"वॅसकॉन इंजिनीयर्सची मुंबई बाजारात प्रवेश करण्याची घोषणा

 "वॅसकॉन इंजिनीयर्सची मुंबई बाजारात प्रवेश करण्याची घोषणा

₹300 कोटी अपेक्षित GDV असलेल्या पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात



वॅसकॉन इंजिनीयर्स लिमिटेड (VASCONEQ) ही EPC आणि रिअल्टी क्षेत्रातील एक प्रतिष्ठित कंपनी असून, कंपनी आपल्या चार दशकांच्या ठसठशीत वारशासह मुंबई बाजारात पदार्पण करत आहे. कंपनीने सांताक्रुझ पश्चिमेतील लिंकिंग रोडवर पुनर्विकास उपक्रमांतर्गत ‘वॅसकॉन ऑर्किड्स’ हा आलिशान निवासी प्रकल्प सादर केला आहे. वॅसकॉनने आपल्या 39 वर्षांच्या प्रवासात 30 पेक्षा अधिक शहरांमध्ये 225 हून अधिक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले असून, एकूण 45+ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळाचे रिअल इस्टेट प्रकल्प विकसित केले आहेत.

या प्रकल्पाचे एकूण विकास मूल्य (GDV) सुमारे ₹300 कोटी आहे. सांताक्रुझ पश्चिमेतील गजबजलेल्या लिंकिंग रोडच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकल्प स्थित असून, वॅसकॉनच्या मुंबईतील विस्तार आणि विविधीकरणाच्या धोरणाशी पूर्णतः सुसंगत आहे.

या घोषणेबाबत वॅसकॉन इंजिनीयर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिद्धार्थ वासुदेवन मूर्ती म्हणाले, "मुंबईतील पुनर्विकास क्षेत्र हे अपार संधी प्रदान करणारे आहे, कारण जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि जुन्या घरांचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज आहे. सुमारे ₹30,000 कोटींच्या बाजारमूल्यासह, पुनर्विकास क्षेत्रात परिवर्तन घडविण्याची मोठी क्षमता आहे. प्रीमियम आणि उच्च-गुणवत्तेची शहरी जीवनशैली प्रदान करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी मुंबई पूर्णतः सुसंगत आहे. EPC आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील आमच्या सखोल अनुभवासह, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि उत्कृष्टतेवरील निष्ठा यामुळे आम्ही लक्झरी हाउसिंगच्या संकल्पनांना नव्या उंचीवर नेण्यास सज्ज आहोत. ‘वॅसकॉन ऑर्किड्स’ हा केवळ मुंबईतील आमच्या भक्कम प्रवेशाचा पुरावा ठरणार नाही, तर या शहराच्या सदैव विकसित होणाऱ्या स्कायलाइनमध्येही महत्त्वपूर्ण योगदान देईल.”

वॅसकॉनने लिंकिंग रोडची निवड केवळ त्याच्या प्रतिष्ठेसाठीच नाही, तर त्यातील अजून न उलगडलेल्या संधींसाठीही केली आहे. मुंबईतील एक प्रमुख हाय स्ट्रीट असलेल्या सांताक्रुझ पश्चिममध्ये अद्यापही त्याच्या लौकिकाला साजेशी खऱ्या अर्थाने आलिशान निवाससुविधा नव्हती. ‘वॅसकॉन ऑर्किड्स’ ही उणीव भरून काढत, असामान्य जीवनशैली शोधणाऱ्या ग्राहकांसाठी एक अप्रतिम अनुभव साकारतो. या परिसरात तुलनेने मोठे भूखंड मिळणे दुर्मीळ आहे. मात्र, वॅसकॉनने अशा विशिष्ट जागेचा विकास करून लक्झरी लिव्हिंगसाठी एक नवा मापदंड निर्माण केला आहे. हा प्रकल्प केवळ एक निवासी संधी नसेल, तर लिंकिंग रोडवरील उच्च-प्रतीच्या जीवनशैलीला नवे परिमाण देणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल.

सांताक्रुझ पश्चिमेतील शास्त्रीनगरच्या प्रमुख ठिकाणी वसलेला आणि ‘हाय-स्ट्रीट लिव्हिंग’ या संकल्पनेवर आधारित, ‘वॅसकॉन ऑर्किड्स’ प्रकल्प तीन विंग्समध्ये विभागलेला आहे, ज्यामध्ये 2 आणि 3 BHK निवास असतील, एकूण 62 युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. हा प्रकल्प मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या परिसरांपैकी लक्झरी, आराम आणि सुविधा यांचे परिपूर्ण मिश्रण प्रदान करतो. रहिवाशांसाठी खास डिझाइन केलेल्या रूफटॉप आणि ग्राउंड-लेव्हल सुविधा उपलब्ध असतील, ज्यामध्ये बोच्चे बॉल, कॉर्नहोल, अत्याधुनिक जिम आणि अनेक अन्य सुविधा समाविष्ट आहेत, जेणेकरून त्यांच्या सर्व गरजा सहज पूर्ण होतील.

अत्याधुनिक कनेक्टिव्हिटी सुविधांची हमी देणारा हा प्रकल्प SV रोडवरील लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रो स्थानकाच्या आणि कोस्टल रोड कनेक्टरच्या अगदी जवळ स्थित आहे, जो केवळ 500 मीटरच्या अंतरावर असेल. यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रे आणि जीवनशैली गंतव्यस्थाने अधिक सहज व वेगवानपणे जोडली जातील, तसेच रहिवाशांसाठी अप्रतिम सुविधा उपलब्ध होतील.

सांताक्रुझ पश्चिम हा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रतिष्ठित आणि गतिशील परिसर असून, आंतरराष्ट्रीय विमानतळ व महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र जवळ असल्याने हा भाग एक प्रमुख विकास केंद्र बनला आहे. उत्कृष्ट वाहतूक सुविधा हे या परिसराचे वैशिष्ट्य असून, SV रोड, पश्चिम रेल्वे मार्ग, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि बांद्रा-वरळी सी लिंकद्वारे मुंबईतील प्रत्येक भागाशी सुलभ कनेक्टिव्हिटी मिळते. याशिवाय, भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांचे अस्तित्व, समृद्ध शॉपिंग सेंटर्स आणि विविध प्रकारच्या डायनिंग व मनोरंजनाच्या पर्यायांमुळे सांताक्रुझ पश्चिम हे मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेले निवासी स्थानांपैकी एक ठरले आहे.


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE