रेनॉ क्विड, कायगर आणि ट्रायबर आता सीएनजी किट पर्यायासह उपलब्‍ध

 रेनॉ क्विड, कायगर आणि ट्रायबर आता सीएनजी किट पर्यायासह उपलब्‍ध

पर्यावरणपूरक आणि किफायतशीर: इंधन कार्यक्षमतेमध्‍ये वाढ, तसेच स्थिरतेची खात्री 

वॉरंटी व सुरक्षितता: तीन वर्षांची वॉरंटी आणि प्रमाणीकृत फिटमेंट 

टप्‍प्‍याटप्‍प्‍याने लाँच: प्रमुख शहरांमध्‍ये लाँच करण्‍यात येत आहेत, तसेच देशभरात विस्‍तारीकरण करण्‍याचे नियोजन 

स्‍पर्धात्‍मक किंमत: ट्रायबर व कायगरसाठी ७९,५०० रूपये आणि क्विडसाठी ७५,००० रूपये 


रॅना इंडिया या रेनॉ ग्रुपच्‍या पूर्णत: मालकीच्‍या उपकंपनीने कागयर, ट्रायबर आणि क्विड या आपल्‍या सर्व मॉडेल्‍समध्‍ये सरकार मान्‍यताकृत सीएनजी रेट्रोफिटमेंट किट्सच्‍या उपलब्‍धतेची घोषणा केली आहे. हा उपक्रम नवीन ग्राहकांपर्यंत रेनॉची पोहोच वाढवतो, तसेच या उपक्रमामधून पर्यावरणपूरक व कार्यक्षम गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती रेनॉची कटिबद्धता देखील दिसून येते. 

ग्राहक-केंद्रित्व आणि ग्राहकांना मन:शांती देण्‍याप्रती कटिबद्धता दृढ करत सर्व सीएनजी रेट्रोफिटमेंट कार्स तीन वर्षांच्‍या वॉरंटीसह येतील. 

रेनॉ इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व कंट्री सीईओ श्री. वेंकटराम एम. म्‍हणाले, “नाविन्‍यता व स्थिरतेप्रती आमची कटिबद्धता आम्‍हाला सतत आमच्‍या ऑफरिंग्‍जमध्‍ये सुधारणा करत राहण्‍यास प्रेरित करते. सर्व मॉडेल्‍समध्‍ये सादर करण्‍यात आलेल्‍या सरकार मान्‍यताकृत सीएनजी रेट्रोफिटमेंट किटमधून ग्राहकांना पर्यावरणपूरक व स्‍मार्ट सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती आमची समर्पितता दिसून येते. आमचा विश्‍वास आहे की, हा उपक्रम रेनॉ कार्सना अधिक उपलब्‍ध होण्‍याजोग्या व व्‍यावहारिक करेल, तसेच भारतातील आमचे स्‍थान अधिक दृढ करेल.''  

सीएनजी रेट्रोफिटमेंट किट ऑटोमॅटिक व टर्बो व्‍हेरिएण्‍ट्स वगळता सर्व व्‍हेरिएण्‍ट्स आणि मॉडेल्‍ससाठी उपलब्‍ध आहे. सीएनजी किट पसंतीच्‍या विक्रेत्‍याकडून रेट्रोफिट केले जाते, जेथे होमोलोगेटेड किटचा वापर केला जातो, जे सर्व सुरक्षितता व कार्यक्षमता मापदंडांची पूर्तता करते. 

फिटमेंटचा विकास व कस्‍टमायझेशनमध्‍ये लहानात लहान हार्डवेअरकडे बारकाईने लक्ष दिले जाते, ज्‍यामुळे नेटवर्कमध्‍ये एकसमानता आणि प्रमाणीकृत फिटमेंट्सची खात्री मिळते. 

ग्राहकांना सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव देण्‍याकरिता ड्रायव्हिंग कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी सीएनजी किट असलेल्या रेनॉ कारची योग्यरित्या पडताळणी करण्यात आली आहे. 

सीएनजी रेट्रोफिटमेंट किट टप्‍प्‍याटप्‍प्‍याने उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्‍ली, गुजरात व महाराष्‍ट्र या पाच प्रमुख राज्‍यांमध्‍ये विक्रीला सुरूवात होईल, जे बाजारपेठेत ६५ टक्‍के विक्रीचे योगदान देतील आणि आगामी महिन्‍यांमध्‍ये १०० टक्‍के विक्री संपादित करतील. 

रेनॉने आपल्‍या कार्सना वैशिष्‍ट्य-संपन्‍न व स्‍मार्ट बनवण्‍यावर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवले आहे, ज्‍यामुळे बाजारपेठेत एसयूव्‍ही आणि एमपीव्‍हींसाठी सर्वात व्‍यावहारिक निवड म्‍हणून कंपनीचे स्‍थान अधिक दृढ होत आहे. सीएनजी रेट्रोफिटमेंट किटच्‍या सादरीकरणासह रेनॉ शाश्‍वत व कार्यक्षम ड्रायव्हिंग सोल्‍यूशन्‍सच्‍या दिशेने पुढाकार घेत आहे. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE