महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी बॉबकार्डच्या ‘स्ट्रीटेक प्रगती’ मोहिमेअंतर्गत “स्त्री शक्ती” आणि “लक्ष्मी समृद्धी” उपक्रमांचे उद्घाटन केले
महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी बॉबकार्डच्या ‘स्ट्रीटेक प्रगती’ मोहिमेअंतर्गत “स्त्री शक्ती” आणि “लक्ष्मी समृद्धी” उपक्रमांचे उद्घाटन केले
- सायबर सुरक्षा जागरूकता आणि जबाबदार डिजिटल वर्तन यांच्यासह 25,000 महाविद्यालयीन मुलींना सबल करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे
- डिजिटल आर्थिक साक्षरता देऊन 7,000 महिलांना सबल केले आहे
- मागासलेल्या भागांमधील शाळांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधा वाढवित आहे
एका अशा युगात जिथे डिजिटल उपलब्धता आर्थिक संधीची व्याख्या करत आहे, बँक ऑफ बडोदाची पूर्ण मालकीची उपकंपनी बॉबकार्ड लिमिटेड महाराष्ट्रभरातील महिला आणि तरुण शिकाऊ मागे राहणार नाहीत याची काळजी घेत आहे. 'स्त्रीटेक प्रगती' या उपक्रमाचा शुभारंभ करून बॉबकार्ड सबलीकरण, आर्थिक समावेशन आणि ऑनलाइन सुरक्षा यांचे साधन म्हणून डिजिटल साक्षरतेला रूपांतरित करीत आहे.
बॉबकार्डच्या स्त्रीटेक प्रगतीने हे ओळखले आहे की खरे आर्थिक स्वातंत्र्य कर्जाच्या उपलब्धतेपलीकडे विस्तारले असून ते डिजिटल सुलभतेसह आर्थिक साक्षरतेची सांगड घालते, मागासलेल्या आणि सामाजिकदृष्ट्या वंचित महिलांना डिजिटल जगात सुरक्षितपणे वाटचाल करण्यासाठी सबल करत आहे. आपल्या शक्ती समृद्धी कार्यक्रमाच्या यशाचा आधार घेऊन बॉबकार्डचा नवीन उपक्रम 'स्त्रीटेक प्रगती' डिजी स्त्री शक्ती, सायबर सखी आणि डिजी सपोर्ट यांच्यासह अहान फाऊंडेशनच्या सहकार्याने संरचित कार्यक्रमांचा एक नवीन संच सादर करत आहे. हे त्यांची क्षमता उघडण्यासाठी आणि लैंगिक समानता जोपासण्यासाठी एक शाश्वत मॉडेल तयार करण्याच्या दिशेने एक पुढचे पाऊल आहे. आर्थिक साक्षरतेला डिजिटल उपलब्धतेसोबत मिसळून महिलांना आर्थिक साधनांची माहिती होण्यासोबतच त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी त्या सुसज्ज आहेत याची खात्री या कार्यक्रमांमधून केली जात आहे.
श्री. सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल, श्रीमती मेघना बोर्डीकर, माननीय राज्यमंत्री - सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), महाराष्ट्र तसेच श्री. रवींद्र राय, एमडी आणि सीईओ, बॉबकार्ड लिमिटेड आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आणि त्यायोगे डिजिटल समावेशन आणि आर्थिक सबलीकरणाला चालना देऊन "जीवनाची पुनर्कल्पना करणे" या बॉबकार्डच्या सीएसआर बांधिलकीचे पुन्हा दृढकथन केले गेले.
लाँच प्रसंगी बोलताना, श्री. सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल म्हणाले, "डिजिटल साक्षरता देऊन महिलांना सबल करणे म्हणजे त्यांचे भविष्य सुरक्षित करणे आणि त्यांना डिजिटल अर्थव्यवस्थेत विश्वासाने नेतृत्व करण्यास त्यांना योग्य बनवणे होय. बॉबकार्डचा स्त्रीटेक प्रगती हा महिलांना डिजिटल जगात सुरक्षितपणे वाटचाल करण्यासाठी ज्ञान आणि जागरूकता प्रदान करणारा एक कौतुकास्पद उपक्रम आहे. मला या प्रयत्नाची प्रशंसा करावीशी वाटते आणि अशा आणखी उपक्रमांना माझ्याकडून प्रोत्साहन आहे जे डिजिटल दरी कमी करीत आहेत आणि आर्थिक विकासात सर्वसमावेशकता जोपासत आहेत."
पुढे, श्री. रवींद्र राय, एमडी आणि सीईओ, बॉबकार्ड लिमिटेड यांनी ठासून सांगितले की, "बॉबकार्ड मध्ये आम्ही आर्थिक समावेशन जोपासण्याची बांधिलकी स्वीकारलेली आहे आणि डिजिटल साक्षरता समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल याची खात्री करून ते साध्य केले जात आहे. स्त्रीटेक प्रगतीच्या माध्यमातून आम्ही 7000 हून अधिक महिलांना आवश्यक डिजिटल आणि आर्थिक कौशल्ये देऊन सबल केले असून त्यांना सुरक्षित आणि स्वतंत्रपणे व्यवहार करण्यास सुसज्ज केले आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत 25,000 हून अधिक महिलांपर्यंत हा प्रभाव पोहोचविण्याचे ध्येय आम्ही ठेवलेले आहे. डिजिटल स्वीकृती वाढत चालली असल्याने आर्थिक सुरक्षा सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरते आणि महिला आत्मविश्वासाने त्यांच्या आर्थिक भवितव्यावर नियंत्रण ठेवू शकणाऱ्या उपक्रमांना आम्ही पाठिंबा देत राहणार आहोत."
"महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात ज्ञानापासून होते. स्त्रीटेक प्रगती डिजिटल कौशल्ये शिकण्यासोबतच महिलांना त्यांच्या आर्थिक भवितव्यावर सुरक्षितपणे नियंत्रण ठेवण्यास सबल करण्याविषयी आहे. अधिकाधिक तरुण मुली आणि महिलांना या उपक्रमाचा लाभ घेताना आणि अधिक आर्थिकदृष्ट्या सबल समाजाला त्यांनी हातभार लावताना पहायला मिळण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत", असे प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमादरम्यान, श्रीमती मेघना बोर्डीकर, महिला व बालविकास राज्यमंत्री म्हणाल्या.
"जीवनाची पुनर्कल्पना करणे: स्त्रीटेक प्रगती" अंतर्गत खालील प्रमुख कार्यक्रमांची कल्पना करण्यात आली आहे.
डिजी स्त्री शक्ती : एसएचजी मधील महिलांसाठी डिजिटल आर्थिक साक्षरता
डिजी स्त्री शक्ती उपक्रमांतर्गत बॉबकार्डने अहान फाऊंडेशनशी संगत साधून एक विशेष प्रशिक्षण मॉड्यूल विकसित केले आहे ज्याने दुर्लक्षित समाजातील महिलांना सबल करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत बॉबकार्डने सुमारे 1500 महिलांना कार्यशाळेच्या माध्यमातून सामावून घेतले आहे. या संवादात्मक कार्यशाळांमध्ये खालील गोष्टींवर भर दिला जातो :
- डिजिटल आर्थिक साक्षरता आणि सुरक्षित ऑनलाइन बँकिंग
- ऑनलाइन फसवणुकीला प्रतिबंध घालण्यासाठी सायबर सुरक्षा टिपा
- आर्थिक समावेशनास प्रोत्साहन देणारी संवादात्मक क्रियाकलापावर आधारित कार्यशाळा
- ऑनलाइन संकटासाठी प्रभावी तक्रार यंत्रणा
- सायबर गुन्ह्याला बळी पडलेल्यांसाठी मोफत समुपदेशन मदत
बचत गटांना बळकटी देण्याच्या आणि महिलांना डिजिटल अर्थव्यवस्थेत सामावून घेण्याच्या महाराष्ट्राच्या व्यापक ध्येयाशी हा उपक्रम सुसंगत असून तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने अर्थपूर्ण आर्थिक संधी निर्माण होतील याची खात्री करत आहे.
सायबर सखी : ऑनलाइन सुरक्षेसाठी तरुणींना सबल करणे
सायबर धोक्यांविषयी वाढती चिंता ओळखून बॉबकार्डने मुंबईतील सायबर धोक्यांबद्दल वाढती चिंता ओळखली आहे आणि कार्यक्रम-सायबर सखी उपक्रमाला पाठिंबा वाढविला आहे जेणेकरून मुंबईतील महाविद्यालयांमधील तरुणींना ऑनलाइन सुरक्षेबाबत शिक्षित करता येईल. या कार्यक्रमाने 25,000 महाविद्यालयीन मुलींना सायबर सुरक्षा जागरूकता आणि जबाबदार डिजिटल वर्तनासह सबल करण्याचे उद्दीष्ट ठेवलेले असून त्यात खालील विषय सामील आहेत:
- सोशल मीडिया आणि मोबाइल फोनचा सुरक्षित वापर
- घोटाळे आणि फसवणुकीपासून वाचण्यासाठी सायबर सुरक्षा युक्त्या
- शैक्षणिक संस्थांना सायबर सुरक्षित करणे
- ऑनलाइन आपत्तिला बळी पडलेल्यांसाठी मोफत समुपदेशन मदत
आतापर्यंत बॉबकार्डने या उपक्रमांतर्गत 15+ कॉलेजांमधील 5500+ तरुण विद्यार्थ्यांना सामावून घेतले आहे. मुंबईतील महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे ज्यात सामील आहेत-रुपारेल कॉलेज, एसआयईएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, कीर्ती कॉलेज, केबीपी कॉलेज ठाणे आणि इतर अनेक महाविद्यालये.
- डिजी सपोर्ट: शाळांमधील डिजिटल दरी कमी करणे
आपल्या सीएसआर बांधिलकीचा एक भाग म्हणून, बॉबकार्ड लिमिटेडने डिजी सपोर्ट उपक्रम देखील हाती घेतला आहे. हा उपक्रम उपेक्षित भागांतील शाळांना संगणक आणि प्रिंटर दान करून डिजिटल दरी कमी करण्यावर भर देत आहे. बॉबकार्ड लिमिटेडने डिजिटल पायाभूत सुविधा वाढवून एक अनुकूल शिक्षण वातावरण तयार करण्याचे उद्दीष्ट ठेवलेले आहे जे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये तयार करण्यास योग्य बनविणार आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून बॉबकार्ड आर्थिक समावेशन, डिजिटल सबलीकरण आणि सायबर सुरक्षेच्या दिशेने लक्षणीय प्रगती करत आहे. बॉबकार्ड लिमिटेड महिलांना आणि तरुण विद्यार्थ्यांना डिजिटल वातावरणातून सुरक्षितपणे वाटचाल करण्यासाठी ज्ञान आणि साधनांनी सुसज्ज करत आहे आणि उपलब्धता किंवा जागरुकता नसल्याने आर्थिक स्वातंत्र्याला बाधा निर्माण न करणारा डिजिटल सर्वसमावेशक समाज जोपासत आहे.
गोष्टी वेगवान डिजिटल केल्या जात असल्याने ऑनलाइन सेवांचा सुरक्षित आणि कार्यक्षमतेने वापर करण्याची क्षमता ही मूलभूत गरज बनली आहे. डिजिटल मंच उपलब्ध होताना आणि त्यांचा वापर करताना महिला आणि दुर्लक्षित समुदायांसमोर अनेकदा आव्हाने उभी असतात. यामुळे त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक संधी मर्यादित होतात. बॉबकार्डच्या उपक्रमांनी ही दरी भरून काढली जात असून संरचित प्रशिक्षण आणि संसाधने प्रदान करून हे साध्य केले जात आहे. यामुळे महिला आणि विद्यार्थी आत्मविश्वासाने डिजिटल अर्थव्यवस्थेत सहभागी होऊ शकतील याची खातरजमा करून घेतली जात आहे.
डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून आर्थिक सबलीकरण करण्याच्या आपल्या कार्यावर बॉबकार्ड लिमिटेड ठाम आहे आणि त्यायोगे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला आणि तरुण विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान अडथळा ठरण्याऐवजी योग्य बनविणारा ठरेल याची खातरजमा केली जात आहे.
लक्ष्मी समृद्धी : 'लक्ष्मी समृद्धी' उपक्रमाच्या माध्यमातून आगामी काळात महिलांना आर्थिक साक्षरता मिळवून देण्याचा बॉबकार्डचा मानस आहे आणि यात स्त्री शक्तीच्या लाभार्थ्यांसाठी बचत आणि आर्थिक साक्षरता सत्रांचा समावेश केला जाणार आहे.
Comments
Post a Comment