पीएम-विद्यालक्ष्मी योजनेसह गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी बँक ऑफ बडोदाचा पुढाकार
पीएम-विद्यालक्ष्मी योजनेसह गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी
बँक ऑफ बडोदाचा पुढाकार
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी नवीन प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी (पीएम-विद्यालक्ष्मी) योजना कार्यान्वित करत असल्याचे आज जाहीर केले. पीएम-विद्यालक्ष्मी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी आहे. आर्थिक अडचणींमुळे भारताची तरुणाई उच्च दर्जाच्या शिक्षणापासून वंचित राहू नये हे यातून सुनिश्चित केले जाते.
अर्जदार हे पीएम-विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी पीएम-विद्यालक्ष्मी पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करू शकतात. देशभरातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडे 8,300 हून अधिक शाखांच्या जोडीला 12 समर्पित Education Loan Sanctioning Cells (ELSC), 119 Retail Assets Processing Cells (RAPC) आहेत.
या प्रसंगी बोलताना बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री. संजय मुदालियार यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे “पीएम-विद्यालक्ष्मी योजना ही एक क्रांतिकारक योजना असून ती गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी आहे. प्रत्येकाला उच्च दर्जाचे शिक्षण सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना कार्यान्वित केली गेली आहे. पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक कर्जासाठी पूर्णतः डिजिटल प्रक्रिया उपलब्ध असून संपूर्ण प्रक्रिया ही सुलभ व सोपी आहे. ही योजना कार्यान्वित करण्यामध्ये अग्रेसर असलेल्या पहिल्या काही बँकांमध्ये बँक ऑफ बडोदाचा उल्लेख करताना आम्हाला आनंद आहे.”
पीएम-विद्यालक्ष्मी योजना ही एक शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणारी विशेष योजना असून ती पूर्णतः डिजिटल अर्ज प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना तारणमुक्त आणि जामीनदाराशिवाय शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देते. भारतातील 860 सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेले सर्व विद्यार्थी या योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्याकरता पात्र ठरतात. रु. 7.50 लाख पर्यंतच्या कर्जावर भारत सरकारकडून 75% कर्ज हमी दिली जाते. त्यामुळे बँकांना अधिकाधिक विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच, निम्न-उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी या योजनेत पूर्ण/अंशतः व्याज सवलत उपलब्ध आहे. त्यायोगे शैक्षणिक कर्ज अधिक परवडणारे ठरेल.
पीएम-विद्यालक्ष्मी योजनेच्या जोडीला बँक ऑफ बडोदा भारतातील सर्व अभ्यासक्रमांसाठी रु. 7.5 लाख पर्यंतचे तारणमुक्त शैक्षणिक कर्ज पुरविते. तसेच, भारतामधील 384 निवडक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रु. 40.00 लाख पर्यंतचे तारणमुक्त कर्ज दिले जाते. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी रु. 50.00 लाख पर्यंत तारणमुक्त कर्ज उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment