छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
:फिल्मसिटी अर्थात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छावा चित्रपटातील कलाकार संतोष जुवेकर आणि शुभंकर एकबोटे यांची विशेष उपस्थिती होती.
दरम्यान वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता स्थापत्य विजय बापट, सुरक्षा अधिकारी अनिल माने यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment