तिरुपतीमध्ये १७-१९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान 'मंदिरांचा महाकुंभ'
परतून येत आहे जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन
तिरुपतीमध्ये १७-१९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान 'मंदिरांचा महाकुंभ' आयोजित
मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापनासाठी समर्पित जगातील सर्वात मोठे संमेलन, आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन (आयटीसीएक्स) २०२५, १७-१९ फेब्रुवारी दरम्यान तिरुपती येथील आशा कन्वेन्शन्स येथे आयोजित होणार आहे. अंत्योदय प्रतिष्ठानच्या सहकार्याने टेम्पल कनेक्टने आयोजित केलेले, 'आयटीसीएक्स २०२५' हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन संस्थांना एकत्र करेल आणि त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे उत्सव साजरा करताना जगभरातील मंदिर परिसंस्थांना एकमेकांसोबत जोडण्यासाठी,त्यांना बळकट आणि त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी एक गतिमान व्यासपीठ प्रदान करेल. यामध्ये ५८ देशांमधील सुमारे १५८१ भक्ती संस्थांचा सहभाग असेल आणि प्रदर्शनामध्ये १११ हून अधिक वक्ते, १५ कार्यशाळा आणि ज्ञान सत्रे आणि ६० हून अधिक दुकाने असतील.
‘मंदिरांचा महाकुंभ’ - आयटीसीएक्स' ही भारतीय परंपरेच्या मंदिरांबद्दल माहितीचे दस्तऐवजीकरण आणि डिजिटलायझेशन करण्यासाठी एक अग्रगण्य व्यासपीठ असलेल्या टेम्पल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शनाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे मुख्य प्रतोद प्रसाद लाड यांची कल्पना आहे. भक्तांचा अनुभव आणि सुविधा वाढवणे हे या आवृत्तीचे केंद्रबिंदू आहे, जे 'मंदिर अर्थव्यवस्थेला आकर्षक, सक्षम आणि उन्नत करणे ' या त्याच्या मुख्य कल्पनेशी सुसंगत आहे.
आयटीसीएक्स २०२५ मंदिर प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि उद्योग तज्ञ यांच्यात जागतिक सहकार्य सुलभ करेल, जे प्रामुख्याने धर्म किंवा धार्मिक पैलूंच्या पलीकडे जाऊन प्रगतीशील मंदिर व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करेल. ज्ञान-आदान प्रदान करण्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून, यात मुख्य भाषणे, पॅनेल चर्चा, कार्यशाळा आणि मास्टरक्लासेस असतील ज्यात मंदिर व्यवस्थापन आणि धार्मिक यात्रींसाठी अनुभव वृध्दीकरणासोबत विविध महत्त्वाच्या पैलूंचा समावेश असेल.
याअंतर्गत निधी व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रणापासून ते शाश्वतता आणि सुरक्षा शिष्टाचार, एआय, डिजिटल साधने आणि फिनटेक तंत्रज्ञानाद्वारे मंदिर व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यासारख्या विषयांवर विशेष भर दिला जाईल. लंगर आणि अन्न वितरण प्रणाली, कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर, शाश्वत ऊर्जा पद्धती आणि कायदेशीर अनुपालन यांसारख्या विषयांवर मुखत्वे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. अधिक कार्यक्षम आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावी मंदिर परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने चर्चांमध्ये वैद्यकीय मदत, शैक्षणिक कार्यक्रम आणि धर्मादाय उपक्रम यासारख्या आवश्यक सामुदायिक सेवांचा देखील समावेश असेल.
आयटीसीएक्स २०२५ ला पर्यटन मंत्रालय, संस्कृती मंत्रालय आणि अतुल्य भारत उपक्रमाद्वारे भारत सरकारकडून पाठिंबा मिळाला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) सादरीकरण भागीदार म्हणून सामील झाले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणसह आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि इतर अशा भारतीय राज्यांमधील पर्यटन आणि देणगी मंडळांच्या पाठिंब्यामुळे हे अधिवेशन अधिक बळकट झाले आहे.
आयटीसीएक्स हा केवळ एक कार्यक्रम नसून एक चळवळ आहे ज्याचा उद्देश नवोपक्रम आणि शाश्वततेद्वारे मंदिर परिसंस्थेत क्रांती घडवणे आहे. राष्ट्र उभारणीसाठी ही आमची वचनबद्धता आहे," असे टेम्पल कनेक्ट आणि आयटीसीएक्सचे संस्थापक गिरीश कुलकर्णी म्हणाले. "भारत भक्ती आणि आध्यात्मिक पर्यटनाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत असताना, मंदिरांच्या कामकाजाचे आयोजन, सक्षमीकरण आणि पद्धतशीरीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे जेणेकरून ते भविष्यासाठी तयार होतील. स्मार्ट व्यवस्थापन धोरणे अंमलात आणून, आपण हे सुनिश्चित करू शकतो की ते अध्यात्म, परंपरा आणि समुदाय विकासाचे चैतन्यशील केंद्र राहतील.", असेही ते म्हणाले.
"भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे जतन करण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार, आयटीसीएक्स परंपरा आणि आधुनिक प्रशासनातील दरी भरून काढण्याचे उद्दिष्ट ठेवते. ते केवळ प्रार्थनास्थळांपेक्षा जास्त आहेत; ते सांस्कृतिक आणि आर्थिक शक्तीस्थळे आहेत. आमचा ठाम विश्वास आहे की प्रत्येक प्रार्थनास्थळ - कितीही लहान असो किंवा दूरस्थ असो, ते धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व वाढवणाऱ्या जागतिक दर्जाच्या प्रशासन मॉडेल्समध्ये प्रवेश मिळण्यास पात्र आहे. आयटीसीएक्स प्रशासक आणि धोरणकर्त्यांना मंदिराचा वारसा जपताना कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक साधने प्रदान करते, असे आयटीसीएक्सचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे चीफ व्हीप प्रसाद लाड म्हणाले.
"आयटीसीएक्स २०२५ हे शिक्षण आणि सहकार्य वाढवण्यासाठी डिझाइन केलेले एक नाविन्यपूर्ण तीन-टप्प्याचे स्वरूप आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे," असे आयटीसीएक्सच्या सह-संचालक आणि आयपी संचालक आणि फियर्स व्हेंचर्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघा घोष म्हणाल्या. "आम्ही राष्ट्रीय नेतृत्व सत्रे, प्रत्यक्ष कार्यशाळा आणि आमच्या 'टेम्पल टॉक्स' मालिकेतून काळजीपूर्वक सामग्री तयार केली आहे, जिथे संस्था 'मंदिर व्यवस्थापनाच्या आधुनिकीकरणात' त्यांच्या यशोगाथा सामायिक करू शकतात. हे स्वरूप सुनिश्चित करते की आम्ही पारंपारिक ज्ञान आणि समकालीन आव्हानांना तोंड देऊ शकतो, एआय एकात्मतेपासून ते शाश्वत पद्धतींपर्यंत, मंदिर परिसंस्थेच्या विकासासाठी खरोखर व्यापक व्यासपीठ तयार करतो.'', असेही त्या म्हणाल्या.
प्रतिष्ठित श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराचे स्थळ, तिरुपती हे एक भक्ती केंद्र आहे जे दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते. शहरातील खोलवर रुजलेली मंदिर अर्थव्यवस्था खालील प्रमुख सत्रांसाठी एक आदर्श पार्श्वभूमी म्हणून काम करते:
● डॉ. सुरेश हावरे (माजी शिर्डी संस्थान अध्यक्ष) आणि डॉ. श्री. डॉ. उदय साळुंखे (संचालक,वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था) यांच्यासह मंदिर शिक्षणावरील पॅनेल चर्चा
● अष्ट विनायक मंदिरे (महाराष्ट्र) आणि श्री विश्वजित राणे जी (गोव्याचे आरोग्य मंत्री) यांच्याद्वारे 'मंदिरांसाठी नेटवर्किंगची शक्ती' या विषयावर पॅनेल चर्चा
● अधिवक्ता विष्णू जैन यांच्याद्वारे मंदिरांभोवतीचे कायदेशीर मुद्दे
या सत्रात 'द जर्नी ऑफ वासवी टेम्पल्स अँड बटू केव्हज' या विषयासह विविध विषयांवर केस स्टडीज सादर केले जातील. आयटीसीएक्स २०२५ मध्ये 'स्मार्ट टेम्पल्स मिशन' आणि 'स्मार्ट टेम्पल्स मिशन अवॉर्ड्स' चे भव्य उद्घाटन देखील होईल त्याअंतर्गत १२ वेगवेगळ्या श्रेणींमधील जगभरातील सर्वोत्तम मंदिरांना सन्मानित करण्यात येईल.
या परिषदेत जैन धर्मशाळा, आघाडीच्या भक्ती धर्मादाय संस्था, युनायटेड किंग्डममधील हिंदू मंदिरांमधील संघटना, अन्न क्षेत्र व्यवस्थापन, विविध तीर्थस्थळांचा पुरोहित महासंघ आणि तीर्थयात्रा प्रोत्साहन मंडळांचे प्रतिनिधी सहभागी होतील. इस्कॉन, श्री मंदिर, दुर्लभ दर्शन, सारस्वत चेंबर, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ओएनडीसी आणि हल्दीराम यासारख्या आघाडीच्या कंपन्या आणि संस्थांनी मंदिर व्यवस्थापन उपाय सुलभ करण्यासाठी आयटीसीएक्स २०२५ ला विशेष सहकार्य केले आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहणारे अतिथी, मान्यवर आणि वक्ते यांचा तपशील:
● श्री देवेंद्र फडणवीस जी, मुख्यमंत्री - महाराष्ट्र
● श्री राजेंद्र आर्लेकर जी, माननीय राज्यपाल - केरळ
● श्री मुकुंदा सी आर जी, सह सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
● श्री प्रमोद सावंत जी, मुख्यमंत्री - गोवा
● श्री नारा लोकेश जी, मानव संसाधन विकास मंत्री - आंध्र प्रदेश
● श्री विश्वजित राणे जी, आरोग्य मंत्री - गोवा
● श्री रोहन खौंटे जी, पर्यटन मंत्री - गोवा
● श्री सुधांशू त्रिवेदी जी, खासदार, राज्यसभा
● श्री युधिष्ठिर गोविंद दास जी, इस्कॉनचे भारतातील संवाद विभागाचे संचालक
● श्री मिलिंद परांडे, सरचिटणीस, विश्व हिंदू परिषद
● डॉ.लक्ष्यराज सिंह, उदयपूरचे मेवाड
● विष्णू शंकर जैन, सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिष्ठित वकील
Comments
Post a Comment