राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मुंबईत उतरले सनफीस्ट डार्क फँटसीचे 'बिग फँटसीज स्पेसशिप'
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मुंबईत
उतरले सनफीस्ट डार्क फँटसीचे 'बिग फँटसीज स्पेसशिप'
बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादसह दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमध्ये यशस्वी प्रवास केल्यानंतर, सनफीस्ट डार्क फँटसी चे प्रसिद्ध फँटसी स्पेसशिप आता 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मुंबईत आले आहे. ब्रँडच्या नाविन्यपूर्ण कॅम्पेनच्या "बिग फँटसीज: आपल्या कल्पनांना पंख द्या" अंतर्गत, हे स्पेसशिप कला आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुलांच्या सर्जनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला नवे आयाम देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
शहरातील मुलांना 2 मार्च 2025 पर्यंत नेहरू साइंस सेंटर मध्ये स्थिर असलेल्या फँटसी स्पेसशिपचा मोफत अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या विशेष बसमध्ये मोठ्या इंटरॅक्टिव्ह स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत, ज्या मुलांनी हाताने काढलेल्या चित्रांना त्यांची मूळ आकर्षकता कायम ठेवत जिवंत डिजिटल कलाकृतींमध्ये रूपांतरित करतात. एकदा स्कॅन केल्यावर, त्यांची चित्रे डिजिटल 3डी इंटरॅक्टिव्ह कॅरेक्टर्समध्ये बदलली जातात आणि फँटसी स्पेसशिपच्या आत मोठ्या टच-इनेबल्ड स्क्रीनवर प्रदर्शित केली जातात. या कॅम्पेन मध्ये पहिल्या दिवशी ५०० हून अधिक मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या उपक्रमावर भाष्य करताना, आयटीसी लिमिटेडच्या फूड्स डिव्हिजन, बिस्किट्स आणि केक्स क्लस्टरचे सीओओ अली हारिस शेर म्हणाले, "राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने या उपक्रमासाठी नेहरू साइंस सेंटर सोबत भागीदारी करणे हे तरुण मनांच्या असीम क्षमतेचा उत्सव साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रत्येक क्षण त्यांच्या अद्भुत सर्जनशीलतेची जाणीव करून देतो. आम्ही आगामी काळात आणखी अनेक तरुण स्वप्नवेड्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत आणि त्यांच्या कल्पनाशक्ती आम्हाला पुढे कुठे घेऊन जाईल, हे पाहण्याची आतुरता आहे!"
या अनोख्या अनुभवाने उत्साहित झालेल्या राहुल, या लहान सहभागीने आनंद व्यक्त करत सांगितले, "मला सुपरहिरो खूप आवडतात, आणि आज माझे चित्र मोठ्या स्क्रीनवर खऱ्या डिजिटल सुपरहिरोमध्ये रुपांतरित होताना पाहिले! जणू माझी कल्पना साकार झाली." त्याच्या आई अंजली यांनीही आनंद व्यक्त करत सांगितले, "एक पालक म्हणून, मी नेहमीच अशा उपक्रमांचा शोध घेत असते, जे माझ्या मुलाच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतील. हा अनुभव खरंच जादूई होता, विज्ञान आणि कल्पनाशक्तीचा इतका सुंदर संगम मी याआधी कधी पाहिला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे हे माझ्यासाठी अमूल्य होते!" आईटीसी सनफीस्ट डार्क फँटसीचा हा उपक्रम कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम साधून लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला प्रेरणा देण्यासाठी राबवला जात आहे. या उत्साहात अधिक भर घालत, निवडक मुलांना नासा दौर्यासाठी विशेष संधी दिली जाणार आहे, जिथे त्यांच्या अंतराळ संशोधनाच्या स्वप्नांना वास्तवात उतरवता येईल.
Comments
Post a Comment