मार्क्वार्टने भारतातील अस्तित्व केले अधिक बळकट

तळेगाव येथे नवीन उत्पादन प्रकल्प सुरू

मार्क्वार्टने भारतातील अस्तित्व केले अधिक बळकट


वेगाने वाढणाऱ्या बाजारात भांडवली गुंतवणूक  

मेकॅट्रॉनिक प्रणालींसाठी उत्पादन क्षमता विस्तारली  

2030 पर्यंत सुमारे 300 नवीन रोजगार संधी


 मेकॅट्रॉनिक्स क्षेत्रातील अग्रणी मार्क्वार्टने भारतातील उपस्थिती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, तळेगाव (पुणे) येथे नव्या उत्पादन प्रकल्पाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. या नवीन सुविधेसह या कुटुंब व्यवस्थापित कंपनीने आपल्या पूर्वीच्या मुंबईतील उत्पादन केंद्राऐवजी तळेगावमधील केंद्र सुरू केले असून उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. यामुळे बदलत्या बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आणि अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी कंपनीची क्षमता वाढली आहे. या प्रकल्पासाठी इमारत, यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये 180 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. भविष्यात, या अत्याधुनिक प्रकल्पातून भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी मेकॅट्रॉनिक सिस्टीम सोल्युशन्सचे उत्पादन करण्यात येणार आहे.

मार्क्वार्ट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्योर्न ट्वेहाउस (Björn Twiehaus) म्हणाले, "भारत ही मार्क्वार्टसाठी मोठ्या संधी असलेली महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथे आम्ही आघाडीच्या वाहन उत्पादकांसोबत सहकार्य करत काम करत आहोत आणि भारतातील टीमच्या नवकल्पनाशक्ती आणि तांत्रिक कौशल्याचा प्रभावी उपयोग करत आहोत. तळेगाव येथील नवीन प्रकल्पाच्या उद्घाटनासह, आम्ही भारतातील यशस्वी प्रवास पुढे नेत आहोत आणि भविष्यातील वाहतुकीच्या मेकॅट्रॉनिक प्रणालींचा प्रमुख पुरवठादार म्हणून आमची भूमिका अधिक बळकट करत आहोत."

“मेक इन इंडिया” पुढाकारात योगदान 

मार्क्वार्ट इंडियाचे महाव्यवस्थापक विशाल नार्वेकर म्हणाले, "तळेगाव येथील नवीन उत्पादन केंद्राचे उद्घाटन हा मार्क्वार्टसाठी भारतातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगातील ग्राहकांसोबत आमचे दीर्घकालीन आणि भक्कम संबंध आमच्या वाढीसाठी महत्त्वाचे ठरले आहेत. या विस्ताराच्या माध्यमातून, स्थानिक भागीदारांच्या गरजेनुसार जागतिक दर्जाचे मेकॅट्रॉनिक सोल्युशन्स पुरवण्याची आमची वचनबद्धता आम्ही अधिक बळकट करत आहोत. तसेच, ही सुविधा ‘मेक इन इंडिया’उपक्रमासाठी आमचे योगदान अधोरेखित करते, कारण यामुळे स्थानिक उत्पादन वाढेल, नवकल्पनांना चालना मिळेल आणि नवीन रोजगार संधी उपलब्ध होतील."

सुमारे 300 नवीन रोजगार संधी  

अत्याधुनिक असेंब्ली लाईन्स, इन-हाऊस इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि प्रभावी लॉजिस्टिक्स सुविधांच्या माध्यमातून, मार्क्वार्ट तळेगाव येथून ग्राहकांसाठी संपूर्ण मेकॅट्रॉनिक सोल्युशन्स पुरवते. यामध्ये ड्राइव्ह ऑथरायझेशन सिस्टिम, गियर सिलेक्टर स्विच आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम यांचा समावेश आहे. तसेच, या गुंतवणुकीमुळे पुरवठा साखळी अधिक सुटसुटीत झाली असून, प्रतिसादाचा वेग वाढला आहे आणि उत्पादन प्रक्रिया अधिक लवचिक झाली आहे. पुढील पाच वर्षांत, मार्क्वार्ट या नवीन प्रकल्पामध्ये सुमारे 300 अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE