"देवमाणूस" साठी सज्ज व्हा! टिझर रिलीझच्या आधी लव फिल्म्सने महेश मांजरेकर, रेणुका शहाणे,
"देवमाणूस" साठी सज्ज व्हा! टिझर रिलीझच्या आधी लव फिल्म्सने महेश मांजरेकर, रेणुका शहाणे,
लव फिल्म्सचा मल्टीस्टारर चित्रपट "देवमाणूस" चे नवे पोस्टर्स प्रेक्षकांच्या भेटीला, उद्या टीझर होणार लाँच
तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट "देवमाणूस" ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आलेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके अशा ह्या दिग्गज आणि पॉवरहाऊस कलाकारांचे वैशिष्ट्य असलेले पोस्टर्स चाहत्यांना सिनेमात असलेल्या त्यांच्या प्रभावशाली स्वरूपाची एक झलक देतात जे नक्कीच उद्या रिलीज होणाऱ्या बहुप्रतिक्षित "देवमाणूस" टीझरच्या अपेक्षा वाढवतात.
रिलीझ झालेल्या ह्या पोस्टर्स मध्ये आपण चित्रपटाच्या मुख्य पात्रांचे अतिशय मोहक फर्स्ट लुक पाहू शकतो. अभिनेते महेश मांजरेकर ह्यांचा खूपच साधा पण इंटेन्स लुक आपल्याला दिसून येतो, त्यांची भेदक नजर त्यांच्या या भूमिकेची गंभीरता सांगते. अभिनेत्री रेणुका शहाणे ह्यांचा मायाळू, सरळ देखावा आणि मनमोहक लुक लक्ष वेधून घेणारा आहे तर सुबोध भावे ह्यांना पोलिसांच्या हटके भूमिकेत पाहू शकतो तसेच अभिनेता सिद्धार्थ बोडके त्याच्या हसण्याने सिनेमाचं आणि त्याच्या भूमिकेचं रहस्य वाढवतो. अशा या अनोख्या पोस्टर्समुळे उद्या टीझरमध्ये नक्की काय असणार आहे याची उत्सुकता सर्वांना आहे.
लव फिल्म्स प्रस्तुत, "देवमाणूस" या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर ह्यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
Comments
Post a Comment