आर्या इंटरनॅशनलवर दरोड्याचा प्रयत्न
आर्या इंटरनॅशनलवर दरोड्याचा प्रयत्न
आर्या इंटरनॅशनल (पूर्वीचे लिबर्टी हॉटेल) या सांताक्रूझ पूर्व येथील हॉटेलवर दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हॉटेल व्यवस्थापनाच्या सतर्कतेने हा प्रयत्न हाणून पाडला गेला आणि आरोपींना वाकोला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी प्रविण कराडे आणि श्री. खांडेकर हे अधिक तपास सुरु केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, या हॉटेलचे प्रमुख अशोक शेट्टी आणि पृथ्वीराज शेट्टी आहे. त्यांनी सुमा राऊत आणि गणेश राऊत यांच्याकडून हे हॉटेल विकत घेतले आहे. हॉटेलमध्ये आज सिंग नावाचा आरोपी आला. सोबत त्यांचे काही साथीदार तसेच पुरुष व महिला बाऊन्सर होते. त्यांनी काही रुम्स बुकिंग केल्या तसेच त्यानंतर सामानांना आतल्या रुम्समध्ये येऊन हॉटेल हडपण्याच प्रयत्न केला. नासधूस केली. संगणक वगैरे देखील ताब्यात घेतले. काही कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याबाबत हेतू लक्षात आल्यामुळे व्यवस्थापनाचे अधिकारी वेळीच सावध झाले आणि त्यांनी १०० क्रमांकावरून पोलिसांची मदत मागितली. हॉटेलच्या व्यवस्थापनाने वेळीच सतर्कता दाखवून सर्वांना पोलिसांच्या हवाली केले.
आतापर्यंत या हॉटेलमध्ये कुठलाही असा प्रकार घडला नव्हता. मात्र सदर घटनेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी वातावरण असून पोलिसांनी वेळीच अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करावा आणि संरक्षण द्यावे, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात आले आहे. वाकोला पोलिस ठाण्याकडून याबाबत आरोपींना अटक केली गेली असून अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
Comments
Post a Comment