मुंबईने तिमाही निवासी विक्रीमध्ये ऐतिहासिक वाढीची नोंद केली; २०२५च्या पहिल्या तिमाहीत भारतातील प्रमुख आठ बाजारपेठांमधील व्यवहारांमध्ये अग्रस्थानी: नाइट फ्रँक इंडिया
मुंबईने तिमाही निवासी विक्रीमध्ये ऐतिहासिक वाढीची नोंद केली; २०२५च्या
पहिल्या तिमाहीत भारतातील प्रमुख आठ बाजारपेठांमधील व्यवहारांमध्ये अग्रस्थानी:
नाइट फ्रँक इंडिया
·
२०२५च्या पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागा व्यवहार
आकारमान ऐतिहासिकदृष्ट्या ३.५ दशलक्ष चौरस फूटांसह सर्वोच्च
·
मुंबईने देशातील संपूर्ण निवासी विक्रीमध्ये २८ टक्क्यांचे
योगदान दिले
मुंबई,
एप्रिल ३, २०२५: नाइट फ्रँक इंडियाचा नवीन अहवाल इंडिया रिअल इस्टेट:
ऑफिस अँड रेसिडेन्शियल (जानेवारी - मार्च २०२५) क्यू१ २०२५ मधून देशातील
सर्वात मोठी निवासी बाजारपेठ म्हणून मुंबईचे प्रभुत्व दिसून येते. शहराने २०२५
च्या पहिल्या तिमाहीत २४,९३० प्रायमरी निवासी सदनिकांच्या विक्रीची नोंद केली,
जी २०१८ च्या पहिल्या तिमाहीपासून ऐतिहासिकदृष्ट्या सर्वोच्च ठरली असून त्यामध्ये
वार्षिक ५ टक्क्यांची वाढ झाली. डेव्हलपर्सनी या प्रबळ गतीचा फायदा घेत २५,०७६
नवीन सदनिका लाँच केल्या, ज्यामध्ये वाषिक २ टक्क्यांची वाढ झाली. सरासरी
निवासी किमतींमध्ये वार्षिक ६ टक्क्यांची वाढ झाली, जेथे निवासी किंमत २०२५च्या
पहिल्या तिमाहीत प्रति चौरस फूट ८,३६० रूपयांपर्यंत पोहोचली. यामधून उच्च मागणी
असलेली बाजारपेठ म्हणून मुंबईचे स्थान दिसून येते.
मुंबईतील विक्री न झालेल्या
सदनिकांच्या यादीमध्ये काहीशी घट झाली, जेथे २०२४ च्या पहिल्या तिमाहीमधील
१६६,९१५ सदनिकांवरून २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये १६६,४५४ सदनिकांपर्यंत घट
झाली. क्वॉर्टर्स टू सेल (क्यूटीएस) मेट्रिक ७.७ क्वॉर्टर्सवरून ७.१ क्वॉर्टर्सपर्यंत
कमी होत सुधारले, ज्यामधून प्रबळ अवलंबन दर आणि ग्राहकांमधील शाश्वत आत्मविश्वास
दिसून येतो.
निवासी बाजारपेठ सारांश: भारतातील आठ अव्वल शहरे
|
Sales |
Launches |
||
City |
Q1 2025 |
YoY % Change |
Q1 2025 |
YoY % Change |
Mumbai |
24,930 |
5% |
25,706 |
2% |
NCR |
14,248 |
-8% |
13,276 |
-11% |
Bengaluru |
12,504 |
-5% |
16,524 |
26% |
Pune |
14,231 |
20% |
16,231 |
22% |
Hyderabad |
9,459 |
-1% |
10,661 |
-4% |
Ahmedabad |
4,687 |
0% |
5,628 |
5% |
Kolkata |
3,858 |
-2% |
3,707 |
-38% |
Chennai |
4,357 |
10% |
10,661 |
5% |
All India |
88,274 |
2% |
96,309 |
3% |
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च
गृहखरेदीदार
प्रीमियम सेगमेंट्सना प्राधान्य देत आहेत
मुंबई विविध किंमत श्रेणींमध्ये,
विशेषत: सब-५ दशलक्ष रूपये, १० दशलक्ष ते २० दशलक्ष रूपये आणि २०० दशलक्ष ते ५००
दशलक्ष रूपये श्रेणींमध्ये निवासी विक्रीत अग्रस्थानी आहे. सब-५ दशलक्ष रूपये
श्रेणी अग्रस्थानी राहिली असताना देखील तिचे प्रमाण २०२४ च्या पहिल्या
तिमाहीमधील ४४ टक्क्यांवरून २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये ४१ टक्क्यांपर्यंत
कमी झाले. याउलट, २० दशलक्ष ते ५० दशलक्ष रूपये श्रेणीमध्ये ९ टक्क्यांवरून १२
टक्क्यांपर्यंत वाढ झाली, ज्यामधून प्रीमियम घरांसाठी वाढती पसंती दिसून येते.
बाजारपेठेत मंदीचे वातावरण असताना देखील २०० दशलक्ष ते ५०० दशलक्ष रूपये श्रेणीने
लक्षणीय वाढीची नोंद केली, जेथे वार्षिक १०८ टक्क्यांच्या वाढीसह सदनिकांची
संख्या ३१ वरून ६५ पर्यंत पोहोचली.
विक्रीची तिकिट आकारानुसार विभागणी
Ticket
Size Categories |
<5 mn |
5-10 mn |
10-20 mn |
20-50 mn |
50-100 mn |
100-200 mn |
200-500 mn |
>500 mn |
Total |
Q1 2025 |
10,121 |
6,244 |
4,865 |
2,950 |
557 |
107 |
65 |
21 |
24,930 |
YoY % change |
-4% |
7% |
3% |
38% |
43% |
26% |
108% |
-22% |
5% |
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च
कार्यालयीन बाजारपेठ अपडेट: जानेवारी - मार्च २०२५
मुंबईतील कार्यालयीन बाजारपेठेने प्रबळ गती कायम
राखली, जेथे व्यवहार आकारमान २०२५ च्या पहिल्या तिमाहीत ३.५ दशलक्ष चौरस फूटांपर्यंतच्या
ऐतिहासिक उच्चांकापर्यंत पोहोचले, ज्यामध्ये २०२४ च्या पहिल्या तिमाहीमधील
२.८ दशलक्ष चौरस फूटांच्या तुलनेत वार्षिक २४ टक्क्यांची वाढ झाली. शहरामध्ये
०.५ दशलक्ष चौरस फूट नवीन कार्यालयीन पुरवठा देखील दिसण्यात आला, ज्यामध्ये
वार्षिक ४३ टक्क्यांची वाढ झाली. सरासरी व्यवहार झालेल्या कार्यालयीन
भाड्यांमध्ये वार्षिक २ टक्क्यांची वाढ झाली, जे प्रतिमहिना प्रति चौरस फूट ११८
रूपये होते.
मुंबईतील कार्यालयीन बाजारपेठ
सारांश (२०२५ ची पहिली तिमाही)
|
Office Transactions |
Completions |
|||||
(Mn Sq Ft) |
(Mn Sq Ft) |
||||||
City |
Q1 2025 |
Q1 2024 |
% Change YoY |
City |
Q1 2025 |
Q1 2024 |
% Change YoY |
Mumbai |
3.5 |
2.8 |
24% |
Mumbai |
0.5 |
0.4 |
43% |
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च
इंडिया-फेसिंग बिझनेसेस आणि फ्लेक्स
स्पेसेस ड्राइव्ह डिमांड मुंबईतील कार्यालयीन बाजारपेठेत अग्रस्थानी होते, जेथे १.७ दशलक्ष चौरस फूट
जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली आणि त्यांचे योगदान एकूण व्यवहारांमध्ये ४९
टक्के होते. फ्लेक्स ऑफिस स्पेसेस् प्रमुख विकास स्रोत ठरले, ज्यांनी ३६ टक्के
मार्केट शेअर संपादित केला आणि वार्षिक ३८४ टक्क्यांची वाढ केली, जेथे २०२४ च्या
पहिल्या तिमाहीमधील ०.२५ दशलक्ष चौरस फूटांवरून २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये
१.२४ दशलक्ष चौरस फूटांपर्यंत वाढ झाली.
एण्ड-युजर ऑक्यूपायर्समधील व्यवहार
आकारमान
End-User
Licensee/Buyer |
India-Facing
Business |
Flex |
GCC |
Third
Party IT |
Total |
Area
transacted in mn sq ft |
1.69 |
1.24 |
0.42 |
0.13 |
3.47 |
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च
नाइट फ्रँक इंडियाच्या रिसर्च, अॅडवायजरी, इफ्रास्ट्रक्चर
अँड व्हॅल्यूएशनचे वरिष्ठ कार्यकारी संचालक गुलाम झिया म्हणाले, ''मुंबईतील निवासी बाजारपेठ विस्तारित होत
आहे, ज्याला प्रीमियम घरांसाठी प्रबळ मागणी आणि मुंबई कोस्टल रोड व मेट्रो लाइन्स
यांसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या सकारात्मक प्रभावाने गती दिली
आहे. या विकासांमुळे कनेक्टीव्हीटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे, ज्यामुळे
उपनगरांमध्ये मागणी वाढत आहे, तसेच ग्राहक आणि डेव्हलपर्समधील आत्मविश्वास
वाढत आहे. दरम्यान, कार्यालयीन भाडे क्षेत्रामध्ये प्रबळ वाढ दिसण्यात आली आहे,
ज्याला विविध ऑक्यूपायर मागणी, पायाभूत सुविधांना अनुसरून विस्तारीकरण आणि
मुंबईतील दीर्घकालीन क्षमतेवर असलेला डेव्हलपरचा आत्मविश्वास या बाबींचे साह्य
मिळाले आहे. शहराची विकसित होत असलेले वर्कप्लेस ट्रेण्ड्स व ऑक्यूपायर गरजांशी
जुळून जाण्याची क्षमता प्रीमियर कमर्शियल हब म्हणून शहराचे स्थान अधिक दृढ
करते.''
Comments
Post a Comment