“पहिला नर्सिंग एक्सलन्स ट्रेनिंग प्रोग्राम (पहिला सर्वोत्कृष्ट नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रम)”, मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये यशस्वीरित्या संपन्न

अमेरिकेतील मेयो क्लिनिकसोबत संयुक्तपणे आयोजित भारताचा 

पहिला नर्सिंग एक्सलन्स ट्रेनिंग प्रोग्राम (पहिला  सर्वोत्कृष्ट नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रम)”, 

मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये यशस्वीरित्या संपन्न 



एका ऐतिहासिक सहकार्यात, जे भारतातील नर्सिंगचे भविष्य पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे, लीलावती रुग्णालयाने यूएसए मधील जगप्रसिद्ध मेयो क्लिनिकसोबत (पहिला  सर्वोत्कृष्ट नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रम), देशातील आजपर्यंतचा पहिला 'नर्सिंग एक्सलन्स ट्रेनिंग प्रोग्राम (सर्वोत्कृष्ट नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रम)' (NETP) यशस्वीरित्या पूर्ण केला आहे17-26 मार्च 2025 यादरम्यान  सुरू झालेली ही अभूतपूर्व योजना खऱ्या अर्थाने क्रांतिकारक आहे आणि देशभरातील नर्सिंग शिक्षण आणि काळजी मानकांसाठी एक नवीन बेंचमार्क प्रस्थापित करते.

या NETP मध्ये सर्वसमावेशक प्रशिक्षण अभ्यासक्रम समाविष्ट आहे जो 120 परिचारिकांचे कौशल्य वाढवण्यासाठी डिझाइन केलेला असून तो  क्रिटिकल केअर (गंभीर रुग्णांची काळजी), ऑपरेशन (शल्यचिकित्सा)  थिएटर (ओटी) नर्सिंग आणि चिकित्सालयीन नेतृत्वावर लक्ष केंद्रित करतो. प्रगत वैद्यकीय ज्ञान आणि नेतृत्व विकास या दोन्हींवर भर देणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट रुग्णसेवेचा सर्वोच्च दर्जा प्रदान करण्यास सक्षम असलेल्या परिचारिकांची एक नवीन पिढी तयार करणे हा आहे.

आज NETP समाप्त होत असून तो भारताच्या आरोग्यसेवेच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा स्थापित झाला आहे, आणि लीलावती रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित एका शानदार सर्वोत्कृष्ट नर्सिंग कार्यक्रम मान्यता समारंभाने तो साजरा करण्यात आला, जिथे सहभागी झालेल्या परिचारिकांना रुग्णसेवेमधील  त्यांच्या अथक समर्पणासाठी सन्मानित करण्यात आलेया समारंभासाठी विश्वस्त आणि इतर मान्यवरांसह मेयो क्लीनिक, यूएसए येथील वरिष्ठ नर्सिंग सल्लागार उपस्थित होते.

प्रत्येक प्रशिक्षित परिचारिकेचा प्रमाणपत्र, एक नवीन डिझाईन केलेला युनिफॉर्म आणि प्रतिष्ठित मेयो क्लिनिक पिन जे आरोग्यसेवेतील सर्वोच्च मानके अवलंबिण्याच्या त्यांच्या सिद्धतेचे प्रतीक आहे, देऊन सत्कार करण्यात आला.

"आपल्या देशातील नर्सिंग शिक्षणाचे मानके पुन्हा परिभाषित करणारा परिवर्तनकारी उपक्रम, मेयो क्लिनिकच्या सहकार्याने भारतातील पहिला सर्वोत्कृष्ट नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केल्याचा आम्हाला अभिमान आहे. लीलावती रुग्णालयामध्ये, आम्ही केवळ वैद्यकीय सेवा वाढविण्यावरच विश्वास ठेवत नाही तर रुग्णसेवेची सर्वोच्च गुणवत्ता प्रदान करण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांना सक्षम बनवण्यावर देखील विश्वास ठेवतो," असे लीलावती रुग्णालयाचे स्थायी विश्वस्त श्री. प्रशांत मेहता म्हणाले.

आमच्या सुरु असलेल्या SEWA उपक्रमांसोबतच, हा कार्यक्रम म्हणजे आमच्या चिकित्सालयीन उत्कृष्टता आणि सामाजिक जबाबदारी या दोन्हींप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. आम्ही आरोग्यसेवेची सुलभता वाढविण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीला, त्यांची पार्श्वभूमी काहीही असो, त्याच्या पात्रतेनुसार रुग्णसेवा  मिळावी यासाठी समर्पित आहोत.”

आगामी कृत्रिम अवयव शिबिर:

 22 एप्रिल 2025 रोजी, लीलावती रुग्णालयामध्ये 'कृत्रिम अवयव शिबिर कार्यक्रम' रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये सुमारे 120 रुग्णांना उच्च दर्जाचे कृत्रिम अवयव विनामूल्य प्रदान केले जातील.

हे लीलावतीच्या, रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि सामुदायिक सेवेतील उत्कृष्टतेसाठी असलेल्या अथक समर्पणाचे प्रतिबिंब आहे, जे भारतीय आरोग्यसेवेत नवीन मानके स्थापित करेल.

लीलावती गरजूंचे जीवन सुधारण्यासाठी आणि सर्वांसाठी निरोगी, अधिक समावेशक भविष्य घडविण्यासाठी समर्पित आहे. 

SEWA (सर्व्हिस इक्वालिटी फॉर वेल्फेअर ऑफ ऑल) (सगळ्यांच्या कल्याणासाठी सेवा समानता) उपक्रम:

लीलावती रुग्णालयाने चिकित्सालयीन दर्जा वाढवण्यासोबतच, त्यांच्या सेवा उपक्रमाद्वारे सामाजिक जबाबदारीची वचनबद्धता सातत्याने प्रदर्शित केली आहे.

या वर्षी, 1,264 हून अधिक गरजू रुग्णांना सुमारे 17 कोटी रुपयांचे मोफत/सवलतीच्या दरातील वैद्यकीय उपचार मिळाले., याशिवाय ऑर्थोपेडिक्स, कार्डिओलॉजी, सीओपीडी (छाती चिकित्सा), महिला आरोग्य तपासणी अशी 8 प्रमुख वैद्यकीय शिबिरे आयोजित केली गेली ज्याचा 5000 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आणि 50 पेक्षा अधिक रुग्णांना हृदय, मणक्याचे, कर्करोग, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, ऑर्थोपेडिक्स इत्यादी विविध प्रमुख आजारांवर शस्त्रक्रियांसह विनामूल्य उपचार मिळाले.

SEWA चा सर्वात प्रभावी प्रकल्प म्हणजे 'रोशिनी मोतीबिंदू शिबिर', ज्यामध्ये आतापर्यंत गरजूंना 605 पेक्षा अधिक विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रियांची सुविधा दिली गेली आणि हा कार्यक्रम त्यांची दृष्टी आणि आशा पुनर्संचयित करण्याचे कार्य सातत्याने करीत आहेअधिक माहितीसाठी, कृपया www.lilavatihospital.com ला भेट द्या.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202