यूपीआय वर RuPay क्रेडिट कार्ड्स: दररोजची पेमेंट्स करणे होणार सुलभ

 यूपीआय वर RuPay क्रेडिट कार्ड्स: दररोजची पेमेंट्स करणे होणार सुलभ

 

यूपीआय सोबत RuPay क्रेडिट कार्ड्सचे एकत्रीकरण भारतातील डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात बदल घडवून आणत आहेत्यामुळे वापरकर्त्यांना प्रत्यक्ष कार्ड न बाळगता पेमेंट करण्याची सोय उपलब्ध होत आहे. लिंकिंग प्रक्रिया सोपी असून कोणत्याही यूपीआय सक्षम अॅपद्वारे केली जाऊ शकते.

 

आपले RuPay क्रेडिट कार्ड UPI सोबत लिंक करण्यासाठीप्रथम UPI-सक्षम अॅप डाउनलोड करा. त्यानंतरबँकेशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकासह नोंदणी करा किंवा लॉगिन करा आणि प्रोफाईल सेक्शनमध्ये “Add Account” निवडा. यादीतून आपले क्रेडिट कार्ड जारी करणारी बँक निवडाआपले RuPay क्रेडिट कार्ड निवडापडताळणी प्रक्रिया पूर्ण करा आणि UPI PIN सेट करा. एकदा लिंक केल्यानंतरआपण अखंडविना अडथळा व्यवहार सुरू करू शकता.

 

तसेच, RuPay क्रेडिट कार्डचा वापर UPI पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यावसायिक ठिकाणी करता येतोअगदी पारंपारिक POS टर्मिनल नसले तरीही त्यात लहान आणि मध्यम आकाराचे व्यवसाय—किराणा दुकानेरस्त्यावरचे विक्रेते आणि स्थानिक दुकाने ती मोठी दालने यांचा समावेश आहे.

 

वापरकर्ते किराणा सामानइंधनभोजन आणि ऑनलाइन पेमेंट्स सारख्या रोजच्या खर्चांवर रिवॉर्ड्सकॅशबॅक आणि विशेष ऑफर्स मिळवू शकतात. UPI सोबत लिंक केलेल्या RuPay क्रेडिट कार्ड्ससाठी अनेक बँका अतिरिक्त फायदे देतात. त्यामुळे व्यवहार अधिक फायदेशीर होतात. हे वैशिष्ट्य आर्थिक व्यवस्थापन सुधारतेक्रेडिट आणि डेबिट व्यवहार एका ठिकाणी ट्रॅक करते आणि बिले व सबस्क्रिप्शन्ससाठी ऑटोमॅटिक पेमेंटला पाठबळ देते. बँकेद्वारे निश्चित केलेला व्याजमुक्त कालावधी (साधारणपणे 30-50 दिवस) व्याजाशिवाय पेमेंट पुढे ढकलून रोख प्रवाह चांगला व्यवस्थापित करण्यात मदत करते. शिवाय, UPI सोबत क्रेडिट कार्ड लिंक केल्याने कार्ड तपशील शेअर करण्याची गरज उरत नाहीफसवणुकीचा धोका कमी होतो आणि अतिरिक्त वाढीव संरक्षणासाठी स्वतंत्र UPI PIN सक्षम करते.

 

जरी हे वैशिष्ट्य अनेक फायदे देत असले तरी वापरकर्त्यांना मजबूत UPI PIN सेट करणेकेवळ विश्वासार्ह व्यापाऱ्यांना पेमेंट करणे आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक अद्ययावत ठेवणे यांसारख्या सुरक्षा उपायांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. भारत कमी रोख व्यवहाराच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, UPI वर RuPay क्रेडिट कार्ड्स ग्राहक आणि व्यवसायांसाठी डिजिटल व्यवहार अधिक सोयीस्कर आणि फायदेशीर बनवतील अशी अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202