टाटा एआयएने विम्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी मुंबईमध्ये 'प्लेज टू प्रोटेक्ट' उपक्रमाचे आयोजन केले
टाटा एआयएने विम्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी मुंबईमध्ये 'प्लेज टू प्रोटेक्ट' उपक्रमाचे आयोजन केले
टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स या भारतातील एका आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपनीने मुंबईमध्ये 'प्लेज टू प्रोटेक्ट' या उपक्रमाचे आयोजन करून जीवनांचे रक्षण करण्याप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीमध्ये १ लाख जीवने सुरक्षित करण्याच्या कंपनीच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचा हा एक भाग आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून टाटा एआयएने मुंबईतील आपल्या विविध शाखांमध्ये अनेक वेगवेगळ्या सामुदायिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते –
• सेंट अँड्र्यूज चर्च, फोर्ट: वंचित समुदायांतील ३५ मुलांना सकाळची न्याहारी व दुपारचे जेवण पुरवले. या उपक्रमात टाटा एआयएमधून ६ जणांनी भाग घेतला होता.
• बोईसर शाखा: एका सरकारी शाळांमधील २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि बिस्किट्स भेट म्हणून दिले. टाटा एआयएमधून १५ जणांनी यामध्ये भाग घेतला होता.
• खारघर शाखा: अनाथाश्रमामध्ये खाऊचे वाटप केले, ४५ मुलांना सकाळची न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले. टाटा एआयएमधून २ लीडर्स, ४ एजंट्स, एडीओए, बीएम आणि बीएएम यांनी यामध्ये भाग घेतला होता.
• वसई शाखा: वृद्धाश्रमाला भेट दिली, ४० ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले, त्यांना भेटवस्तूंचे वाटप केले. टाटा एआयएमधून १९ जणांनी भाग घेतला होता.
• पनवेल शाखा: गिरीजा फाउंडेशन अनाथाश्रमाला भेट दिली व तेथील मुलांसोबत वेगवेगळे कार्यक्रम केले. टाटा एआयएमधून १० जणांनी यामध्ये भाग घेतला होता.
• मीरा रोड शाखा: अंकुर चाईल्ड होम अनाथाश्रमाला भेट दिली, त्याठिकाणच्या ४५ मुलांसोबत संवाद साधला. टाटा एआयएमधील ३ जणांनी यामध्ये भाग घेतला होता.
टाटा एआयएचे प्रोप्रायटरी बिझनेसचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर श्री अमित दवे यांनी सांगितले, "जीवन विमा लोकांना, समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना हवी असलेली आर्थिक सुरक्षा पुरवतो. त्यामुळे जीवन विम्याविषयी जागरूकता निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. टाटा एआयए आपल्या 'प्लेज टू प्रोटेक्ट' उपक्रमातून भारतीयांसाठी आर्थिक समावेश आणि आर्थिक सुरक्षेला प्रोत्साहन देत आहे. भारतामध्ये जास्तीत जास्त लोकांना विमा सुरक्षा मिळावी यासाठी आम्ही बांधील आहोत. जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये १ लाख जीवने सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी टाटा एआयए अथक प्रयत्नशील राहील."
'प्लेज टू प्रोटेक्ट' मोहिमेंतर्गत टाटा एआयएने अनेक वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत, त्यांच्या भारतभरातील ५९९ शाखा व १.४३ लाख एजंट्स व कर्मचारी यामध्ये सहभागी होत आहेत. रोडशो, जॉगर्स पार्कमधील ऍक्टिव्हिटीज, गृहसंकुलांमधील विविध कार्यक्रम, आरोग्य शिबिरे यांचा त्यामध्ये समावेश आहे. जास्तीत जास्त स्थानिक पातळीवर संपर्क साधण्याबरोबरीनेच ही कंपनी स्थानिक स्वयंसेवी संस्था, पंचायत आणि स्वयंसहायता समूहांच्या सहयोगाने ग्रामीण व अर्ध-शहरी भागातील लोकांना विम्याविषयी माहिती देईल. टाटा एआयएच्या ५५० पेक्षा जास्त शाखांनी ही मोहीम आधीच सुरु केली आहे, यामध्ये ७०,००० एजंट्स, कर्मचारी आणि ग्राहक सहभागी झाले आहेत.
विम्याबरोबरीनेच, 'जागृती' या आपल्या आर्थिक साक्षरता उपक्रमामार्फत टाटा एआयए आर्थिक सक्षमतेला देखील प्रोत्साहन देत आहे. यामध्ये टाटा एआयएचे कर्मचारी वंचित समुदायांना अत्यावश्यक आर्थिक उपाययोजनांची, साधनांची माहिती देतात. एक संरचनाबध्द प्रशिक्षण मोड्यूल हिंदी, इंग्रजी आणि क्षेत्रीय भाषांमध्ये उपलब्ध करवून देण्यात आले आहे, कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांच्या नेटवर्कमधील कमीत कमी चार व्यक्तींना आत्मविश्वास मिळवून द्यावा जेणेकरून त्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यात मदत मिळावी हा यामागचा उद्देश आहे. ३३०० पेक्षा जास्त टाटा एआयए कर्मचाऱ्यांनी याआधीच या उपक्रमामध्ये भाग घेतला आहे.
Comments
Post a Comment