AMFI तर्फे भारताच्या गुंतवणूक परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी नवीन गुंतवणूकदार-केंद्रित उपक्रम सादर

AMFI तर्फे भारताच्या गुंतवणूक परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी

नवीन गुंतवणूकदार-केंद्रित उपक्रम सादर

उपक्रमांचा उद्देश प्रवेशयोग्यता वाढवणे, आर्थिक साक्षरतेला चालना देणे आणि गुंतवणूक विषयक सुधारणा सुलभ करणे आहे

 


असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) तर्फे छोटी एसआयपी - म्युच्युअल फंडांचे सॅचेटायझेशन, तरुण योजना आणि MITRA - म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीव्हल असिस्टंट हे तीन धोरणात्मक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यांचा उद्देश वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन देणे, गुंतवणूकदार जागरूकता वाढवणे आणि विस्मरणात गेलेल्या गुंतवणुकीचा मागोवा घेणे आणि तिची पुनर्प्राप्ती सुलभ करणे आहे. हे उपक्रम SEBI आणि AMFI च्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या सतत सुरू असलेल्या प्रयत्नांशी सुसंगत आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित केला जात आहे.

 

भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगाने मजबूत वाढ नोंदवली आहे. त्यामध्ये 65 लाख कोटी रु. हून अधिक मालमत्ता व्यवस्थापनाखाली (AUM) असून रिटेल गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग आणि प्रणालीबद्ध, दीर्घकालीन गुंतवणुकीची वाढती पसंती दर्शविली आहे. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या औपचारिक गुंतवणूक परिसंस्थेबाहेर आहे. जागरूकतेचा अभाव आणि अॅक्सेस करण्याबाबत अडचणी ही याची प्रमुख कारणे आहेत. गुंतवणूकदार शिक्षण, नियामक सहकार्य आणि वित्तीय बाजार व रिटेल गुंतवणूकदार यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सादर करून AMFI हे आव्हान सोडवण्यासाठी आघाडीवर आहे. हे नवीन उपक्रम म्युच्युअल फंड गुंतवणूक प्रत्येक भारतीयासाठी व्यवहार्य आणि प्रवेशयोग्य करण्याच्या AMFI च्या ध्येयाला अधिक मजबूत करतात.

 

सेबीच्या अध्यक्ष श्रीमती माधबी पुरी बच यांनी मजबूत भांडवली बाजारासाठी वित्तीय समावेशन आणि गुंतवणूकदार संरक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. “गुंतवणूकदारांचा सहभाग भारताच्या वित्तीय बाजाराला अधिक व्यापक आणि खोलवर नेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. AMFI चे हे उपक्रम केवळ अधिकाधिक व्यक्तींना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणार नाहीत तर पारदर्शकता, सुरक्षितता आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी सहज प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक साधनेही पुरवतील.”

 

AMFI चे अध्यक्ष नवनीत मुनोत यांनी देशाच्या विकासासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या गरजेवर भर दिला. “म्युच्युअल फंड हे वित्तीय सक्षमीकरणाचे महत्त्वाचे स्तंभ असून भारताच्या विकासगाथेत प्रत्येक व्यक्तीला सहभागी होण्यास सक्षम करतात. हे उपक्रम केवळ गुंतवणूक सुलभ करण्यासाठीच नाहीत तर सुरक्षित, पारदर्शक आणि प्रत्येक भारतीयाच्या आर्थिक कल्याणाशी सुसंगत देखील आहेत. रिटेल गुंतवणुकीचा विस्तार करून, लहान वयातच वित्तीय साक्षरतेला चालना देऊन आणि गुंतवणूकदारांना वित्तीय क्षेत्राचा आत्मविश्वासाने शोध घेण्यासाठी आवश्यक साधने पुरवून आम्ही अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक गुंतवणूक संस्कृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”

 

AMFI चे मुख्य कार्यकारी वेंकट चलसानी यांनी गुंतवणूकदारांना सक्षम करण्याच्या AMFI च्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. “भारताच्या वित्तीय परिसंस्थेला आकार देण्यात म्युच्युअल फंड उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. या उपक्रमांद्वारे, AMFI चा उद्देश प्रवेश-अडथळे कमी करणे, सुरुवातीपासूनच वित्तीय साक्षरतेची सवय लावणे आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यातून परतावा मिळविण्यासाठी प्रभावी प्रणाली प्रदान करणे आहे. आमचे लक्ष माहितीपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण गुंतवणूकदार समुदाय निर्माण करण्यावर कायम आहे.”

 

छोटी एसआयपी ही 250 रु. चा सिस्टीमॅटीक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP) सादर करते. विशेषतः प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आणि वंचित घटकांसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक अधिक प्रवेशयोग्य बनवण्यासाठी डिझाइन केला आहे. तरुण योजना ही वित्तीय साक्षरतेला शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करते. त्यायोगे तरुण विद्यार्थ्यांना गुंतवणुकीच्या मूलभूत तत्त्वांची माहिती मिळेल. दरम्यान, MITRA व्यासपीठ एका दीर्घकालीन समस्येवर उपाय सादर करते. या अंतर्गत गुंतवणूकदार आणि त्यांच्या कायदेशीर वारसांना निष्क्रिय किंवा विस्मरणात गेलेल्या म्युच्युअल फंड होल्डिंग्ज ओळखण्यास आणि त्या गुंतवणुकीची पुनर्प्राप्ती  करण्यास मदत मिळेल. त्यातून योग्य मालमत्तेचे स्वामित्व सुनिश्चित करता येईल.

 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE