकिंग आउटलेट्सच्या मजबूत नेटवर्कद्वारे आपल्या ग्राहकांना सेवा देणार आहे. बंधन बँकेची आता महाराष्ट्रात 300 बँकिंग आउटलेट आहेत.
या प्रसंगी बोलताना बंधन बँकेचे एमडी आणि सीईओ, श्री. पार्थ प्रतिम सेनगुप्ता म्हणाले, "तीन राज्यांमध्ये नऊ नवीन शाखा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे, विशेषतः महाराष्ट्रातील दोन शाखांचा समावेश हा आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. या शाखा विस्तारामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक प्रभावी सेवा प्रदान करू शकू. विस्तारित वितरण नेटवर्कद्वारे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. आम्ही सातत्याने वाढीवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजांसाठी योग्य बँकिंग सोल्युशन्स प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत."
बंधन बँक सध्या देशातील 36 पैकी 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे.
Comments
Post a Comment