ट्रॅजेक्ट्रॉन स्पोर्ट्स’तर्फे अरावन – भारताची पहिली प्रगत अचूक एअरगन लॉन्च्
ट्रॅजेक्ट्रॉन स्पोर्ट्स’तर्फे अरावन – भारताची पहिली प्रगत अचूक एअरगन लॉन्च्
• उत्साही आणि पारखी व्यक्तींकरिता तयार करण्यात आलेली ही दर्जेदार एअरगन पूर्वी केवळ आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी उपलब्ध असलेल्या अनेक वैशिष्ट्यांसह येते
• प्री-चार्ज्ड न्यूमॅटिक (पीसीपी) एअरगन, अरावन, हे ट्रॅजेक्ट्रॉन स्पोर्ट्सचे उद्घाटनपर उत्पादन असून ते त्याचे विक्रेते आणि वितरकांच्या वाढत्या नेटवर्कद्वारे भारतभर उपलब्ध असेल
• मेक-इन-इंडिया उपक्रमांतर्गत फील्ड-शूटिंग श्रेणीत दोषरहित इंजिनिअरिंग उपकरणांची जागतिक मानके वितरीत करण्यासाठी ट्रॅजेक्ट्रॉनची वचनबद्धता अरावन प्रतिबिंबित करते
ट्रॅजेक्ट्रॉन स्पोर्ट्स, भारतातील सर्वात तरुण परवानाधारक एअरगन उत्पादकाने आज आपले उद्घाटन उत्पादन 'अरावन' लॉन्च केले. जे उत्कृष्ट क्षेत्र-नेमबाजी उत्साही आणि पारखी लोकांच्या वैयक्तिक गरजेनुरूप तयार करण्यात आलेली प्रगत एअरगन आहे. अरावन ही भारताची पहिली, सर्वात प्रगत आणि स्वदेशी बनावटीची आणि उत्पादित प्री-चार्ज्ड न्यूमॅटिक (पीसीपी) एअरगन मानली जाते. जी सर्वात स्पर्धात्मक किंमतींवर गुणवत्तेच्या बाबतीत जागतिक मानके उपलब्ध करते.
ट्रॅजेक्ट्रॉनचे एमडी आणि सीईओ प्रमोद पॉलोस यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये आणखी दोन सह-संस्थापक सामील झाले. नामांकित अॅडमॅन आणि मालिका उद्योजक प्रल्हाद कक्कर आणि अनुभवी बँकर ब्रायन डिसोझा ही ती दोन मातब्बर नावे आहेत. भारतातील सर्वात अत्याधुनिक इंजिनिअरिंग उत्पादन कंपन्यांपैकी एक कंपनी तयार करण्याच्या त्यांच्या समान दृष्टिकोनाव्यतिरिक्त, तिन्ही नेतृत्वांमध्ये एअरगन आणि फील्ड-शूटिंगची सखोल आवड देखील आहे. कंपनीने 2025च्या सुरुवातीला अरावनचे उत्पादन सुरू केले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी समुदायांसह विशिष्ट बाजारपेठांमध्ये मूल्य प्रस्ताव नेण्याची योजना आखली.
ट्रॅजेक्ट्रॉन स्पोर्ट्सचे एमडी आणि सीईओ प्रमोद पॉलोस म्हणाले, “आम्ही आज ट्रॅजेक्ट्रॉन आणि भारतीय एअरगन क्षेत्रात एक मापदंड निर्माण करणारा टप्पा गाठला आहे. आम्ही एरावनच्या लाँचिंगसह, उत्पादन उत्कृष्टतेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे. आम्ही स्पर्धात्मक किंमतींवर प्रगत जागतिक दर्जाचे उत्पादन देऊ करत आहोत. आम्ही भारताच्या स्वतःच्या अचूक पीसीपी एअरगनची रचना आणि निर्मिती करण्यासाठी आमच्या दृष्टिकोनातून सर्व अंगांचा वापर केला हे इथे नमूद करतो. मी माझे सह-संस्थापक आणि संपूर्ण टीमचे आभार मानू इच्छितो. त्यांनी केवळ एका उत्पादनासाठीच नव्हे तर भारतीय एअरगन उद्योगातील क्रांतीसाठी योगदान दिले.”
भारतीय एअरगन उद्योग अंदाजे $3 अब्ज डॉलर्सचा असून आणखी वाढत आहे. त्याची मजबूत वाढ सुधारित क्रयशक्ती, पारंपरिक स्थिती आणि सांस्कृतिक प्रासंगिकता, नेमबाजी खेळांमधील वाढती रुची, ऑनलाइन प्लॅटफॉर्मची उपलब्धता आणि डिझाइनमधील तांत्रिक प्रगती यासह अनेक घटकांवर अवलंबून आहे. तथापि, स्वदेशी पर्यायांचा अभाव, शारीरिक स्पर्श आणि अनुभूतीची अनुपस्थिती आणि आयात, त्याचप्रमाणे दीर्घ कालमर्यादा, उच्च खर्च, देयकातील अडथळे आणि सेवा आणि समर्थनातील समस्या यांसारखे विशिष्ट घटक अनेक अडथळे अनेकदा संग्राहक आणि उत्साही लोकांना परावृत्त करतात. त्यांच्या पर्यायांना गंभीरपणे मर्यादित करतात.
“मैदानी नेमबाजीचा उत्साही खेळाडू असल्याने, मी आणि माझ्या सह-संस्थापकांनी वैयक्तिकरित्या ही आव्हाने अनुभवली आहेत. आम्ही योगायोगाने भेटलो, तेव्हा मेक-इन-इंडिया प्रगत पीसीपी एअरगनसाठी आमच्या उत्कटतेचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला”, असे ट्रॅजेक्ट्रॉन स्पोर्ट्सचे सह-संस्थापक प्रल्हाद कक्कर म्हणाले. “एअरगन हा खेळाबद्दलच्या आमच्या सामूहिक उत्कटतेचा सन्मान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने उंचावलेला हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. तरीही पॉईंट आणि शूटचे साधेपण कायम दिसते!”, असे प्रल्हाद यांनी सांगितले.
भारतभरातील विक्रेते आणि वितरकांचा समावेश असलेल्या वाढत्या विक्रेता जाळ्याच्या माध्यमातून कंपनी अरावनची विक्री करेल. 2025 च्या उत्तरार्धात वृद्धी शक्यतांचा विस्तृत दृष्टिकोन खुला होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादनाचे विपणन (मार्केटिंग) करण्याची कंपनीची योजना आहे.
ट्रॅजेक्ट्रॉनचा जन्म प्रसिद्ध एअरगन तज्ज्ञ प्रमोद पॉलोस यांच्या उत्कट प्रयत्नांतून झाला. ज्यांनी जागतिक मानकांची पूर्तता करणारी स्वदेशी पीसीपी एअरगन तयार करण्यासाठी जाहिरात विश्वातील अग्रगण्य नाव प्रल्हाद कक्कर आणि अनुभवी बँकर ब्रायन डिसोझा यांच्याशी भागीदारी केली. अरावन ही या समर्पणाची पराकाष्ठा आहे. जी भारतीय नेमबाजी प्रेमींना जागतिक दर्जाच्या गुणवत्तेसह आणि अखंड सेवा समर्थनासह आयात केलेल्या एअरगनपेक्षा एक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध करून देते.
Comments
Post a Comment