इन्फ्रारेड सेन्सर विकास आणि डायरेक्टेड एनर्जी वेपन प्लॅटफॉर्म्सला गती देण्यासाठी Tonbo Imaging ने सिरिज डी प्री आयपीओ फेरीत 175 कोटी रु. चा निधी उभारला

इन्फ्रारेड सेन्सर विकास आणि डायरेक्टेड एनर्जी वेपन प्लॅटफॉर्म्सला गती देण्यासाठी Tonbo Imaging ने सिरिज डी प्री आयपीओ फेरीत 175 कोटी रु. चा निधी उभारला


धोरणात्मक संरक्षण तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावरची आघाडीची कंपनी Tonbo Imaging ने आपली सिरिज डी प्री आयपीओ फंडिंग फेरी यशस्वीरित्या पूर्ण केली असून फ्लोरीनट्री अॅडव्हायजर्स, टेनासिटी व्हेंचर्स आणि एक्सपोर्ट – इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया कडून 175 कोटी रु. चा निधी उभारला आहे. या गुंतवणुकीमुळे अत्याधुनिक इन्फ्रारेड सेन्सर्सच्या विकासाला गती मिळेल, उच्च-शक्तीच्या मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक उपयोजनास मदत होईल. त्यायोगे आधुनिक युद्धक्षेत्रातील धोक्यांचा सामना करता येईल आणि सध्या कार्यरत कार्यक्रमांच्या जागतिक विस्तारासाठी कार्यकारी भांडवलाला पाठबळ मिळेल.

 वेगाने वाढणाऱ्या आणि गतिशील C4ISR बाजारातील ऑर्गनिक आणि इनऑर्गनिक अशा दोन्ही संधींचा लाभ घेण्यासाठीचे एक धोरणात्मक पाऊल असलेला आयपीओ Tonbo Imaging सादर करण्याच्या तयारीत असताना हा निधी आला आहे.

 निसर्गातील सर्वात प्रगत दृश्य शिकारी ड्रॅगनफ्लायपासून प्रेरणा घेत Tonbo Imaging अत्याधुनिक संवेदन आणि प्रक्रिया प्रणाली तयार करते. ती परिस्थितीजन्य जागरूकता, लक्ष्य साधण्याची अचूकता आणि स्वायत्त युद्धक्षेत्र ऑपरेशन्स वाढवते.

 याआधी आर्टीमन, क्वालकॉम, सेलेस्टा, एडलवाईज आणि एचबीएल इंजिनिअरिंग यांसारख्या गुंतवणूकदारांकडून 300 कोटी रु. हून अधिक निधी उभारलेल्या Tonbo Imaging ने युद्धप्रसंगी सिद्ध झालेल्या प्रणालींचा जागतिक पुरवठादार म्हणून विश्वासार्ह स्थान मिळवले आहे. कंपनीचे तंत्रज्ञान 30 हून अधिक देशांमध्ये प्रतिष्ठित संरक्षण दलांकडून वापरले जाते. त्यामध्ये इस्त्रायली डिफेन्स फोर्सेस (IDF), अमेरिकन नेव्ही सील्स, नाटो, अर्मेनियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि इंडियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांचा समावेश आहे. Tonbo च्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने उरी सर्जिकल स्ट्राईक, IDF च्या दहशतवाद विरोधी मोहिमा यासारख्या महत्वपूर्ण मोहीमा,  भारताच्या अर्जुन मेन बॅटल टॅंकचे आधुनिकीकरण, भारत डायनॅमिक्सचा अॅंटी टॅंक गायडेड मिसाईल (ATGM) कार्यक्रम आणि नाटोच्या अनेक सक्रिय मोहिमांसह प्रमुख लढाई मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे Tonbo Imaging ने एक अग्रगण्य संरक्षण नाविन्यपूर्ण निर्माते म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे.

 Tonbo Imaging चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद लक्ष्मीकुमार म्हणाले: “Tonbo ची स्थापना उच्च श्रेणीच्या संरक्षण तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून केली गेली. आधुनिक युद्धक्षेत्र सुलभ, स्वायत्त गुप्तचर आणि लक्ष्य साधणाऱ्या प्रणालींकडे झुकत असल्यामुळे अधिक चांगले सेन्सर्स, कमी शक्तीवर कार्य करणारे संगणक दर्शन आणि अपारंपरिक शस्त्रे महत्त्वाची ठरणार आहेत. ही गुंतवणूक इन्फ्रारेड इमेजिंग मधील नाविन्यपूर्णता आणखी वाढवायला आणि आमचा जागतिक विस्तार वाढवताना ऊर्जा उपायसुविधांमध्ये दिशादर्शन करायला आम्हाला सक्षम करते. आमचे लक्ष जगभरात आधुनिक संरक्षण दलांना किफायतशीर, अत्याधुनिक युद्धक्षेत्र गुप्तचर आणि संरक्षण प्रणाली पुरवण्यावर कायम आहे.”

 फ्लोरीनट्री कॅपिटलचे संस्थापक मॅथ्यू सिरीअॅक म्हणाले, “Tonbo Imaging हे संरक्षण तंत्रज्ञानाचे भविष्य दर्शवते. इमेजिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्वायत्त प्रणालींमध्ये सखोल कौशल्य असलेली ही कंपनी उदयोन्मुख जागतिक सुरक्षा आव्हानांना उत्तरे देण्यासाठी उत्तम पद्धतीने तयार आहे. व्यवसाय विस्तार करण्यासाठी आणि भारताबाहेर जागतिक संरक्षण तंत्रज्ञान व्यवसाय उभारण्यासाठी अरविंद आणि त्यांच्या व्यवस्थापन टीमसोबत भागीदारी करण्याबाबत आम्ही खूप उत्सुक आहोत.”

 टेनासिटी व्हेंचर्सचे सह-संस्थापक रोहित राजदान यांनी गुंतवणुकीच्या तार्किकतेवर भाष्य केले: “आम्ही बर्‍याच काळापासून Tonbo चे कौतुक करत आलो आहोत आणि विकासाच्या पुढील टप्प्याकडे गुंतवणूक करण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. Tenacity ची स्थापना उच्च तंत्रज्ञान आणि त्या त्या क्षेत्रातील व्यापक समज असलेली सर्वोत्तम उत्पादने असणाऱ्या Tonbo सारख्या कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी झाली आहे. Tonbo ची उत्पादने देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या उच्च दर्जाच्या हार्डवेअरबरोबर उत्तम सॉफ्टवेअर देतात. Tonbo पुढील काही वर्षांत या संरक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचा भारत स्थित जागतिक नेता म्हणून उदयास येईल असा आमचा विश्वास आहे.”


Comments

Popular posts from this blog

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202